Vidhan Sabha 2019 bjp leader chandrakant patil attends rss shastr pujan kothrud pune
Vidhan Sabha 2019 bjp leader chandrakant patil attends rss shastr pujan kothrud pune 
पुणे

Vidhan Sabha 2019 : चंद्रकांत पाटील यांची अचानक संघाच्या गणवेशात एन्ट्री

विनायक बेदरकर : सकाळ वृत्तसेवा

पुणे : निवडणुकीच्या धामधुमीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संभाजी भागाच्या वतीने आयोजित शस्त्र पूजन कार्यक्रमाला, कोथरूड मतदारसंघातील उमेदवार व भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अचानक संघाच्या गणवेशात एन्ट्री करत शस्त्रपूजन करून संघ परंपरा जोपासली.

चंद्रकांत पाटील यांनी विशेष उपस्थिती लावत संघ गणवेशात पारंपरिक पद्धतीने शस्त्रपूजन करून संघाच्या कार्यक्रमाला हजेरी लावली. या वेळी प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय समरसता गतीविधी मंडळ सदस्य रमेश आढाव, रमेश पांडव, सुधीर जवळेकर तसेच संभाजी भाग कार्यवाहक उपस्थित होते. राज्यामध्ये निवडणूक प्रचार रंगात आला असताना पाटील यांनी संघाच्या कार्यक्रमाला आवर्जुन हजेरी लावत आपण संघाचे शिस्तप्रिय स्वयंसेवक असल्याचे दाखवले.

चंद्रकांत पाटील यांच्या उमेदवारीला विरोध
कोथरूड मतदारसंघात ब्राह्मण संघटनांचा चंद्रकांत पाटील यांना होत असलेला विरोध लक्षात घेता कोथरूडमधील संघाच्या शस्त्र पूजनाच्या कार्यक्रमाला पाटील यांनी लावलेली उपस्थिती चर्चेची ठरणार आहे. चंद्रकांत पाटील हे बाहेरचे उमेदवार असल्याचे सांगत काहीजण त्यांना कोथरूडमध्ये विरोध करत आहेत. यामुद्द्यावरून ब्राह्मण महासंघात फूट पडली आहे. यासगळ्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी शस्त्रपूजनाला संघाच्या वेशात लावलेली हजेरी त्यांना फायद्याची ठरेल, असे बोलले जात आहे.

आठवणींना मिळाला उजाळा
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पार्टी यांचा अतिशय प्रामाणिक सेवक म्हणून चंद्रकांत दादा पाटील यांचा लौकिक आहे. त्याचीच प्रचिती आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुन्हा पहायला मिळाली. कोथरूडमध्ये एमआयटी संस्थेच्या मैदानावर विजयादशमी व शस्त्रपूजन उत्सव संपन्न झाला. या कार्यक्रमात चंद्रकांत पाटील इतर शिस्तबद्ध स्वयंसेवकाप्रमाणे सहभागी होताना पाहून, अनेकांच्या भुवया उंचावल्या. पण, पुण्यात चंद्रकांत पाटील यांनी संघाचे काम केले आहे. तीन दशकांहून अधिक काळ पुण्यातील कार्य वाटचालीतील आठवणींना या वेळी उजाळा देण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : लखनौ सुपर जायंट्सने नाणेफेक जिंकली; मुंबईसाठी करो या मरो सामना

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT