RBI MPC Meeting 2024 Reserve Bank not to change interest rate says expert
RBI MPC Meeting 2024 Reserve Bank not to change interest rate says expert Sakal
Personal Finance

RBI MPC: आरबीआयची बैठक 6 फेब्रुवारीपासून होणार सुरू, कर्ज स्वस्त होणार का? काय आहे तज्ज्ञांचे मत

राहुल शेळके

RBI MPC Meeting 2024: अंतरिम अर्थसंकल्प 2024 नंतर, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (RBI) चलनविषयक धोरण समितीची बैठक होणार आहे. RBI गव्हर्नर शक्तीकांत दास यांच्या अध्यक्षतेखाली चलनविषयक धोरण समितीची (MPC) 3 दिवसीय बैठक 6 फेब्रुवारीपासून सुरू होणार आहे. गव्हर्नर शक्तीकांत दास 8 फेब्रुवारीला समितीचा निर्णय जाहीर करतील.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या (RBI) सहा सदस्यीय चलनविषयक धोरण समितीत व्याजदरात कोणताही बदल होण्याची शक्यता नाही. चलनविषयक धोरण समितीने मे 2022 ते फेब्रुवारी 2023 दरम्यान रेपो दरात 250 बेसिस पॉईंटची वाढ करून व्याजदर 6.5 टक्के केला होता. त्यानंतर एप्रिल 2023 मध्ये झालेल्या बैठकीत व्याजदर वाढ रोखण्यात आली. (RBI MPC Feb 2024 Meeting)

एमके ग्लोबल फायनान्शिअल सर्व्हिसेसचे प्रमुख अर्थतज्ज्ञ माधवी अरोरा म्हणाल्या, "गेल्या आर्थिक धोरणाच्या बैठकीपासून जागतिक घडामोडींमध्ये कोणतेही मोठे बदल झालेले नाहीत, त्यामुळे आरबीआयने दर वाढवण्याचे कोणतेही कारण नाही."

बँक ऑफ बडोदाचे मुख्य अर्थतज्ज्ञ मदन सबनवीस यांच्या मते, एमपीसी दर जैसे थे ठेवेल. ते म्हणाले की, डिसेंबरच्या आकडेवारीनुसार, महागाई अजूनही जास्त आहे.

ICRA मुख्य अर्थशास्त्रज्ञ अदिती नायर यांनी सांगितले की, ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित महागाई 2024-25 या आर्थिक वर्षात खाली येण्याची अपेक्षा आहे, त्यासाठी मान्सूनचा कल महत्त्वाचा असेल. आगामी आढाव्यात व्याजदरात कोणताही बदल अपेक्षित नाही. दर कपात फक्त ऑगस्ट 2024 मध्ये दिसू शकते.

पुढील आर्थिक वर्षात बाँड्सद्वारे 14.13 लाख कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे. चालू आर्थिक वर्षात एकूण कर्ज 15.43 लाख कोटी रुपये असल्याचा अंदाज आहे.

रिझर्व्ह बँकेने (RBI) जवळपास वर्षभर रेपो दर 6.5% वर स्थिर ठेवला आहे. फेब्रुवारी 2023 मध्ये ते 6.25% वरून 6.5% पर्यंत वाढले होते. किरकोळ महागाईचा दर जुलै 2023 मध्ये 7.44% च्या उच्च पातळीवर होता आणि तेव्हापासून त्यात घट झाली आहे. डिसेंबर 2023 मध्ये किरकोळ महागाई 5.69% होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Result 2024 : राज्यात लवकरच मंत्रिमंडळ विस्तार? डॅमेज कंट्रोल करण्यासाठी भाजपची रणनीती

Latest Marathi News Live Update: PM केंद्रीय मंत्री परिषदेतील मंत्र्यांसाठी राष्ट्रपतींकडून आज रात्री ८ वाजता डीनर आयोजन

R Ashwin Returns : IPL 2025पूर्वी धोनीच्या चेन्नईमध्ये परतणार आर अश्विन; फ्रँचायझीने दिली 'ही' मोठी जबाबदारी

Lok Sabha Result: इंडिया आघाडीत असूनही काँग्रेसने शरद पवारांच्या खासदाराला का पाडलं? जाणून घ्या इनसाईड स्टोरी

शेअर बाजार कोसळल्यानंतर 'ही' कंपनी झाली मालामाल; निकालाच्या दिवशी 8,000,00,00,000 रुपयांचा निधी जमा

SCROLL FOR NEXT