Mahindra Finance 150 crore loan fraud done through kyc misuse now under the lens of rbi Sakal
Personal Finance

Loan Fraud: देशातील सर्वात मोठ्या फायनान्समध्ये 150 कोटींची फसवणूक; काय आहे प्रकरण?

Mahindra Finance Loan Fraud: महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये मोठी फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. शाखेतून वाहन कर्ज देताना 150 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही फसवणूक इतकी मोठी आहे की कंपनीला आपले तिमाही निकाल पुढे ढकलावे लागले आहेत.

राहुल शेळके

Mahindra Finance Loan Fraud: महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये मोठी फसवणूक झाल्याचं प्रकरण समोर आलं आहे. शाखेतून वाहन कर्ज देताना 150 कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. ही फसवणूक इतकी मोठी आहे की कंपनीला आपले तिमाही निकाल पुढे ढकलावे लागले आहेत. ही संपूर्ण फसवणूक ईशान्य भारतातील एका शाखेतून करण्यात आली आहे.

ही फसवणूक केवायसीमध्ये केली आहे. त्यानंतर 150 कोटींची फसवणूक करण्यात आली आहे. कंपनीच्या व्यवस्थापनाने याप्रकरणी चौकशी सुरू केली आहे. आणि याबाबतचा सविस्तर अहवाल लवकरच येऊ शकेल. तसेच या प्रकरणी काही लोकांना अटकही करण्यात आली आहे. आता या संपूर्ण प्रकरणावर येत्या काही दिवसांत आरबीआय काही कारवाई करू शकते, असे वृत्त आहे.

काय आहे प्रकरण?

कंपनीने शेअर बाजाराला दिलेल्या माहितीत सांगितले आहे की, त्यांच्या एका शाखेत किरकोळ वाहन कर्जामध्ये सुमारे 150 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण मार्चमध्ये उघडकीस आले आहे. त्यावर अंतिम निर्णय घेण्यासाठी संचालक मंडळाची 30 मे पर्यंत बैठक होणार आहे.

नोटीसमध्ये म्हटले आहे की वित्तीय विवरणे, निकाल आणि लाभांश यावर विचार करण्यासाठी संचालक मंडळाची बैठक पुन्हा शेड्यूल करण्यात आली आहे आणि ती आता 30 मे 2024 रोजी होणार आहे.

महिंद्रा फायनान्सने सांगितले की, 31 मार्च 2024 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाहीच्या शेवटी ईशान्येकडील कंपनीच्या एका शाखेत फसवणूक आढळून आली. महिंद्रा समूहाच्या कंपनीने सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. याप्रकरणी काही जणांना अटकही करण्यात आली आहे.

कंपनीने ऑडिटर बदलले

महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्शियल सर्व्हिसेसच्या संचालक मंडळाच्या बैठकीत, कर्ज घेण्याची मर्यादा 1.10 लाख कोटी रुपयांवरून 1.30 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्यास मंजुरी देण्यात आली होती.

एमएम निसीम अँड कंपनी आणि एमपी चितळे अँड कंपनी यांची तीन वर्षांसाठी कंपनीचे संयुक्त वैधानिक लेखा परीक्षक म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णयही घेण्यात आला. या दोन कंपन्या Deloitte Haskins & Sells आणि Mukund M. Chitale & Company यांची जागा घेतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT