Three and half lakh rupees theft Of stall Holder in Bhimthadi Exhibition  
पुणे

'त्यांनी' भीमथडीत कमावले अन् तिथेच गमावले

सकाळ वृत्तसेवा

पुणे : भीमथडी जत्रेमध्ये राजस्थानी कपडे विक्रीच्या स्टॉलवरुन अनोळखी व्यक्तीने साडे तीन लाख रुपयांची रोकड व महत्वाची कागदपत्रे चोरीला गेली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ओमप्रकाश दोसाया (वय 39, रा. जयपुर, राजस्थान) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरुन सिंचननगर येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानामध्ये भरलेल्या भीमथडी जत्रेमध्ये फिर्यादी यांनी राजस्थानहून आणलेल्या कपड्यांच्या विक्रीचा स्टॉल ठेवला होता. त्यांना स्टॉल क्रमांक 26 देण्यात आले होते.

पुण्यात CAA वरून एफसी कॉलेजमध्ये राष्ट्रवादी-भाजप समोरासमोर; पहा काय घडले?

शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांच्या स्टॉलवर मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. फिर्यादी यांनी त्यांच्या काऊंटरमध्ये ठेवलेली साडे तीन लाख रुपयांची रोकड, एटीएम, आधार कार्ड व अन्य महत्वाची कागदपत्रे असलेली बॅग ठेवली होती. अनोळखी व्यक्तीने गर्दीचा फायदा घेऊन साडे तीन लाख रुपयांच्या रोख रक्कमेसह महत्वाची कादगपत्रे असलेली बॅग चोरुन नेली. या प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक सुबराव लाड करीत आहेत. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Voter Fraud: बापरे! एकाच घरात ४ हजार २७१ मतदार; अधिकाऱ्यांनी केले हात वर, म्हणाले...

Latest Maharashtra News Updates : मुंबईकरांचे म्हाडाच्या लॉटरीतील घराचे स्वप्न लांबणीवर!

Gold Investment : 'पितृपक्षात सोने खरेदी करू नये' हा गैरसमज मोडीत; सराफ व्यावसायिकांचे निरीक्षण

US tariff on India update: अमेरिका लवकरच मोठा निर्णय घेणार! भारतावरील अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ हटवणार?

Neeraj Chopra कडून घोर निराशा! जागतिक स्पर्धेत सुवर्णपदक राखण्यात अपयशी, टॉप-६ मध्येही स्थान नाही

SCROLL FOR NEXT