गुंतवणुकीसाठी सरकारी योजना Esakal
Investment

Investmnetचा बेस्ट पर्याय, या सरकारी सेव्हिंग स्किममध्ये मिळेल FD पेक्षा जास्त रिटर्न

गुंतवलेल्या रक्कमेवर किती नफा मिळणार याबाबत पारदर्शकता असल्याने अनेकजण बँकमध्ये फिक्स डिपॉझिट किंवा आरडीमध्ये गुंतवणूक करतात. मात्र असे काही इतरही पर्याय आहेत जे सुरक्षित जर आहेत शिवाय यातून तुम्हाला बँकेच्या FD पेक्षा जास्त रिटर्नस मिळतील

Kirti Wadkar

कोणतीही गुंतवणूक Investment करत असताना अनेकजण त्यातून मिळाऱ्या फायद्यासोबतच म्हणजेच रिटर्न्ससोबतच ती जास्त सुरक्षित असण्याला जास्त महत्व देतात. गुंतवलेला पैसा Money बुडणार तर नाही ना अशी भिती अनेकांना असते. Investment Tips Marathi Know these government schemes for good money returns

यासाठीच अनेकजण जास्त नफ्याएवजी सुरक्षित गुंतवणूकीला Investment प्राधान्य देततात. यासाठीच मग बरेचजण बँकेतील मुदत ठेवीचा Bank FD चा पर्याय निवडतात. बँकेतील FDवर म्युचल फंड किंवा स्टॉक मार्केटसारखे Share Market रिटर्न्स मिळत नसले तरी ती एक सुरक्षित गुंतवणूक असते.

गुंतवलेल्या रक्कमेवर किती नफा मिळणार याबाबत पारदर्शकता असल्याने अनेकजण बँकमध्ये फिक्स डिपॉझिट किंवा आरडीमध्ये गुंतवणूक करतात. मात्र असे काही इतरही पर्याय आहेत जे सुरक्षित जर आहेत शिवाय यातून तुम्हाला बँकेच्या FD पेक्षा जास्त रिटर्नस मिळतील.

विशेष म्हणजेच या स्किम किंवा योजना सरकारी असल्याने त्या पूर्णपणे सुरक्षित आहेत. सोबतच या सरकारी योजनेतील गुंतवणूकीमुळे तुम्हाला टॅक्समध्ये देखील सूट मिळेल.

भारतीय पोस्ट ऑफिसच्या दमदार योजना

भारत सरकार पोस्ट ऑफिस सेविंग स्किमच्या माध्यमातून अनेक योजना राबवत असतं. यामध्ये विविध प्रकारचे डिपॉझिटचे पर्याय उपलब्ध आहेत. वेगवेगळ्या कालावधीसाठी असलेल्या या योजनांमध्ये चांगले रिटर्न्स मिळतात. यामध्ये पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, सुकन्या समृद्धी योजना, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट, पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट आणि सिनियर सिटिडन सेव्हिंग स्किम अशा काही योजना आहेत.

हे देखिल वाचा-

१. नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट- NSC ही पोस्ट ऑफिसची एक छोटी बचत योजना असून सर्वसामान्य आणि महिलांसाठी गुंतवणुकीसाठी हा एक चांगला पर्याय आहे. कारण या योजनेत तुम्ही अगदी १०० रुपयांपासून गुंतवणूक सुरू करू शकता.

सध्या या योजनेत गुंतवणूकीवर ७.७ टक्के व्याज दर मिळतो. यामध्ये जास्तीत जास्त कितीही रक्कम गुंतवू शकता. यावर चक्रवाढ पद्धतीने वार्षिक व्याज जमा केलं जातं. ते तुम्हाला म्यॅच्युरिटीवेळी मिळतं. NSC योजनेचा म्यॅच्युरिटी पिरियड हा ५ वर्षांचा आहे. आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत, या योजनेत १.५ लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर सूट देण्यात आली आहे.

२. वरिष्ठ नागरिक बचतपत्र योजना (Senior Citizen Savings Scheme- SCSS)

वरिष्ठ नागरिकांसाठी असलेल्या या योजनेत सध्या तब्बल ८.२ टक्के व्याज दिलं जात आहे. या योजनेमध्ये ६० वर्षांवरील नागरिकांसोबतच ज्यांनी VRS घेतलं आहे असे नागरिकही गुंतवणूक करू शकतात. दर तीन महिन्यांनी यावर व्याज दिल जातं.

या योजनेतही सेक्शन कलम 80C अंतर्गत, या योजनेत १.५ लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर सूट देण्यात आली आहे.

३. सुकन्या समृद्धी योजना- तुमच्या मुलींच्या भविष्याची तरदूत करता यावी म्हणून सरकार पोस्ट ऑफिस मार्फत सुकन्या समृद्धी योजना राबवतं. १० वर्षांखालील मुलीचे पालक आपल्या मुलीच्या नावाने पोस्टमध्ये खातं उघडून गुंतवणूक करू शकता. या योजनेत वर्षाला किमान २५० ते जास्तीत जास्त १.५ लाख रुपये गुंतवू शकता.

एका कुटुंबातील २ मुलींसाठी तुम्ही सुकन्या योजनेमध्ये गुंतवणूक करू शकता. मुलीचं वय २१ वर्ष झाल्यानंतर म्युच्युरिटी होते. मात्र, तुमची मुलगी १८ वर्षाची झाल्यावर तिच्या शिक्षणासाठी काही रक्कम काढू शकता. या योजनेत ८ टक्क्यांनुसार वार्षिक चक्रवाढ व्याजाचा लाभ मिळतो.

हे देखिल वाचा-

४. पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट स्कीम (Post office Time Deposit Scheme)- या योजनेमध्ये तुम्ही १ वर्षांपासून ते ५ वर्षापर्यंत गुंतवणूक करू शकता. बँकेतील पिक्स्ड डिपॉझिटवर मिळाणाऱ्या गॅरंटेड रिटर्नप्रमाणे या योजनेतही तुम्हाला फिक्स रिटर्नस् मिळतात. या योजनेते वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळे व्याजदर दिले जातात.

तसंच या योजनेत गुंतवणूकीची कोणतीही मर्यादा नाही. तसचं तुम्हाला टॅक्समध्ये सूट मिळते. या योजनेत १ वर्षाच्या डिपॉझिटवर ६.८ टक्के व्याज मिळतं. २ वर्षांसाठी ६.९ टक्के , ३ वर्षांसाठी ७ टक्के तर ५ वर्षांसाठी ७.५ टक्के व्य़ाज मिळतं.

अशा प्रकारे तुम्हाला सुरक्षित आणि गॅरेंटेड रिटर्न्स मिळणारी गुंतवणूक करायची असेल तर पोस्टाच्या विविध स्किमचा तुम्ही नक्की फायदा घेऊ शकता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SET Exam 2025 : विद्यार्थ्यांची चिंता वाढली; सेट परीक्षेचा निकाल एसबीसी आरक्षणामुळे रखडला

Rain-Maharashtra Latest live news update: नागपूर जिल्ह्यातील वडगाव धरण 99.75 टक्के भरले, 953.57 क्युमेक ने पाण्याचा विसर्ग सुरू

Monsoon Car Tips: कारच्या एसीचा दुर्गंध घालवण्यासाठी पावसाळ्यात 'या' 4 गोष्टी ठेवा लक्षात

Solapur Rain Update:'उजनी व वीर धरण पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस'; पंढरपुरात चंद्रभागा दुथडी, मंदिरांना पाण्याचा वेढा

Asia Cup : मी श्रेयस, यशस्वीच्या जागी असतो तर संघासाठी खेळणं सोडून...; R Ashwin कडून गौतम गंभीर अन् अजित आगरकरचा समाचार..

SCROLL FOR NEXT