Navjot Singh Sidhu Rahul Gandhi esakal
Punjab Assembly Election 2022

अखेर सिद्धूंनी भरसभेत राहुल गांधींसमोर व्यक्त केली मुख्यमंत्रीपदाची इच्छा, म्हणाले...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : देशात सध्या पाच राज्यांच्या निवडणुकांची रणधुमाळी सुरु आहे. पंजाबसहित इतर चार राज्यांतही निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ फुटला असून प्रचाराला वेग आला आहे. येत्या 20 फेब्रुवारीला राज्यात मतदान होणार आहे. आज लुधियानामध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांची सभा झाली. याचवेळी पंजाब काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू तसेच पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी देखील उपस्थित होते. याचवेळी नवज्योत सिंग सिद्धू यांनी पंजाबचा मुख्यमंत्री होण्याची आपली महत्त्वाकांक्षा व्यक्त केली आहे. (Punjab Congress president Navjot Singh Sidhu in Ludhiana)

लुधियानातील या सभेमध्ये उघडपणे न बोलता त्यांनी शाब्दिक कोटी करत आपल्यालाही मुख्यमंत्री व्हायचं असल्याचं म्हणणं पार्टी हाय कमांडकडे व्यक्त केलं आहे. यावेळी पंजाबचे विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी देखील उपस्थित होते. यावेळी नवज्योत सिंग सिद्धू यांनी मला जर तुम्ही मुख्यमंत्री बनवलं तर राज्यातील माफियाराज समाप्त करेन, असं वक्तव्य केलं आहे.

काय म्हणाले नवज्योत सिंग सिद्धू?

नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटलंय की, मी राहुल गांधींचा निर्णय मान्य केला आहे. जर मला निर्णय घेण्याची जबाबदारी सोपवण्यात आली तर मी माफियांना संपवून टाकेन. आणि लोकांचं आयुष्य आणखी चांगलं करेन. जर अशी निर्णय घेण्याची जबाबदारी दिली नाही तर ज्यांना तुम्ही मुख्यमंत्री बनवाल त्यांच्यासोबत मी चेहऱ्यावर हास्य ठेवून चालत राहिल.

मात्र, राहुल गांधींनी याच सभेत बोलताना मुख्यमंत्रीपदाच्या नावाची घोषणा केली आहे. त्यांनी विद्यमान मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांचंच नाव घोषित केलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! , सरकारने 'त्या' महिलांना योजनेचा लाभ देणे केले बंद

Shubman Gill Video: इंग्लंडच्या गोलंदाजाने केला गिलचा फोकस हलवण्याचा प्रयत्न; मग भारताच्या कर्णधारानं काय केलं पाहाच...

Shiv Yog 2025: उद्या शिवयोगाचा दुर्मिळ योग, धनु राशीसह 5 राशींवर माता लक्ष्मीची राहील कृपादृष्टी

BPSC Clerk Recruitment: 12वी पास तरुणांसाठी सुवर्णसंधी! BPSC मार्फत क्लार्क पदासाठी भरती जाहीर; जाणून घ्या पगार किती मिळेल?

निलेश साबळे 'चला हवा येऊ द्या २' मध्ये का दिसणार नाही? खरं कारण समोर, म्हणाला, 'गेले सहा महिने...

SCROLL FOR NEXT