Two accused arrested for murdering young boy in Pune 
पुणे

पुणे : डोक्यात फरशी घालून तरुणाचा खून करणाऱ्या 2 आरोपींना अटक

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कोरेगाव पार्क येथे पूर्ववैमनस्यातून झालेल्या वादानंतर एका तरुणाच्या डोक्‍यात फरशी घालून गुरूवारी मध्यरात्री (ता.9) त्याचा खुन करुन फरारी झालेल्या आरोपींपैकी दोघांना अलंकार पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अनिकेत वाखारे, सागर चवरीया (दोघेही रा. कवडेवाडी, कोरेगाव पार्क) असे अटक केलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. 

नीलेश विठ्ठल शेंडगे (वय 22, रा. दरोडे मळा, कोरेगाव पार्क) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी जनाबाई विठ्ठल शेंडगे (वय 45) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. निलेश शेंडगे हा विशाल दोडके यांच्यासमवेत गुरुवारी रात्री सव्वाबाराच्या सुमारास कोरेगाव पार्क येथील दरोडे मळ्याजवळील गणपती मंदिरासमोर थांबला होता. त्या वेळी अनिकेत वाखारे हा त्याच्या साथीदारासह तेथे आला. दोघांमध्ये जुन्या भांडणाच्या कारणावरुन भांडणे झाली. त्यानंतर अनिकेत वाखारे, अभिषेक वाखारे, निळकंठ वाखारे, सागर चावरिया व फैयाज यांनी निलेशला हाताने व लोखंडी सळईने मारहाण केली. त्यानंतर त्यांनी निलेशच्या डोक्‍यात फरशी घालून त्याचा खुन केला. या घटनेनंतर आरोपी पळून गेले होते.

अभ्यासानंतरच ‘बीआरटी’ धावणार! 

दरम्यान, या घटनेतील दोन आरोपी अलंकार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील निंबाळकर पान स्टॉल येथे आल्याची खबर तपास पोलिस नाईक राजेंद्र लांडगे, संदिप धनवटे व प्रफुल चव्हाण यांना मिळाली. त्यानुसार, तपास पथकातील पोलिस उपनिरीक्षक सुरज गोरे यांच्या पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. त्यावेळी कोरेगाव पार्क येथील खुन अनिकेत वाखारे व सागर चवरीया यांनीच केल्याची कबुली दिली. दोघांनाही पुढील तपासासाठी कोरेगाव पार्क पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. 
 
पुणे : पोलिसांनी वाचला वृद्धाश्रमाचा बोर्ड अन्...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Navi Mumbai: नवी मुंबईत १६ तास पाणीपुरवठा बंद, सात विभागांवर परिणाम; पाणी जपून वापरण्याचे आवाहन

8th Pay Commission: 8वा वेतन आयोग लागू होण्यास उशीर? कर्मचाऱ्यांना 3 लाखांचं नुकसान; काय आहे गणित?

Kolhapur DCC Bank Election : गोकुळपाठोपाठ कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीची रणधुमाळी; 732 ठराव रद्द, कोणत्या गटात किती मतदार?

भन्नाट... भुवनेश्वर कुमार भारतीय संघात परतला; कृणाल पांड्या, नितीश राणा यांनाही संधी, जाणून घ्या केव्हा व कुठे होणार स्पर्धा...

'आई कुठे काय करते' मालिकेतून अचानक काढून टाकलं; लोकप्रिय लेखिकेचा मोठा खुलासा; मला काही येत नव्हतं असं...

SCROLL FOR NEXT