warkari 
पुणे

वारकरी सांप्रदाय आहे सर्वांपेक्षा वेगळा

प्रज्ञेश मोळक (साकू)

पुणे - वारकरी सांप्रदाय हा मुळातच लवचिक असणारा समाज आहे. आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास होणार नाही याची दक्षता घेणारा वारकरी सांप्रदाय म्हणूनच सर्वांपेक्षा वेगळा ठरतो. आज जगात जे काही कोरोनाचे संकट आहे अन् अशा परिस्थितीत वारी होणार की नाही? होणार तर कशी होणार? यावर चर्चा, संवाद व बैठका झाल्या. त्यात वारकरी सांप्रदायातील काही मानकरी, सेवेकरी, दिंडीकरी, विविध संस्थानचे विश्वस्त व सरकारने ज्यांच्या त्यांच्या भूमिका मांडल्या आणि निर्णय घेण्यात आला. तो निर्णय काहींनी हसतमुख राहून स्वीकारला तर काहींनी दु:खद अंतकरणाने निर्णयाचे स्वागत केले.

सांप्रदाय म्हणजे खूप मोठा समाज आहे. वेगवेगळ्या भूमिका असू शकतात आणि असतीलही. तीच विविधता तर भारताची शान आहे. ज्या-त्या वेळेस आपल्या सगळ्यांना त्या लोकांच्या विभिन्न भूमिका दिसतात अन् पुढेही दिसत राहतील. परंतु लोकशाही पद्धतीने सांप्रदायातील जाणकार मंडळींनी त्यांचे प्रश्न उपस्थितीत करुन, सूचना व उपाय सुचविले आणि सरकार जो काही निर्णय घेईल तो आम्हाला मान्य असेल असेही वारंवार वारकऱ्यांनी सांगितले. मला वैयक्तिक हे खूपच महत्वाचे वाटते. 

महाराष्ट्रात ३५०-४०० हून अधिक पालखी सोहळे दरवर्षी आषाढीनिमित्त पंढरपूरसाठी निघतात. बहुदा विविध ठिकाणी वेगवेगळ्या परंपरा असतात, निरनिराळे प्रश्न असतात. त्या आपल्यासारख्या सामान्य माणसांना माहिती नसतात, कळत नाहीत किंवा त्यापासून आपण लांब असतो. अशा वेळेस जास्ती व्यक्त न होता बघ्याची भूमिका आपण घ्यायला काही हरकत नसते. तीच कधी कधी सोपी असते, नाही का?

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई, एकनाथ, नामदेव व तुकाराम असे ७ प्रमुख पालखी सोहळे मानले जातात. ज्या-त्या ठिकाणचे प्रस्थान वेगवेगळ्या दिवशी असते. प्रवास वेगळा, सोहळा, परंपरा व शिस्त वेगळी असते. साम्य असतं ते म्हणजे सगळ्यांची विठ्ठलाप्रती असलेली श्रद्धा आणि पंढरपूरला जाण्याची ओढ. पण यंदा २०२० ची वारी ही सगळ्यांसाठीच वेगळी असेल व आहे. जगभरात अनेक सण तिथल्या पातळींवर निर्णय घेऊन साजरे केले गेले आणि पुढील काही महिनेही तसंच असेल.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण सारेच एका अभूतपूर्व काळातून जात आहोत हे मान्य करावंच लागेल. त्यात पुन्हा एकदा वारकरी सांप्रदायाच्या लवचिकतेचे अनोखं दर्शन संपूर्ण महाराष्ट्राला पाहायला मिळालं. गेल्या अनेक शतकांपासून वारकरी सांप्रदायाचे योगदान महाराष्ट्राच्या व देशाच्या सांस्कृतिक जडणघडणीच्या इतिहासात मोलाचे अन् महत्वपूर्ण ठरते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Latest Marathi News Updates : पुण्यात महिलेच्या सूपमध्ये सापडले झुरळ

Pratap Sarnaik: आता नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर बसणार कारवाईचा चाप, परिवहन मंत्र्यांचे निर्देश

मराठी नाट्य परिषदेतर्फे खुल्या राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेचं आयोजन; कुठे कराल अर्ज? वाचा नियम व अटी

API Duty: आता उपचार स्वस्त होणार! औषधांच्या किमतीबाबत सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत, कुणाला फायदा?

SCROLL FOR NEXT