Uber resume services from Lohegaon Airport 
पुणे

पुणेकरांसाठी गुडन्यूज! लोहगाव विमानतळावरून उबेरची कॅब सर्व्हिस पुन्हा सुरू

सकाळवृत्तसेवा

पुणे : लोहगाव विमानतळावरून प्रवाशांसाठी उबरने कॅब सेवा मंगळवारपासून सुरू केली.  देशांतर्गत विमानसेवा सुरू झाल्याने कंपनीने ही घोषणा केली आहे.  प्रवाशांना उबर-गो, उबर प्रीमिअर आणि उबर एक्सएलच्या माध्यमातून सुरक्षित आणि सरकारने आखून दिलेल्या नियमांनुसार विमानतळावरून  प्रवास करता येईल.


पुण्याच्या इतिहासातील 'ती' काळी तारीख...ढगफुटी...आंबिल ओढा..अन्...  

प्रवासी आणि चालक भागीदारांची सुरक्षा अधिक वृद्धिंगत करण्यासाठी पुणे विमानतळ येथे पुणे इंटरनॅशनल एअरपोर्ट यांच्यासोबत भागीदारीत एअरपोर्ट सॅनिटायझेशन हब्स सुरू करण्याचीही घोषणा उबरने केली आहे.या भागीदारीतून सर्व गाड्या प्रत्येक ट्रिपपूर्वी निर्जंतूक केल्या जातील. त्यासाठी अत्याधुनिक साधने आणि जंतुनाशके वापरून ऊबर पिकअप झोन्समध्ये प्रवासी आणि चालकांसाठी उच्च दर्जाची सुरक्षितता पाळली जाणार आहे.

पुणे- मुळशी प्रवास करताय? सावधान..

या बद्दल उबर इंडिया अॅण्ड साऊथ एशियाच्या सेंट्रल ऑपरेशन्सचे प्रमुख पवन वैश म्हणाले, "शहरे आता खुली होऊ लागली आहेत आणि लोक आता प्रवास करू लागले असताना आपले प्रवासी आणि चालक यांना  सुरक्षा देण्यास उबर बांधिल आहे. गेल्या काही महिन्यात आम्ही आमच्या सुरक्षा पद्धती आणि उत्पादन अनुभवात सातत्याने सुधारणा करत आहोत. प्रवासी आणि चालकांमध्ये असलेला दृढ विश्वास अधिक बळकट करत कोणत्याही प्रकारे लागण होण्याचा धोका कमी करण्याचा प्रयत्न यातून केला जात आहे. 

.असं काय झालं ज्यामुळे पुणेकर पोलिसांसोबत भिडले!​

मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट प्रायव्हेट लिमिटेड (एमआयएएल) आणि पुणे इंटरनॅशनल एअरपोर्टसोबत भागीदारी करून उभारण्यात आलेली सॅनिटायझेशन हब्स आमचे प्रवासी आणि चालक यांना अत्यंत आवश्यक असलेली सुरक्षेची खात्री आणि मन:शांती देऊ करतील, असा आमचा विश्वास आहे."

बाळ पाळण्यात अन् कोरोनाबाधित आई दवाखान्यात, ग्रामपंचायत महिला कर्मचाऱ्यांनी...

या सॅनिटायझेशन हब्समध्ये संपर्करहित सेवा असेल. तसेच उबरतर्फे प्रवाशांना डिजिटल आणि संपर्करहित पेमेंटचेही पर्याय देण्यात येत आहेत. उबरच्या धोरणांनुसार, चालक आणि प्रवासी दोहोंसाठी मास्क बंधनकारक आहेत. निर्जंतुकीकरण केलेल्या गाडीचे दरवाजे आणि मागील दार चालकच उघडेल त्यामुळे प्रवाशांचा कमीतकमी स्पर्श होईल. तर प्रवाशांनी आपले सामान स्वत:च सांभाळणे अपेक्षित आहे.

बाळ पाळण्यात अन् कोरोनाबाधित आई दवाखान्यात, ग्रामपंचायत महिला कर्मचाऱ्यांनी...

ऊबर वापरणाऱ्या प्रत्येकाला, प्रत्येक वेळी सुरक्षित असा नवा उत्पादन अनुभव मिळावा यासाठी ऊबरची तंत्रज्ञान आणि सुरक्षा टीम अहोरात्र काम करत आहे. ऊबरने सर्वसमावेशक अशा सुरक्षा उपाययोजना सादर केल्या आहेत. यात गो ऑनलाइन चेकलिस्ट, चालक आणि प्रवाशांसाठी सक्तीचे मास्क, ट्रीपच्या आधी चालकांनी मास्क व्हेरिफिकेशन सेल्फी पाठवणे, कोविड-19 संदर्भात सुरक्षा नियमांचे सक्तीचे चालक प्रशिक्षण आणि चालक आणि प्रवाशी अशा कोणालाही सुरक्षित न वाटल्यास ट्रिप रद्द करण्याची सोय अशा बाबींचा समावेश आहे.

तरुणांनो, आता ग्रामीण भागातच मिळणार रोजगार

या उपायांना पुरक उपक्रम म्हणून उबरतर्फे त्यांच्या चालक भागीदारांना तीन दशलक्ष मास्क आणि जंतुनाशके तसेच सॅनिटायझर्सच्या दोन लाख बॉटल्स मोफत वाटण्यात येत आहेत, असे कंपनीने म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: आषाढी एकादशी निमित्तानं कल्याण इथल्या बिर्ला महाविद्यालयात ज्ञान दिंडी सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहभाग

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT