vidhan sabha 2019 bjp leader chandrakant patil to contest from kothrud pune
vidhan sabha 2019 bjp leader chandrakant patil to contest from kothrud pune 
पुणे

Vidhan Sabha 2019:चंद्रकांत पाटील का खेळतायत पुण्यातून 'सेफ गेम'?

सकाळ डिजिटल टीम

पुणे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे पुण्यातील कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणार असल्याची माहिती मिळाली आहे. याबाबत अद्याप भाजपकडून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. पण, कोल्हापूरचे चंद्रकांत पाटील, पुण्यातून का निवडणूक लढवत आहेत, असा प्रश्न निर्माण होत आहे.

निवडणूक लढवणे आवश्यक
चंद्रकांत पाटील यांचे मूळ गाव कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना-भाजप स्वतंत्र लढले. त्यात कोल्हापुरातून शिवसेनेचे सहा आमदार निवडून आले. त्यात भुदरगड तालुक्यातील प्रकाश आबिटकर यांचाही समावेश होता. चंद्रकांत पाटील यांनी या मतदारसंघासाठी सुरुवातीला चाचपणी केली. पण, आबिटकर आणि शिवसेना हा मतदारसंघ सोडायला तयार होणे शक्य नव्हते. काही काळ चंद्रकांत पाटील यांनी कोल्हापूर उत्तर या शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांच्या मतदारसंघासाठीही प्रयत्न केले. पण, दोन वेळा निवडून आलेले क्षीरसागर मतदारसंघ सोडणे शक्यच नव्हते. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांना स्वतःसाठी मतदारसंघ शोधणे आणि तो निवडून येण्यासाठी तितकाच सेफ असणे महत्त्वाचे होते. अर्थात पुण्यातील कोथरूड हा भाजपचा सर्वांत सुरक्षित मतदार संघ असल्याने त्याची निवड झाल्याचे बोलले जाते. प्रदेशाध्यक्ष असल्याने चंद्रकांत पाटील यांना निवडणूक लढवणे आवश्यक आहे. मतदारसंघ नाही म्हणून, त्यांना मागे हटता येणार नव्हते. त्यामुळेच अखेर त्यांनी कोथरूडची निवड केल्याचे बोलले जाते.

काय आहेत कोथरूडची गणितं?
२०१४च्या निवडणुकी भाजप मेधा कुलकर्णी या मतदारसंघातून ६४ हजार मतांच्या लीडने निवडून आल्या होत्या. त्यांच्या आधी कोथरूडमधून शिवसेनेचे चंद्रकांत मोकाटे २००९च्या विधानसभा निवडणुकीत निवडून आले होते. त्यापूर्वी हा मतदारसंघ अस्तित्वात नव्हता. या मतदारसंघात मनसेचीही काही हक्काची मतं आहेत. मनसेच्या उमेदवाराला २००९मध्ये ४४ हजार आणि २०१४मध्ये २१ हजार मते घेतली होती. भाजपसाठी सुरक्षित मतदारसंघ असला तरी, चंद्रकांत पाटील यांच्याना तेथे संघर्ष करावा लागेल, असेही बोलले जाते.

पहिल्यांदाच लोकांमधून निवडून जाणार?
चंद्रकांत पाटील हे मुळचे कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील आहेत. त्यांचे वडील मुंबईत मिल कामगार होते. त्यामुळं पाटील याचं बालपण आणि महाविद्यालयीन शिक्षण मुंबईतच झालं. पण, कोल्हापूरशी त्यांची नाळ कायम होती. अखील भारतीय विद्यार्थी परिषदेतून त्यांनी काम सुरू केलं. पुढं प्रमोद महाजन, नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली त्यांनी भाजपचं काम सुरू केलं. सुरुवातील भाजपच्या प्रदेश सरचिटणीस पदाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यानंतर २००९ आणि २०१४मध्ये पुणे पदवीधर मतदारसंघातून चंद्रकांत पाटील विधान परिषदेवर निवडून गेले. आजवर चंद्रकांत पाटील एकदाही लोकांमधून निवडून कोणत्याही सभागृहात गेलेले नाहीत. त्यामुळं पुण्यातील कोथरूडमधून ते पहिल्यांदा लोक प्रतिनिधींच्या सभागृहात जाणार का?, याची उस्तुकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwal: नायब राज्यपालांकडून केजरीवाल पुन्हा टार्गेट! खलिस्तान्यांकडून पैसा घेतल्याची केली NIAकडं तक्रार

Team India Jersey: T20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडिया दिसणार नव्या रुपात, नवी जर्सी झाली लाँच; पाहा Video

IPL 2024 MI vs SRH Live Score: हार्दिक-चावलाने पाडलेलं हैदराबादच्या फलंदाजीला खिंडार, पण कॅप्टन कमिन्स फटकेबाजीने मुंबईसमोर 174 धावांचं लक्ष्य

Hires Women to Seduce Men: पबमध्ये पुरुषांना भुरळ घालण्यासाठी महिलांची नियुक्ती; पोलिसांच्या छाप्यात धक्कादायक प्रकार उघड

Sunita Williams News : अभिमानास्पद! सुनीता विल्यम्स पुन्हा घेणार अंतराळात झेप; सोबत नेणार भगवद्‍गीता अन् 'ही' खास मूर्ती

SCROLL FOR NEXT