Uday_Samant 
पुणे

महिलेशी असभ्य वर्तन प्रकरणी माने यांची चौकशी करणार; सामंत यांनी दिले आश्वासन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : उच्च शिक्षण संचालक कार्यालयातील महिला कर्मचाऱ्यांशी संचालक डॉ. धनराज माने यांनी असभ्य भाषेत वर्तन केल्याच्या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जाईल, असे आश्वासन राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. तसेच माने यांनी दिलगिरी व्यक्त केल्याने त्यांच्या विरोधातील आंदोलन कर्मचाऱ्यांनी मागे घेतले आहे. 

डाॅ. धनराज माने यांनी त्यांच्या कार्यालयातील मुख्य लिपीत स्वाती वेदपाठक यांना २९ ऑक्टोबर रोजी कार्यालयातील कामकाजावरून अपशब्द वापरले होते. त्यामुळे कार्यालयातील कर्मचारी सोमवारी (ता.२) कामावर येताच त्यांनी माने यांच्यावर कारवाई करा, अशी मागणी करत काम बंद आंदोलन सुरू केले. वेदपाठक यांनी याविरोधात उच्च शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिवांकडे तक्रार केली होती. माने यांच्यावर कारवाई झाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेतले जाणार नाही, असा इशारा कर्मचारी संघटनेने दिलेला होता. 

या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग सरकारी कर्मचारी महासंघासोबत बैठक घेतली. त्यामध्ये झालेला प्रकार ऐकून घेत या प्रकरणाची निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी केली जाईल, असे आश्वासन कर्मचाऱ्यांना देण्यात आले. तसेच माने यांच्याकडून संचालक कार्यालयातील कोणत्याही कर्मचाऱ्यावर तेरावी अरेरावी व द्वेषपूर्ण वागणूक दिली जाणार नाही असेही सांगितले. डॉ. धनराज माने यांनी महिलेसोबत असभ्य वर्तन केल्याचे मान्य करून याबाबत दिलगिरी व्यक्त केली.

महाराष्ट्र राज्य शिक्षण विभाग सरकारी कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष राम टाकळकर यांनी पत्रक काढून माहिती दिली आहे. उदय सामंत यांनी दिलेल्या आश्वासनाचा मान राखण्यासाठी आणि उच्च शिक्षण संचालक कार्यालयातील कामाचा होत असलेला खोळंबा, विद्यार्थी हिताचा विचार करून हे आंदोलन मागे घेत असल्याचे टाकळकर यांनी निवेदनात नमूद केले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Miraj Shinde vs Thackeray Group : मिरजेत ठाकरे-शिंदे गटात कमानी ‘युद्ध’; दिशा सालियन प्रकरणाला ‘गद्दारी’वरुन प्रत्‍युत्तर, पोलिस परवानगीने आश्चर्य

Kolhapur Ganesh Idol Collapse : कोल्हापुरात मानाची २१ फुटी गणेशमुर्ती कोसळली, वीजवाहिनीचा धक्का लागला अन् गोखले कॉलेज चौकातील घटना

Bomb Detection Squad Miraj : मिरजेत गणेश विसर्जन मिरवणुकीवेळी अचानक बॉम्ब शोधक पथक, श्वानपथकाकडून मिरवणूक मार्गाची तपासणी; शहरातील प्रमुख मार्ग बंद

Maharashtra Ganesh Visarjan Live: जवखेडा ठोंबरे येथे शेतकरी संवाद सभा

Bhiwandi News: माझ्या मुलाला फाशी द्या! भिवंडीतील हाय-प्रोफाईल सामूहिक अत्याचाराच्या प्रकरणात आईची मागणी

SCROLL FOR NEXT