पुणे : शहर आणि परिसरात बुधवारी सकाळपासूनच हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. दुपारी वादळी वाऱ्यासह काही ठिकाणी जोराचा पाऊस कोसळला आहे. पुढील चोवीस तास शहरात जोराच्या वाऱ्यासह ढगांच्या गडगडाटात मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
दुपारी निसर्ग नावाचे तीव्रचक्रीवादळ अलिबाग पासून ५० किलोमीटर दक्षिणेकडील किनारपट्टीला धडकले. तेंव्हा त्याचा ताशी वेग १०० ते १२० किलोमीटर होता. त्याचे परिणामही शहर आणि उपनगरातील हवामानावर जाणवले. जोराचा वारा आणि हलक्या सरीचा वर्षाव होत आहे. मागील चोवीस तासात शिवाजीनगर परिसरात ४४.१, लोहगाव परिसरात ९७.३ आणि पाषाण परिसरात ५१.२ मिलीमीटर पाऊस झाल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे. मंगळवारी संध्याकाळी पडलेल्या मुसळधार पावसामुळे पर्जन्यमानाच्या नोंदी वाढल्या आहेत. चिंचवड आणि परिसरात पावसाची तीव्रता जास्त असेल असेही हवामान विभागाने सांगितले आहे.
पावसामुळे कोरोना धुऊन जातोची ‘व्हायरल’ चर्चा; तज्ञ काय सांगतात?
- बाहेर पडणे टाळा :
तीव्र स्वरूपाच्या चक्रीवादळाचा परिणाम म्हणून जोराचे वारे वाहण्याची शक्यता आहे. किनारपट्टीला धडकताना जरी वाऱ्याचा वेग ताशी १०० किलोमीटरच्या आसपास असेल तरी जमिनीवर प्रवास करताना त्याचा वेग काही अंशी कमी होईल. असे जरी असले तरी सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस यामुळे धोका वाढण्याची शक्यता असते. त्यामुळं दरम्यानच्या काळात नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये, तसेच योग्य ती दक्षता घ्यावी, असे हवामान खात्याने सांगितले आहे.
चक्रीवादळाचा पुणे जिल्ह्यात ठिकठिकाणी असा बसलाय तडाखा
आवश्यकता असल्यास नागरिकांनी मोबाईल, लॅपटॉप आदींच्या बॅटरी फुल चार्ज करून ठेवाव्यात. जेणेकरून विद्युत पुरवठा जरी खंडित झाला तरी समस्या निर्माण होणार नाही.
Video : पुणे : मुसळधार पावसाचा नगर रोडच्या रहिवाशांना फटका...घरात शिरले पाणी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.