RBI imposes monetary penalties on four cooperative banks for violating rules
RBI imposes monetary penalties on four cooperative banks for violating rules  Sakal
Personal Finance

RBI Action: आरबीआय अ‍ॅक्शन मोडवर, आता 'या' 4 बँकांना ठोठावला दंड; काय आहे प्रकरण?

राहुल शेळके

Penalty on Cooperative Banks: रिझर्व्ह बँकेने चार सहकारी बँकांवर कारवाई केली आहे. या सहकारी बँकांनी नियमांकडे दुर्लक्ष केले होते, त्यामुळे आरबीआयने कारवाई केली आणि दंड ठोठावला. भारतीय रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांना लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) 8 फेब्रुवारी रोजी सांगितले की बँकांनी नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल चार सहकारी बँकांवर दंड ठोठावला आहे. आरबीआयने स्वतंत्र प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे की नकोदर हिंदू अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक, पारसी को-ऑपरेटिव्ह बँक, बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँक आणि नवनिर्माण सहकारी बँक यांना लाखो रुपयांचा दंड ठोठावला आहे. (RBI imposes monetary penalty on Nakodar Hindu Urban Cooperative Bank for violation of norms)

कोणत्या बँकेला किती दंड ठोठावला?

आरबीआयने बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेला 63.30 लाख रुपये, झोरोस्ट्रियन को-ऑपरेटिव्ह बँकेला 43.30 लाख रुपये, नकोदर हिंदू अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेला 6 लाख रुपये आणि नवनिर्माण सहकारी बँकेला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. याशिवाय बँकांना नोटीसही बजावण्यात आली असून सूचनांचे पालन न केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे. (RBI imposes monetary penalty of over Rs 63 lakh on Bombay Mercantile Co-operative Bank Ltd)

सहकारी बँकांनी कोणते नियम पाळले नाहीत?

बॉम्बे मर्कंटाइल को-ऑपरेटिव्ह बँकेला एक्सपोजर नॉर्म्स आणि इतर निर्बंधांबाबत जारी केलेल्या सूचनांचे पालन न केल्यामुळे हा दंड ठोठावण्यात आल्याचे आरबीआयने म्हटले आहे. सेंट्रल बँकेने डिपॉझिट खाती, ठेवींवरील व्याजदरा बद्दलच्या सूचनांचे पालन न केल्यामुळे पारसी सहकारी बँकेवर कारवाई करण्यात आली आहे.

नकोदर हिंदू अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेवर उत्पन्नाची ओळख, मालमत्ता आणि इतर संबंधित बाबींवर जारी करण्यात आलेल्या सूचनांचे पालन न केल्याबद्दल दंड ठोठावण्यात आला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: महाराष्ट्रात मतदारांमध्ये अनुत्साह, अकरा वाजेपर्यंत अवघे 16 टक्के मतदान

Onion Garlands During Voting: गळ्यात टोमॅटो-कांद्याच्या माळा घालून मतदान; नाशिकमध्ये युवा मतदारांची चर्चा

Bangladesh MP Missing: भारतात आलेला बांगलादेशचा खासदार 3 दिवसांपासून बेपत्ता; कुटुंबाकडून चिंता व्यक्त

RSS नंतर आता दिग्विजय सिंह यांनी CM योगींचे केले कौतुक मात्र मोदींवर खोचक टीका, नेमकं काय म्हटलं वाचा...

Healthy Tips: आता कमी वयातच पोटाचा वाढतोय घेर, जास्त चरबीमुळे हृदयविकार, मधुमेह, आजारांना निमंत्रण

SCROLL FOR NEXT