The tradition of Atharvashirsha in front of Dagdusheth ganpati continues even in corona pandemic 
पुणे

'दगडूशेठ'च्या 'श्रीं'समोर पार पडले अथर्वशीर्ष पठण; कोरोनाकाळातही 34 वर्षांची परंपरा कायम

सकाळवृत्तसेवा

पुणे : दरवर्षीप्रमाणे यंदा कोरोनाकाळातही 'ओम नमस्ते गणपतये...'चे स्वर ऋषीपंचमीच्या निमित्ताने दगडूशेठ गणपतीसमोर निनादले. एरवी हजारो महिलांच्या उपस्थितीत होणारा सोहळा यंदा दगडूशेठच्या मुख्य मंदिरात अवघ्या ५ महिलांच्या उपस्थितीत पार पडला. तर, हजारो भाविकांनी ऑनलाइन पद्धतीने घरबसल्या या सोहळ्यात सहभाग घेतला आणि 34 वर्षांपासून सुरू असलेली परंपरा कायम राखत कोरोनाकाळातही अथर्वशीर्ष पठण पार पडले.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने  १२८ व्या वर्षी ऋषिपंचमीनिमित्त 'अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये शितल तानवडे, सीमा लिमये, विद्या अंबर्डेकर, हेमलता डाबी, सुप्रिया सराफ या ५ महिलांनी मुख्य मंदिरातून प्रत्यक्षपणे सहभाग घेतला. या पाच महिला सलग १० वर्षे या उपक्रमात सहभाग घेत आहेत. यंदा उपक्रमाचे ३४ वे वर्ष आहे. 

अथर्वशीर्ष पठणाचा प्रारंभ सकाळी ६ वाजता शंख वादनाने झाला. ओमकार, गीत, गजर यांसह मंदिरात उपस्थित महिलांनी 'श्री गणराया' चरणी अथर्वशीर्ष सादर केले. तसेच गणेशाची आरती देखील करण्यात आली. 

Ganeshotsav 2020 : श्रीमंत दगडूशेठ मंदिर ट्रस्टचा मोठा निर्णय; यंदा उत्सवकाळात मंदिरात एन्ट्री नाही!​

उत्सवकाळात मंदिरात केवळ ब्रह्मवृंदांच्या उपस्थितीत धार्मिक विधी होणार आहेत. मंदिरा बाहेरून दर्शन घेण्यासाठी आलेल्या भाविकांकडून हार, फुले, पेढे, नारळ देखील स्विकारले जाणार नसून प्रसाद दिला जाणार नाही. त्यामुळे भक्तांनी उत्सकाळात गर्दी करु नये व आॅनलाईन दर्शन सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही ट्रस्टतर्फे करण्यात आले आहे.  

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

'श्रीं'चे आॅनलाईन दर्शन घेण्याची व्यवस्था देखील ट्रस्टने केली आहे. ट्रस्टच्या वेबसाईट, अ‍ॅप, फेसबुक, यू ट्यूब, ट्ट्विटर या माध्यमांद्वारे www.dagdushethganpati.com, http://bit.ly/Dagdusheth-LiveiOS : http://bit.ly/Dagdusheth_iphone_App Android: http://bit.ly/ Dagdusheth _ Android_App या लिंकवर उत्सवकाळात २४ तास दर्शनाची सोय करण्यात आली आहे.   

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Cricket in Trouble: पाकिस्तानला 'नाटक' महागात पडणार, ICC ने पाठवला ई मेल! PCB ने स्पर्धेचे अनेक नियम मोडले, आता...

Asia Cup 2025 Super 4 Schedule: भारतीय संघ कोणत्या तारखांना कोणाला भिडणार? जाणून घ्या सुपर ४ चं संपूर्ण वेळापत्रक

AFG vs SL Live: लक्ष्य १७० धावांचे, पण १०१ धावा करताच श्रीलंका पोहोचली Super 4 मध्ये; अफगाणिस्तानला लटकवले, कसे ते घ्या जाणून...

Adani Group News : अदानी समूहाला मोठा दिलासा; 'SEBI'ने 'हिंडेनबर्ग'चे आरोप फेटाळले!

Khadakwasla Dam : खडकवासला धरणातून ३१ तासांनी १२६३ क्युसेक विसर्ग सुरू

SCROLL FOR NEXT