Zambia_Fraud
Zambia_Fraud 
पुणे

झांबियातील दोन भारतीयांनी पुण्यातील व्यावसायिकाला घातला पावणेदोन कोटींचा गंडा!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शालेय वह्या, पीव्हीसी पाईप, सॅनिटायझर, इलेक्‍ट्रीकल वस्तू मागवून घेत त्याचे पैसे न देता शहरातील एका व्यावसायिकाची पावणेदोन कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. झांबियात व्यावसायिक असलेल्या दोन भारतीयांनी हा गंडा घातला आहे. 

या प्रकरणी डेक्कन पोलिस ठाण्यात दोघांविरुद्  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एजाज रियाज शेरकर (वय ४९, मूळ रा. भंडारी लॅण्डमार्क, कोंढवा) आणि प्रवीण वसंत माटे (मूळ रा. शोभा पार्क, कर्वेनगर) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी विकास मनोहर सावंत (वय ५९, रा. मॉडेल कॉलनी) यांनी फिर्याद दिली आहे.

फिर्यादी यांचा 'इंडवे इंटरनॅशनल' नावाचा आयात-निर्यात व्यवसाय आहे. ते पत्नीसह भागीदारीमध्ये घरातूनच हा व्यवसाय करतात. त्यांची शेरकर बरोबर २०१६ मध्ये ओळख झाली होती. शेरकर याने झांबिया येथे रहाण्यास असून भारतातून वेगवेगळ्या मालाची आयात करुन विक्री करत असल्याचे सांगितले होते. त्यांनी फिर्यादीकडे भारतातून माल निर्यात करण्याचा प्रस्ताव ठेवला होता.

शेरकर याने वारंवार फिर्यादीशी संपर्क ठेवत त्यांना निर्यातीचा व्यवसाय करण्यास भाग पाडले. शेरकर याच्या मागणीनुसार फिर्यादीने प्रथम सांगली येथील एका कारखानदाराकडून शालेय वह्यांची निर्यात केली. त्यानुसार त्यांनी झांबिया येथील 'समृध्दी इनव्हेसमेंट लि.' या कंपनीला माल पाठवला. प्रथम एक कंटेनर पाठवल्यानंतर त्यांना खरेदी ऑर्डरवर माटे यांची स्वाक्षरी आढळली. याची विचारणा करता शेरकर याने माटे कंपनीचा मालक असल्याचे सांगितले.

यानंतर शेरकर आणि माटे यांनी फिर्यादीला इलेक्‍ट्रीकल वस्तूंची झांबियात चांगली मागणी असल्याचे सांगत त्या पाठवण्यास प्रवृत्त केले. तसेच पीव्हीसी पाईप आणि फिटींगचीही ऑर्डर दिली. फिर्यादी यांनी जवळपास सात वेगवेगळ्या मालाचे कंटेनर आरोपींना पाठवून दिले आहेत. यातील काही मालाची रक्कम दिल्यानंतर उर्वरीत एक कोटी ६३ लाख ४९ हजार १३० रुपये अद्यापर्यंत दिले नाहीत. 

फिर्यादीसह आठ जणांची फसवणूक : 
फिर्यादी यांनी वारंवार तक्रार केल्यावर आरोपी त्यांना पुण्यात भेटले होते. त्यावेळी शेरकरने प्रथम वाई येथील जमीन नावावर करुन देण्याचे आणि नंतर कर्ज काढून रक्कम देण्याचे आश्‍वासन दिले. मात्र अद्यापपर्यंत फिर्यादीला रक्कम न मिळाल्याने फसवणूकीची तक्रार दाखल केली. याप्रकारे आरोपींनी फिर्यादीबरोबर इतर आठ जणांचीही फसवणूक केली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT