Threatening to kill a pistol by abducting hypnosis experts in pune.jpg 
पुणे

पुण्यात संमोहन तज्ज्ञाचे केले अपहरण; पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी 

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आर्थिक वादातून संमोहनतज्ज्ञाचे अपहरण करुन त्यास जबर मारहाण करण्यात आली. त्यानंतर त्यास पिस्तूलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी उद्योजक व हॉटेल व्यावसायिकासह चौघांविरुद्ध विरुद्ध चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

खेड-शिवापूर टोलनाक्याबाबत 'हा' मॅसेज होतोय व्हायरल 

सचिन गोविंद वाळके (रा. बाणेर), नानासाहेब शंकर गायकवाड (रा. औंध), अंकुश राजुदादा उर्फ राजाभाऊ, विकास बालवडकर अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहे. याप्रकरणी महेश पोपट काटे (वय 37, रा. पाली, सुधागड, मुळ गाव पिंपळे सौदागर) यांनी फिर्याद दिली आहे. वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शेवाळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी काटे हे संमोहनतज्ज्ञ आहेत. गायकवाड हा उद्योजक आहे, तर वाळके हा हॉटेल व्यावसायिक आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

काटे यांना व्यावसायासाठी पैशांची गरज होती. त्यासाठी त्यांनी त्यांचा मावसभाऊ संदिप वाळके याच्या ओळखीने गायकवाड याच्याकडून 2017 मध्ये तीस लाख रुपये व्याजाने घेतले होते. फिर्यादी यांनी दहा लाख रुपये त्याचवर्षी परत केले. तर दरमहा ऐंशी हजार या पद्धतीने त्यांनी सोळा लाख रुपये दिले. अशा पद्धतीने 26 लाख रुपये परत केले. तर कौटुंबिक अडचणीमुळे उर्वरीत रक्कम विलंबाने परत करणार असल्याचे सांगितले.

2022 मध्ये शरद पवार होणार राष्ट्रपती?; संजय राऊतांचे नवे मिशन

दरम्यान, 2019 मध्ये फिर्यादी यांचा व्यवसाय बंद पडला. त्यामुळे फिर्यादी यांना पैसे परत करता आले नाहीत. दरम्यान, वाळके याने फिर्यादी यांना शुक्रवारी 3 जानेवारी 2020 रोजी दुपारी दिड वाजता त्याच्या बाणेर येथील तात्याचा ढाबा या हॉटेलमध्ये बोलावून घेतले. त्यानंतर वाळके व बालवडकर यांनी फिर्यादीस लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. त्यांना कारमध्ये बसवून गायकवाड याच्या सूस येथील फार्म हाऊसवर नेऊन फिर्यादीस डांबून ठेवले.


JNU attack : जेएनयूतील हल्ल्यावर शरद पवार, आदित्य ठाकरे म्हणाले...

गायकवाड व त्याच्या साथीदारांनी फिर्यादीस मारहाण केली.पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी हे बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांच्या मावसभावाने मध्यस्थी करुन फिर्यादी यांना घरी नेले. त्यानंतर फिर्यादी यांनी चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Russian Woman: रशियन महिला सापडली ते गोकर्णचं घनदाट जंगल... माणूस हरवला की रस्ता ही सापडणार नाही, फोटो पाहा

रशियन महिलेच्या मुलींचे वडील कोण? भारतात का आली होती? मोठे अपडेट समोर

Latest Maharashtra News Updates : पंचगंगा नदीची पाणी पातळी चोवीस तासांत सहा फूट सहा इंचांनी वाढली

Local Elections 2025 : नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप, इच्छुकांचा अभ्यास, जिल्हा परिषद गट-गण प्रारूप रचना; निवडणूक मोर्चेबांधणीला सुरुवात

Kolhapur Chappal Prada : ‘प्राडा’ची टेक्निकल टीम कोल्हापुरी पायतान बघून भारावली, कारागिरांची हस्तकला पाहून म्हणाले...

SCROLL FOR NEXT