lo.jpg 
पुणे

'त्या' जागेशी जिल्हा परिषदेचा संबंध नाही : चंद्रशेखर कोऱ्हाळे

रवींद्र पाटे

नारायणगाव : प्राथमिक शिक्षण सेवा संघ नारायणगाव या नावाने असलेली येथील सिटी सर्वे नंबर १४६३ मधील तीस गुंठे जागा २९ जुलै १९६४ रोजी खरेदी केलेली आहे. शाळेसाठी खरेदी केलेल्या या जागेवर पुणे जिल्हा परिषदेला हक्क सांगता येणार नाही. या संदर्भात जमाबंदी आयुक्त व भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्याचे संचालक, पुणे यांनी दिलेला निकाल एकतर्फी आहे. या निकालाच्या विरोधात महसूलमंत्री राज्य शासन यांच्याकडे अपील केले आहे. अशी माहीती शिवाई ज्ञान मंदिर शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर कोऱ्हाळे यांनी पत्रकार परीषदेत दिली.

नारायणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच योगेश पाटे यांनी १४ जानेवारी २०२० रोजी पत्रकार परीषद घेऊन सिटी सर्वे नंबर १४६३ मधील तीस गुंठे जागा जमाबंदी आयुक्त व भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्याचे संचालक,पुणे यांनी दिलेल्या निकालानुसार पुणे जिल्हा परिषदेची झाली असून, या जागेत सुरू असलेल्या शिवाई ज्ञान मंदिर शाळेचे अन्य ठिकाणी स्थलांतर करावे. असे अावाहन केले होते. या मुळे जागेच्या मालकी हक्का संदर्भात कोऱ्हाळे यांनी पत्रकार परीषद घेऊन खुलासा केला.

या बाबत कोऱ्हाळे म्हणाले, ''शाळा सुरू करण्याच्या उद्देशाने पंढरीनाथ कोऱ्हाळे, सोमा कोल्हे यांनी १९६४ साली सिटी सर्वे नंबर १४६३ मधील जागा खरेदी केली होती.दरम्यान १९७० साली ही जागा नारायणगाव ग्रामपंचायतीचे त्या वेळचे सरपंच यांनी 
ग्रामपंचायत दप्तरी जिल्हा परिषद अध्यक्ष ( मराठी शाळा) या नावे केली.या संदर्भात  जिल्हा अधीक्षक भुमीलेख यांच्याकडे अपील केले होते. सुनावणीच्या वेळी जिल्हा परिषद अध्यक्ष तर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना जागे संदर्भात कोणतीही कागदपत्रे सादर करता आली नाहीत.या मूळे  जिल्हा अधीक्षक भुमीलेख  यांच्या निकाला नुसार ही जागा २६ मे २०११ रोजी प्राथमिक शिक्षण सेवा संघ या नावे करण्यात आली.

दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष तर्फे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी या निर्णयाच्या विरोधात जमाबंदी आयुक्त व भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्याचे संचालक,पुणे यांच्याकडे अपील केले होते. जमाबंदी आयुक्त व भूमी अभिलेख महाराष्ट्र राज्याचे संचालक,पुणे  यांनी आम्हाला सुनावणी संदर्भात कोणतीही माहीती न देता एकतर्फी निकाल देऊन ही जागा पुणे जिल्हा परिषद (अध्यक्ष )या नावे करण्याचा एकतर्फी निर्णय दिला.या निर्णयाच्या विरोधात प्राथमिक शिक्षण सेवा संघ नारायणगावच्या वतीने महसूलमंत्री राज्य शासन यांच्याकडे अपील केले आहे.

तसेच जुन्नर न्यायालयात सुद्धा दावा दाखल आहे.जागे संदर्भात वाद न्यायप्रविष्ट असताना सरपंच पाटे यांनी याला राजकीय वळण दिले असल्याचा खुलासा कोऱ्हाळे यांनी केला आहे. या वेळी कोऱ्हाळे यांनी पत्रकार परिषदेत जागेच्या खरेदीची कागदपत्रे सादर केली. जागे संदर्भात सुरू झालेल्या आरोप व प्रत्यारोपा मुळे मागील वीस वर्षापासून कोऱ्हाळे विरुध्द पाटे यांच्यातील राजकिय द्वंद्व पुन्हा सुरू झाले आहे.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुख्यमंत्र्यांच्या डेडलाइनला पावसाचा फटका! मुंबई-पुणे प्रवासाचा ‘एक्सप्रेस’ स्वप्नाला धक्का; मिसिंग लिंक उशिरा पूर्ण होणार

Rahul Gandhi Reaction : डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणावर राहुल गांधींनी व्यक्त केला संताप ; भाजप सरकावर मोठा आरोप, म्हणाले...

Government Job: महाराष्ट्रात ९३८ सरकारी पदांसाठी भरती; २७ ऑक्टोबरपर्यंतच अर्ज करता येणार, जाणून घ्या प्रक्रिया...

MLA Anna Bansode : माजी आमदार राजन पाटील व यशवंत माने यांना राष्ट्रवादीने भरभरून दिले, त्यांना पूर्ण विचार करण्याचा अधिकार

AIIMS Recruitment 2025: एम्समध्ये प्राध्यापक पदांसाठी भरती सुरू; जाणून घ्या अर्जाची शेवटची तारीख आणि निवड प्रक्रिया

SCROLL FOR NEXT