midc 
पुणे

चाकण एमआयडीसीला अच्छे दिन,  जमीन संपादनासाठी... 

हरिदास कड

चाकण (पुणे) : खेड तालुक्यातील चाकण येथील औद्योगिक वसाहतीच्या पाचव्या टप्प्यातील सुमारे 637 हेक्‍टर जमीन संपादित करण्यासाठी 700 कोटींवर खर्च येत आहे. लॉकडाउन काळात मार्च महिन्यात जमीन संपादनासाठी दोनशे कोटी रुपये देण्यात आले आहेत. आतापर्यंत तीनशे कोटींवर रक्कम संपादनासाठी शेतकऱ्याच्या मोबदल्यासाठी देण्यात आली आहे.

संपादन व मोबदल्याचे वाटप करण्याची प्रक्रिया खेडचे प्रांताधिकारी राबवीत आहेत. लॉकडाउन काळातही एमआयडीसीने जमिनीच्या संपादनासाठी निधी दिला आहे, अशी माहिती एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल यांनी "सकाळ'ला दिली. 

चाकण औद्योगिक वसाहतीच्या पाचव्या टप्प्यात सुमारे दीड हजार एकरावर चाकणसह पाच गावांतील जमीन संपादित करण्यात येत आहे. कोरोना साथीनंतर लॉकडाउनमुळे संपादनाला उशीर झाला आहे. त्यामुळे सहा महिन्यांचा कालावधी वाढला आहे. प्रांताधिकारी संजय तेली यांनीही शेतकऱ्यांना मोबदल्याचे वाटप लवकर केले जाईल, असे स्पष्ट केले आहे. ज्या जमिनीचे मालकीचे वाद आहेत, त्या जमिनीचे आणि आंबेठाण गट क्रमांक 812 मधील मोबदल्याचे वाटप केले जात नाही. 

ऑटोमोबाइल लॉजीस्टिक पार्क 
या टप्प्यात खासगी कंपन्यांना ऑटोमोबाइल लॉजीस्टिक पार्क उभारण्यासाठी जागा देण्यात येणार आहे. अनेक अमेरिकन, जर्मनी, जपान व इतर राष्ट्रातील ऑटोमोबाइल क्षेत्रातील कंपन्या येथे येण्यास उत्सुक आहेत. हजारो कोटींची गुंतवणूक विविध कंपन्यांच्या प्रकल्पाच्या माध्यमातून होणार आहे. लाखो जणांना रोजगार उपलब्ध होतील व इतर व्यवसाय, छोट्या कंपन्यांना चालना मिळेल. त्यामुळे पुढील काळात चाकण औद्योगिक वसाहत वेगाने विस्तारेल, आर्थिक विकास होण्यास मदत होईल. 

औद्योगिक वसाहतीच्या पाचव्या टप्प्याला गती देण्यासाठी एमआयडीसीने 200 कोटी रुपये लॉकडाउनच्या काळात दिले आहेत. येत्या काही महिन्यात जमीन संपादित झाल्यानंतर कंपन्यांची मागणी राहील. 
- अविनाश हदगल, प्रादेशिक अधिकारी, एमआयडीसी 

पाचव्या टप्प्याच्या जमीन संपादनामुळे तसेच बहुराष्ट्रीय कंपन्या येणार असल्याने शेतकरी, गुंतवणूकदार यांचा आर्थिक विकास होईल. तसेच रोजगार उपलब्ध होऊन अर्थचक्राला गती मिळेल. परिसरातील जमिनीचे भाव वाढतील. 
- राजेंद्र गायकवाड, उद्योजक 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Kesari News : महाराष्ट्र केसरीत थरार शिगेला; जय, हर्षवर्धन, महेंद्र व सिकंदर अंतिम फेरीत

Power Supply Interrupted : सात हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित; महावितरणकडून वसुली करण्यावर जोर

Iran-America War: इराणमध्ये अडकून पडलेल्या कच्च्या तेलाच्या विक्रीचा मार्ग मोकळा; अमेरिकेकडून निर्बंध मागे

Electric Bus : इलेक्ट्रिक बस ठरताहेत ‘पांढरा हत्ती’; सुमारे तीन हजार कोटींच्या मदतीसाठी महामंडळाचे साकडे

Ashok Kharat Files : भोंदू खरातची दिवसभर कसून चौकशी; नीरजकडून महत्त्वाची माहिती; मोबाईल, सीडीआर मागवला

SCROLL FOR NEXT