Ventilator 
पुणे

पुण्यातील जम्बोची कमाल! ३१ दिवस ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटरवरील महिला अखेर कोरोनामुक्त !

सकाळवृत्तसेवा

पुणे - वयाची पन्नाशी ओलांडेपर्यंत इतके काळेकुट्ट दिवस वाट्याला आले नाहीत; पण एक-दोन नव्हे गेली 31 दिवस क्षणाक्षणाला मरणयातनाच भोगत राहिले. त्या माझा श्‍वासही रोखत राहिल्या... तरीही जगण्याची ओढ थांबत नव्हती... ही ओढ अन्‌ डॉक्‍टरांच्या यशस्वी उपचारांनी मला पुन्हा घरच्यांपर्यंत आणलं...नाही तर घरातल्या मंडळींसोबतचे नाते तुटले असते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

कोरोनाच्या साथीत थरकाप उडविणारा हा अनुभव आहे सलग 31 दिवस ऑक्‍सिजन, आयसीयू (अतिदक्षता विभाग) आणि व्हेंटिलेटरवर असलेल्या संगीता पांढरे यांचा! पुण्यातील "जम्बो कोविड केअर सेंटर'मधील त्या उपचाराने कोरोनामुक्त झाल्या आहे. त्या दौंड तालुक्‍यातील रहिवासी आहे. 

गेल्या महिन्यात पांढरे यांना कोरोनाची लागण झाली अन्‌ त्यांचे कुटुंबीय घाबरले. उपचार खर्चाच्या चिंतेने त्या 31 ऑगस्टला शिवाजीनगरमधील "जम्बो'मध्ये दाखल झाल्या. अन्य आजारामुळे त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर ऑक्‍सिजनचा उपाय करूनही त्या बऱ्या न झाल्याने त्यांना आयसीयू हलविण्यात आले. सलग दहा दिवस राहून त्या उपचाराला साथ देत नसल्याने शेवटचा उपाय म्हणून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवले. पांढरे यांचा जीव वाचविण्यासाठी डॉक्‍टरांची शर्त सुरूच होती. त्यानंतर आठ दिवसांच्या उपचाराने पठारे यांना थोड्याफार बरे वाटू लागले. त्यामुळे डॉक्‍टरांचाही विश्‍वास वाढला. काही दिवसांनी त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. त्यांनतर प्रकृती पूर्णपणे बरी झाल्यानंतर त्यांना घरी सोडण्यात आल्याचे "जम्बो'चे व्यवस्थापक राजेंद्र मुठे यांनी सांगितले. 

कोरोना रुग्णांवर व्यापक उपचार - अग्रवाल 
अत्यवस्थ रुग्णांचे प्रमाण सध्या वाढत आहे. त्यांच्यावर केवळ कोरोनामुक्त होण्या इतके मर्यादित उपचार न करता रुग्णांच्या अन्य आजारांचे निदान करून त्यावर देखील उपचार केले जात आहेत. त्यामुळे रुग्ण कमी कालावधीत कोरोनामुक्त होत असून मृत्यूचेही प्रमाणही कमी झाले आहे. संगीता पांढरे यांना घरी सोडले असले, तरी पुढचे काही दिवस त्यांच्या प्रकृतीवर लक्ष ठेवण्याची जबाबदारी "जम्बो'च्या डॉक्‍टरांची असल्याचे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल यांनी सांगितले. 

कोरोना झाल्यानंतर बेड मिळत नव्हता. त्यामुळे मला "जम्बो'त दाखल केले गेले. कुटुंबीय आणि डॉक्‍टरांमुळे मी बरी होऊ शकले. गेली चार-पाच दिवस कोणताही त्रास नसल्याने मी घरी आले आहे. 
- संगीता पांढरे, कोरोनामुक्त महिला

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Iran war : युद्ध पुन्हा भडकले ! शस्त्रसंधी सुरु असतानाच अमेरिकेचा हल्ला, इराणचाही प्रतिहल्ला; कुवेत ठरलं रणांगण

French Open 2026: चार वेळच्या चॅम्पियनला वाढदिवशीच धक्का! इगा स्विअतेकचा फ्रेंच ओपनमधून अनपेक्षित पॅकअप

Viral Video: RCB च्या विजयानंतर विराट-अनुष्काचा भन्नाट डान्स; VIDEO पाहून चाहते झाले वेडे!

ओबीसी आरक्षणावर गदा, ग्रामपंचायतीच्या रणधुमाळीआधी राज्य निवडणूक आयोगाचे नवे आदेश

Accident News: मराठा आंदोलनातून परतताना काळाचा घाला; सरडेवाडीतील एकाचा मृत्यू, दोघे जखमी

SCROLL FOR NEXT