water.jpg 
पुणे

पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी : उद्या शहरातील निम्या भागात पाणी पुरवठा राहणार बंद

जागृती कुलकर्णी

सिंहगड रस्ता : अचानक उद्भवलेल्या दुरुस्तीसाठी उद्या (ता. 26) निम्या पुणे शहराचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. पर्वती जलकेंद्र, वडगाव जलकेंद्र आणि नवीन लष्कर जलकेंद्र अखत्यारीतील तीन
हजार मिमी व्यासाच्या रॉ वॉटर पाइपलाइनची दुरुस्ती करायची असल्याने पुणे शहराच्या काही भागाचा पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पर्वती जलशुद्धीकरण केंद्रास तीन हजार मिमी व्यासाची पाइपलाइन फुटली. त्याची दुरुस्ती करण्यासाठी २६ सप्टेंबरला सकाळी नऊ ते रात्री नऊ दरम्यान होणारा पाणी पुरवठा बंद राहणार आहे, अशी माहिती पाणी पुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.
सिंहगड रस्ता परिसरातील पर्वती जलशुद्धीकरण केंद्राच्या पाठीमागे रोहन कृतिका सोसायटीच्या मागील भागात असलेल्या रस्त्याचे काम सुरू आहे. या रस्त्याच्या
कामात जलशुद्धीकरण केंद्रात येणारा पाईप फुटला आहे. त्यामुळे त्याची दुरुस्ती करावी लागणार आहे. त्याचे काम उद्या सुरू राहणार असून २७ तारखेला पाणीपुरवठा नियमित होणार आहे.

खालील जलकेंद्रांतर्गत पाणीपुरवठा बंद राहणार आहे.

लष्कर जलकेंद्र अंतर्गत
कोंढवा, हडपसर, महमदवाडी, काळेपडळ, मुंढवा, केशवनगर, सोलापूर रस्ता, गोंधळेनगर, सातववाडी, हांडेवाडी रस्ता, फुरसुंगी, फातिमानगर, एन. आय. बी. एम, संपूर्ण घोरपडी, बी. टी. कवडे रस्ता, भीमनगर, हडपसर औद्योगिक भाग, वैदुवाडी, रामटेकडी, शिवनेरी नगर, मीठानगर, कोंढवा गावठाण, भाग्योदय नगर इत्यादी.

बंडगार्डन जलकेंद्र अंतर्गत- खराडी आणि चंदन नगर.

पर्वती जलकेंद्रांतर्गत बिबवेवाडी संपूर्ण परिसर, डायस प्लाॅट परिसर, मार्केटयार्ड परिसर, गुलटेकडी परिसर, सहकार नगर परिसर, भवानी पेठ, नाना पेठ, गंज पेठ, महात्मा फुले पेठ, घोरपडी पेठ, मुकुंद नगर, सॅलिसबरी पार्क, महर्षी नगर परिसर, पद्मावती, इंदीरानगर, बालाजी नगर, शिवदर्शन परिसर, तळजाई वसाहत, संभाजी नगर, चव्हाण नगर, धनकवडी, गुलाबनगर, इत्यादी.

वडगाव जलकेंद्र अंतर्गत - हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, धनकवडी, कोंढवा बु. इत्यादी.

एसएनडीटी पंपिंग अंतर्गत 
शिवाजी नगर, सुतारदरा, किष्किंधा नगर,
कोथरुड, गोखले नगर, शास्त्रीनगर, पांडव नगर, रेव्हेन्यू कॉलनी, आपटे रस्ता, घुले रस्ता, इत्यादी. या भागात उद्या पाणी पुरवठा होणार नाही. २७ तारखेला नियमित पाणीपरवठा होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parbhani News : अतिवृष्टीग्रस्त परभणी जिल्ह्यासाठी १२८ कोटींची आर्थिक मदत मंजूर; शेतकऱ्यांना थेट खात्यात जमा होणार नुकसानभरपाई

Pune Heavy Rain: पुण्यात मुसळधार पाऊस! रस्त्यांना नद्यांचं स्वरुप, वाहतूक ठप्प; पुणेकर खोळंबले

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Parner Crime : सातबारा उताऱ्यावर नोंद लावण्यासाठी आठ हजारांची लाच घेताना कामगार तलाठ्याला रंगेहाथ पकडले

Pune Heavy Rain : पाषाण परिसरात मेघगर्जनेसह पावसाची हजेरी; चाकरमान्यांचे हाल, सखल भागात पाणी साचले

SCROLL FOR NEXT