PM Kisan Samman Nidhi Sakal
Personal Finance

PM Kisan Yojana: शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता कधी येणार? सरकारने दिली अपडेट

PM Kisan Yojana: देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांचा प्रमुख उदरनिर्वाहाचा स्त्रोत शेती असला तरी, आजही अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या खूपच मागे आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे.

राहुल शेळके

  1. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20 वा हप्ता जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे.

  2. शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली नसेल तर त्यांना हप्ता मिळणार नाही.

  3. योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये (3 हप्ते, प्रत्येकी 2,000 रुपये) बँक खात्यात थेट जमा होतात.

PM Kisan Yojana: देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांचा प्रमुख उदरनिर्वाहाचा स्त्रोत शेती असला तरी, आजही अनेक शेतकरी आर्थिकदृष्ट्या खूपच मागे आहेत. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी केंद्र सरकार विविध योजना राबवत आहे. त्यापैकीच एक महत्त्वाची योजना म्हणजे पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना, ज्याअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

ही रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात डीबीटी (Direct Benefit Transfer) द्वारे तीन हप्त्यांत जमा केली जाते. प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये शेतकऱ्यांना मिळतात. या योजनेचा उद्देश शेतकऱ्यांच्या लहान-मोठ्या शेतीशी संबंधित गरजांसाठी सहाय्य करणे हा आहे. सध्या देशभरातील कोट्यवधी शेतकरी या योजनेचा लाभ घेत आहेत.

आत्तापर्यंत या योजनेचे 19 हप्ते वितरित करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 19वा हप्ता फेब्रुवारी 2025मध्ये जारी केला होता. या हप्त्याला चार महिने उलटून गेले असल्याने शेतकरी आता 20व्या हप्त्याची उत्सुकतेने वाट पाहत आहेत.

अहवालांनुसार, केंद्र सरकार हा 20वा हप्ता जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करू शकते. मात्र, याबाबत सरकारकडून अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.

दरम्यान, शेतकऱ्यांनी योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ई-केवायसी (e-KYC) करून घ्यावी. तसेच, अर्ज करताना चुकीची माहिती दिली असल्यास ती दुरुस्त करणे आवश्यक आहे. अन्यथा, शेतकऱ्यांना पुढील हप्त्याचा लाभ मिळणार नाही.

FAQs

  1. पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा 20वा हप्ता केव्हा मिळणार? (When will the 20th installment of PM-Kisan scheme be released?)
    – जुलैच्या शेवटच्या आठवड्यात किंवा ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे.

  2. हप्ता मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी कोणती प्रक्रिया पूर्ण करावी लागेल? (What steps should farmers complete to receive the installment?)
    – शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण करणे आवश्यक आहे, तसेच अर्जातील चुका दुरुस्त कराव्यात.

  3. या योजनेतून किती आर्थिक मदत मिळते? (How much financial aid is provided under the scheme?)
    – शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात, जे 3 हप्त्यांत बँक खात्यात जमा होतात.

  4. जर अर्जातील माहिती चुकीची असेल तर काय होईल? (What happens if there are errors in the application?)
    – चुकीची माहिती दुरुस्त न केल्यास शेतकऱ्यांना हप्ता मिळणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना रक्षाबंधणाला मिळणार डबल गिफ्ट, जुलै-ऑगस्टचा हप्ता एकत्र मिळणार?

Chandrakant Patil : शिक्षकांनी गुरूंचे स्थान उंचावले पाहिजे, चंद्रकांत पाटील यांचे मत; विकसित भारताबाबत परिसंवाद

Solapur Crime: साडेतीन लाखांचे दागिने शेटफळ येथून लंपास; मोहोळ पोलिसात गुन्हा दाखल

Incense Smoke Harmful : अगरबत्तीचा धूर सिगारेटपेक्षा अधिक धोकादायक; धडकी भरवणारा रिसर्च समोर, कॅन्सरच्या धोक्याचीही शक्यता!

Latest Maharashtra News Updates : मुंबईत पहाटेपासून पाऊस, ऑरेंज अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT