companies are offering heavy discounts for voters loksabha elections 2024  Sakal
Personal Finance

Discount For Voters: मतदान करा अन् सवलती मिळवा! मतदारांसाठी कंपन्यांच्या मोठ्या ऑफर्स

Discount For Voters: देशात निवडणुकीचे वातावरण तापले आहे. मतदानाचा एक टप्पा पार पडला असून आज शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यात 80 हून अधिक जागांवर मतदान होत आहे. त्यानंतर आणखी पाच टप्प्यात मतदान होणार आहे.

राहुल शेळके

Discount For Voters: देशात निवडणुकीचे वातावरण तापले आहे. मतदानाचा एक टप्पा पार पडला असून आज शुक्रवारी दुसऱ्या टप्प्यात 80 हून अधिक जागांवर मतदान होत आहे. त्यानंतर आणखी पाच टप्प्यात मतदान होणार आहे. निवडणुकीच्या वातावरणात निवडणूक आयोगासह विविध संस्था अधिकाधिक मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करत आहेत. या प्रयत्नांमध्ये कंपन्या आणि व्यावसायिकही मागे नाहीत.

फ्लाइटपासून ते जेवणापर्यंत ऑफर

लोकांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहित करण्यासाठी अनेक कंपन्या आणि व्यवसाय विशेष मोहीम राबवत आहेत. यासाठी मतदान करणाऱ्या मतदारांना विविध उत्पादने आणि सेवांवर सवलत देण्यात येत आहे.

स्वस्त विमान तिकिटे

एव्हिएशन कंपनी एअर इंडिया एक्सप्रेसने 18 ते 22 वर्षे वयोगटातील मतदारांना प्रथमच मतदान करण्यासाठी विशेष सवलत देत आहे. जर पहिल्यांदाच मतदाराला मतदान करण्यासाठी त्याच्या लोकसभा मतदारसंघात जायचे असेल, तर एअर इंडिया एक्सप्रेस फ्लाइटच्या किमतीत 19 टक्के विशेष सवलत देत आहे. ही सवलत देशांतर्गत उड्डाणांसह आंतरराष्ट्रीय उड्डाणांवरही उपलब्ध आहे.

प्रवासासाठी कमी भाडे

BlueSmart, इलेक्ट्रिक वाहन राइड हॅलिंग सेवा प्रदान करणाऱ्या कंपनीने मतदारांसाठी प्रवास भाड्यात सवलत जाहीर केली आहे. कंपनी दिल्ली आणि बेंगळुरूमधील मतदारांना मतदान केंद्रावर जाण्यासाठी आणि तेथून परत जाण्यासाठी सवलत देत आहे.

Enrich आपल्या सलून चेनमधील मतदारांना 50 टक्के अतिरिक्त सवलत किंवा रिवॉर्ड पॉइंट देत आहे. ही ऑफर अहमदाबाद, बेंगळुरू, मुंबई, इंदूर, पुणे या शहरांसाठी आहे. ही ऑफर मतदानाच्या दिवसापासून पुढील एका आठवड्यासाठी वैध आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress on Thackeray Brother alliance ...म्हणून काँग्रेसने राज अन् उद्धव ठाकरेंच्या युतीत सामील होण्यास दिला नकार!, वडेट्टीवारांनी नेमकं कारणच सांगितलं

PAN-Aadhaar linking : 31 डिसेंबरपर्यंत आधारशी लिंक नसेल तर पॅन कार्ड होणार रद्द? ₹1,000 दंड द्यावा लागेल? जाणून घ्या मोठा अपडेट!

Dhule Municipal Election : भाजप-शिवसेना नेत्यांची बंद दाराआड खलबते; जागावाटपाचा पेच सुटणार की स्वबळाची तयारी सुरू होणार?

Latest Marathi News Live Update : भोकरदन तहसील कार्यालयासमोर शेतकरीपुत्र बसले आमरण उपोषणाला

तुमच्यात कट्टर वैर होतं? श्रीदेवीसोबतच्या वादावर अखेर माधुरी दीक्षितने सोडलं मौन; म्हणाली- आम्ही दोघी...

SCROLL FOR NEXT