पुणे

हद्दच झाली राव! दुचाकीवर सहाजणांना पाहून पोलीसही चक्रावले

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्र वगळता इतर राज्यांमध्ये दुचाकीवर किती जणांनी प्रवास करावा याला बंधन नसल्याचे वारंवार सोशल मीडियावरील चित्रात स्पष्ट झाले आहे. मात्र बुधवारी सोलापूर रस्त्यावर दुचाकीवर सहाजण आणि त्यातील चौघे विनामास्क होते. कोरोना महामारीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने कडक निर्बंध जारी केले आहेत, त्याची पोलीस यंत्रणेकडून बॅरिगेट लावून अंमलबजावणी केली जात आहे. एवढा बंदोबस्त असूनही हे महाशय दुचाकीचालक त्याची पत्नी, दोन मुले टाकीवर, एक दोघांच्या मधे, तर एक त्या महिलेच्या काखेतील झोळीमध्ये असा सहाजणांचा प्रवास पाहून पोलीसही चक्रारवलेले पाहायला मिळाले.

सोलापूर रस्त्यावर रेसकोर्स पोलीस चौकीजवळ पोलिसांनी हात केल्यानंतर दुचाकीचालकाने वाहन थांबवले. हे पाहताच समजदार चिमुकल्याने शर्ट ओढून तोंड झाकण्याचा प्रयत्न केला. निरागस चिमुकले आणि केविलवाना महिलेचा चेहरा पाहून पोलिसांच्या हृदयाला पाझर फुटला नाही, तर नवल ते कसले. तुम्ही स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या सुरक्षेसाठी मास्क वापरा. धोकादायक पद्धतीने प्रवास करू नका, आम्हाला कारवाई करण्यात समाधान वाटत नाही. मात्र, तुमच्या अशा बेफिकीरीपणामुळे कारवाई करावी लागते. तुमच्या चुकीची शिक्षा लहानग्यांना देऊ नका, असाही सबुरीचा सल्ला त्यांनी त्या दुचाकीचालकाला दिला.

मागील काही दिवसांपासून कोरोना महामारीचा ज्वर कमी झाल्यामुळे कडक निर्बंध शिथील केले आहेत. त्यामुळे व्यवसाय-उद्योग आणि कंपन्या सुरू झाल्या आहेत. त्यामुळे कामगारवर्ग आता दुचाकीवर कामाच्या ठिकाणी ये-जा करीत आहेत. ग्रामीण भागातील मंडळीही खरेदी-विक्रीसाठी आता शहरामध्ये येऊ लागली आहेत. त्यामुळे रस्त्यावर वाहनांची वर्दळ वाढली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fact Check: शिवसेनेच्या (UBT) मिरवणुकीत पाकिस्तानचा झेंडा फडकवल्याचा नितेश राणे यांचा दावा, वाचा काय आहे सत्य

Marathi News Live Update: पंतप्रधान मोदी वाराणसीमध्ये दाखल; थोड्याच वेळात भरणार उमेदवारी अर्ज..

Uorfi Javed : खरंच टक्कल केलं? उर्फीच्या फोटो मागील सत्य नेटकऱ्यांनी केलं उघड

RCB vs CSK : प्लेऑफसाठी आता जर-तर अन् नेट रन रेटची गणिते! चेन्नई-बंगळूर अन् आता 'नॉकआउट' सामना

Walmart Layoffs: वॉलमार्टमध्ये पुन्हा मोठी कर्मचारी कपात; शेकडो कर्मचाऱ्यांना दाखवणार बाहेरचा रस्ता

SCROLL FOR NEXT