Uncle stabbed his nephew Uncle stabbed his nephew
पुणे

मोबाईल आणला नाही म्हणून काकाने केला पुतण्यावर चाकू हल्ला

पीयूषने मोबाईल आणून दिला नाही, यामुळे चिडलेल्या संजयने त्याच्या पोटावर चाकूने वार केले

सकाळ डिजिटल टीम

पुणे : दुसऱ्या खोलीतून फोन आणण्यास नकार दिल्याने काकाने आपल्या पुतण्यावर चाकूने जीवघेणा हल्ला (Knife attack) केला. पोलिसांनी आरोपी काकाला अटक केली आहे. काका आणि पुतण्या पुण्यातील मार्केट यार्ड परिसरात एकाच घरात राहतात. पीयूष दीपक शर्मा (वय १७) असे जखमी पुतण्याचे नाव आहे. संजय गोकुळ परदेशी (वय ३८) असे आरोपी काकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पीयूष, संजय व आजी हे तिघेही मार्केट यार्डातील आनंदनगर परिसरात राहतात. संजय हा मजुरीचे काम करतो. पीयूष हा संजयचा पुतणा आहे. त्याचे आई-वडील वेगळे राहतात. तो आजी आणि काकांकडे राहतो. संजयने पुतण्यावर हल्ला केल्याची तक्रार मीना परदेशी (वय ६५) यांनी पोलिस ठाण्यात दिली, अशी माहिती प्रकरणाचा तपास करणारे मार्केट यार्ड पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक युवराज शिंदे (Pune) यांनी सांगितले.

रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास संजयने ने पीयूषला दुसऱ्या खोलीतून मोबाईल घेऊन येण्यास सांगितले. मात्र, पीयूषने मोबाईल आणून दिला नाही. यामुळे चिडलेल्या संजयने त्याच्या पोटावर चाकूने वार (Knife attack) केले. सध्या पीयूषची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ३०७, ५०४ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७(१)(३) अन्वये १३५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Zilla Parishad Panchayat Samiti Election result Live Update: पुणे जिल्ह्याची अजितदादा पवारांना साथ! प्राथमिक निकालांमध्ये स्पष्ट आघाडी, सुजाता पवार विजयी

Kolhapur Zilla Parishad : शिरोळमध्ये यड्रावकर गटाला धक्का! दानोळीत राजू शेट्टींनी गड राखला, सातवेत राष्ट्रवादीचा मोठा विजय, राधानगरी तालुक्यात आबिटकरांना पहिला धक्का

Pune ZP, Panchayat Samiti Result : पुणे जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीने बहुमताचा आकडा ओलांडला, पुण्यात कुठे कसा निकाल?

Solapur ZP election Results: माजी आमदार राम सातपुतेंची पत्नी विजयी, उत्तम जानकरांच्या मुलाचा पराभव; विधानसभेच्या पराभवाचा वचपा काढला

Kankavli Zilla Parishad Election Results : कणकवलीत शिंदेंच्या शिवसेनेचे वर्चस्व! रफिक नाईक ठरले 'टफ फायटर', पण विजय गुरुप्रसाद शिंदेंचाच; रामचंद्र राऊत तिसऱ्या क्रमांकावर

SCROLL FOR NEXT