Shivsena workers pelted stones at uday samant convoy at Katraj in Pune  sakal
पुणे

उदय सामंत हल्ला प्रकरणी आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी

सकाळ डिजिटल टीम

पुणे : शिवसेनेतील शिंदे गटाचे नेते उदय सामंत हे मुख्यमंत्र्यांसोबत काल पुणे दौऱ्यावर असताना शिवसैनिकांनी कात्रज भागात त्यांच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्याप्रकरणी पोलिसांनी काही आरोपींना अटक केली होती. त्यानंतर या आरोपींना ३ दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपीमध्ये शिवसेना शहरप्रमुखाचा सामावेश आहे.

हल्ला प्रकरणात अटक केल्यावर आरोपीवर ३५३, १२०, ३०७, ३३२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. बबन थोरात, शहराध्यक्ष संजय मोरे आणि त्यांच्याव्यतिरिक्त ३ जणांना पोलिस कोठडी देण्यात आली आहे. दरम्यान, आज पोलिसांनी काही जणांना अटक करून त्यांना पुणे सत्र न्यायालयात हजर केले होते.

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदें काल पुणे दौऱ्यावर असताना त्यांच्या सोबत शिंदे गटातील नेते होते. काल संध्याकाळच्या सुमारास मुख्यमंत्री शिंदे यांच्यासोबत उदय सामंत हे देखील मुंबईच्या दिशेने जात होते. त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या समर्थकांनी त्यांचा गाडीवर हल्ला केला आहे. गद्दार-गद्दार असं म्हणत शिवसैनिकांकडून उदय सामंत यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला. काल कात्रज भागात आदित्य ठाकरे यांचीदेखील सभा होती. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शिवसैनिक या भागात जमले होते. या हल्ल्यानंतर पोलिसांनी जमलेल्या जमावावर सौम्य लाठीमार केला होता.

या हल्ल्यानंतर उदय सामंत यांनी मध्यरात्री ट्विट करत आपली पहिली प्रतिक्रिया व्यक्त केली होती. "गद्दार म्हणता तरी शांत आहे... शिव्या घालता तरी शांत आहे.. आई वडिलांना शिव्या घातल्यात तरी शांत आहे.. लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल.. शांत आहे म्हणजे हतबल आणि असह्य नाही..काळ ह्याला उत्तर आहे.. अंत पाहू नका.. जय महाराष्ट्र" असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT