politics sakal
पुणे

विधानसभेची जागा काँग्रेस स्वबळावर लढवणार : विजय वट्टेडीवार

इंदापूर तालुका हा काँग्रेसला मानणारा तालुका आहे मात्र मध्यंतरी काही अनपेक्षित घडामोडी घडल्यामुळे काँग्रेसचा जनाधार कमी झाला आहे. मात्र पक्षाने इंदापूर तालुक्यावर लक्ष केंद्रित केले आहे.

डॉ. संदेश शहा

इंदापूर : इंदापूर तालुका हा काँग्रेसचा बालेकिल्ला असून येणाऱ्या विधानसभेची जागा काँग्रेस पक्ष स्वबळावर लढवणार असल्याची प्रतिक्रिया काँग्रेस नेते आणि राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वट्टेडीवार यांनी दिली. मंत्री वट्टेडीवार हे पूर्वनियोजित सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना इंदापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे काही वेळ थांबले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवादसाधत विधानसभा लढविण्याचे सूतोवाच केले.

मंत्री वट्टेडीवार पुढे म्हणाले, इंदापूर विधान सभा काँग्रेस पक्ष शंभर टक्के लढवणारअसून तालुक्यात पक्षसंघटन मजबूत होणे गरजेचे आहे. इंदापूर तालुका हा काँग्रेसला मानणारा तालुका आहे मात्र मध्यंतरी काही अनपेक्षित घडामोडी घडल्यामुळे काँग्रेसचा जनाधार कमी झाला आहे. मात्र पक्षाने इंदापूर तालुक्यावर लक्ष केंद्रित केले आहे. सध्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेस पक्षाला जोरदार पाठिंबा मिळत असून काँग्रेस पक्ष मजबुतीने उभा होतआहे.त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेस पक्ष नंबर एकचा पक्ष राज्यात असेल असे सूतोवाच मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.

यावेळी विधान परिषदेचे माजी आमदार रामराव वडकुते,काँग्रेसचे तालुकाध्यक्ष स्वप्नील सावंत,तालुका काँग्रेस उपाध्यक्ष आबासाहेब निंबाळकर,डॉ.संतोष होगले, इंदापूर विद्यार्थी संघटना अध्यक्ष शंभूराजे साळुंखे, निवास शेळके, महादेव लोंढे, दत्तात्रेय देवकर यांसह अन्य उपस्थित होते.

आमदार संजय जगताप, प्रदेशाध्यक्ष नानासाहेबपटोले यांनी यापूर्वीच इंदापूर काँग्रेसच्या जागेवर हक्क सांगून इंदापूर विधानसभा लढविण्याचे सूतोवाच केले आहे. त्यानंतर मंत्री विजय वट्टेडीवार यांनी देखील त्याचीच री ओढल्याने महाविकास आघाडीत सर्वकाही आलबेल नाही. आपला पक्ष वाढविण्याचे सर्वांना अधिकार आहेत मात्र एकाच मंत्रिमंडळात काम करत असताना काँग्रेस नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार व त्यांचे कट्टर कार्यकर्ते तथा राज्याचे सामान्यप्रशासन राज्य मंत्री दत्तात्रय भरणे यांना उघड उघड आव्हान देत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राजकारणात आज मित्र असलेले येत्या विधानसभा निवडणुकीत शत्रू होणारअसल्याचे संकेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतीय संघातून वगळले, म्हणून Rinku Singh पेटला! २४० च्या स्ट्राईक रेटने स्फोटक खेळी; समीर रिझवी, माधव कौशिक यांचेही अर्धशतक

Year End 2025: 'हे' हेल्थ ट्रेंड राहिले सर्वाधिक चर्चेत, जाणून घ्या काय आहे खास

Latest Marathi News Live Update : दत्तजयंती, मार्गशीर्ष पौर्णिमेच्या संगमाला सुपरमून, आकाशात दुर्मिळ असा तेजस्वी चंद्र दिसणार

Kolhapur News : दौलत-अथर्व कारखान्याकडून उसाला ३५०० दर जाहीर; स्वाभिमानींच्या सातत्यपूर्ण लढ्याला मिळाला यश

Indigo Emergency Landing : अहमदाबाद विमानतळावर 'इंडिगो' विमानाचे आपत्कालीन लँडिंग; बॉम्बच्या धमकीने उडाली खळबळ!

SCROLL FOR NEXT