Nvidia on cusp of overtaking Apple as second-most-valuable company
Nvidia on cusp of overtaking Apple as second-most-valuable company Sakal
Personal Finance

Valuable Company: Nvidia जगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी बनण्याच्या मार्गावर; लवकरच Appleला टाकणार मागे

राहुल शेळके

Valuable Company (Marathi News): Nvidia कंपनी गेल्या अनेक दिवसांपासून सतत चर्चेत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स चिप बनवणारी कंपनी गुगल आणि ॲमेझॉनसारख्या दिग्गज कंपन्यांना मागे टाकत अमेरिकेतील तिसरी सर्वात मोठी कंपनी बनली आहे. एनव्हीडिया ही एआय चिप्स बनवणाऱ्या टॉप कंपन्यांपैकी एक आहे.

Nvidia कंपनी बाजार भांडवलाच्या बाबतीत लवकरच जगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी बनणार आहे. Nvidia आणि ॲपलमधील अंतर खूपच कमी आहे. सध्या ॲपल ही जगातील दुसरी सर्वात मोठी कंपनी आहे.

मायक्रोसॉफ्ट ही जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. Nvidia शेअर्सच्या वाढीमुळे, कंपनीचे बाजार भांडवल झपाट्याने वाढले आहे. Nvidia चीप बनवते, जी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) मध्ये वापरली जाते.

फक्त 9 महिन्यांत, Nvidia चे बाजार भांडवल 1 ट्रिलियन डॉलर वरून 2 ट्रिलियन डॉलर पर्यंत वाढले आहे. या कालावधीत, बाजार भांडवलाच्या बाबतीत जगातील अनेक मोठ्या कंपन्यांना मागे टाकले आहे. यामध्ये ॲमेझॉन, गुगलची अल्फाबेट आणि सौदी अरेबियाची दिग्गज तेल कंपनी अरामको यांचा समावेश आहे.

AI चिप मार्केटमध्ये Nvidia चा 80 टक्के हिस्सा आहे

सध्या, Nvidia चे बाजार भांडवल सुमारे 2.38 ट्रिलियन डॉलर आहे. हे अॅपलच्या मार्केट कॅपिटलायझेशनपेक्षा फक्त 230 बिलियन डॉलर कमी आहे, तर मायक्रोसॉफ्टच्या मार्केट कॅपिटलायझेशनपेक्षा ते 645 बिलियन डॉलर कमी आहे.

एनव्हीडियाचा एआय चिप मार्केटमध्ये 80 टक्के हिस्सा आहे. यामुळेच गुंतवणूकदार शेअर्समध्ये भरपूर पैसे गुंतवत आहेत. वॉल स्ट्रीटला या वर्षी विक्रमी उच्चांकावर नेण्यात Nvidia शेअर्सनी मोठी भूमिका बजावली आहे. S&P 500 इंडेक्समध्ये Nvidia चे वेटेज 5 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.

Nvidia च्या शेअर्समध्ये यावर्षी 95 टक्के वाढ झाली आहे

Nvidia च्या शेअर्समध्ये यावर्षी 95 टक्के वाढ झाली आहे, तर Meta Platforms चे शेअर्स 46.6 टक्के वाढले आहेत. गेल्या काही काळापासून एआय संबंधित कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूकदारांची उत्सुकता वाढली आहे.

आयफोन विक्री मंदावल्याने ॲपल अडचणीत

दुसरीकडे, ॲपल आपल्या उत्पादन विक्रीतील मंदीशी झुंजत असल्याचे दिसत आहे. जानेवारी 2021 नंतर प्रथमच कंपनीचे मार्केट कॅपिटलायझेशनमध्ये मायक्रोसॉफ्टच्या मागे पडले. यामुळे ती जगातील सर्वात मौल्यवान कंपन्यांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर आली. सध्या मायक्रोसॉफ्ट ही जगातील सर्वात मौल्यवान कंपनी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: मतदानात महाराष्ट्र तळाला, आतापर्यंत झालेल्या मतदानात 'हा' मतदारसंघ आघाडीवर

T20 WC 2024 पूर्वी संघाने बदलला कर्णधार; 'या' स्टार खेळाडूकडे दिली टीमची कमांड

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

SCROLL FOR NEXT