Samsung Employees have to work Six Day in a week new work policy introduced by company  Sakal
Personal Finance

Work Policy: सर्वात मोठ्या कंपनीने वर्क पॉलिसीत केला बदल; कर्मचाऱ्यांना रविवारीही करावे लागणार काम?

Samsung Employees: गेल्या काही वर्षांत जगात आर्थिक संकटाचे सत्र सुरुच आहे. अगोदर कोरोना, रशिया-युक्रेन युद्ध आणि आता इस्राइल आणि इराणमधील वाढता तणाव यामुळे जागतिक नोकऱ्यांचे संकट निर्माण झाले आहे.

राहुल शेळके

Samsung Employees: गेल्या काही वर्षांत जगात आर्थिक संकटाचे सत्र सुरुच आहे. अगोदर कोरोना, रशिया-युक्रेन युद्ध आणि आता इस्राइल आणि इराणमधील वाढता तणाव यामुळे जागतिक नोकऱ्यांचे संकट निर्माण झाले आहे. या काळात भारतासह जगभरातील कोट्यवधी लोकांनी नोकऱ्या गमावल्या आहेत.

मंदीच्या धोक्यात, कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकत आहेत. यातच आता जगातील आघाडीची इलेक्ट्रॉनिक्स कंपनी सॅमसंगने आपल्या कामाच्या धोरणात मोठा बदल केला आहे.

आता आठवड्यातून 6 दिवस काम करण्याच्या धोरणाची कंपनीत काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे. या आठवड्यात दक्षिण कोरियाच्या या कंपनीमध्ये अनेक ठिकाणी हे धोरण लागू केले जाईल.

कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 6 दिवस काम करावे लागेल, असा स्पष्ट संदेश देण्यात आला आहे. सॅमसंग ग्रुपला अनेक आर्थिक आव्हानांचा सामना करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे कंपनीला हे पाऊल उचलावे लागले.

कोरियन इकॉनॉमिक डेलीच्या रिपोर्टनुसार, काही विभागांमध्ये हा निर्णय तात्काळ लागू करण्यात आला आहे. इतर ठिकाणीही लवकरच कर्मचाऱ्यांना आठवड्यातून 6 दिवस काम करावे लागणार आहे.

कच्च्या तेलाच्या वाढत्या किमती, कर्ज घेण्याचा वाढता खर्च आणि दक्षिण कोरियाचे चलन वोनचे घसरलेले मूल्य सॅमसंगसमोर आव्हाने उभी करत आहेत. या समस्यांचा कंपनीवर फारसा परिणाम होऊ नये यासाठी सॅमसंग ग्रुप प्रयत्न करत आहे.

कंपनीचे अनेक कर्मचारी आधीच आठवड्यातून 6 दिवस स्वेच्छेने काम करत आहेत. आता हे धोरण संपूर्ण समूहात लागू केले जात आहे. नवीन धोरणात कर्मचाऱ्यांना काम करण्यासाठी शनिवार किंवा रविवार यापैकी एक दिवस निवडावा लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BMC Election: आचारसंहितेवरून तंबी भंग केल्यास ४ तासांत कारवाई, महापालिकेचा इशारा

Chenpi : संत्र्याची साल विकून लोक बनतायत लखपती; 1 किलोची किंमत वाचून व्हाल शॉक, तुम्ही कसा करू हा शकता बिझनेस? पाहा

Lasalgaon News : लासलगावमध्ये नायलॉन मांजाचा कहर; युवकाच्या तोंडाला २१ टाके

7 अलिशान घरं, 16 कोटींची शेतजमीन अन् बरच काही, माणिकराव कोकाटेंची संपत्ती वाचून थक्क व्हाल!

Mumbai News: धारावीपासून दादरपर्यंत समस्यांची रांग! जनतेच्या अपेक्षा ‘मिनी सरकार’कडे; त्रिकोणीय लढतीने राजकीय तापमान वाढणार

SCROLL FOR NEXT