Adani Group Sakal
Personal Finance

Adani-Hindenberg: अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाची स्वतंत्र चौकशी होणार का? सुप्रीम कोर्ट उद्या सुनावणार फैसला

देशात आणि भारतीय शेअर बाजारात या प्रकरणामुळं खळबळ उडाली होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : देशात आणि भारतीय शेअर बाजारात खळबळ उडवून देणाऱ्या अदानी-हिंडेनबर्ग प्रकरणाच्या स्वतंत्र चौकशीबाबत एक महत्वाची बातमी समोर आली आहे. या प्रकरणाची स्वंतत्र चौकशी करायची की नाही याचा निकाल सुप्रीम कोर्ट उद्या देणार आहे. (Supreme Court to pronounce judgment tomorrow on the petitions seeking independent probe into Adani-Hindenburg issue)

सुप्रीम कोर्टानं निर्णय ठेवला राखून

ज्येष्ठ वकील प्रशांत भूषण यांनी या प्रकरणात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना २५ नोव्हेंबर रोजी सुप्रीम कोर्टानं आपला निर्णय राखून ठेवला होता. तसेच यावेळी सुनावणीदरम्यान हिंडेनबर्ग अहवालातील अदानी समूहावरील आरोपांची चौकशी करणाऱ्या सेबीवर संशय घेण्याचे कारण नाही, असं म्हटलं होतं. सुनावणीदरम्यान न्यायालयाने गुंतवणूकदारांच्या हिताची चिंता व्यक्त केली. हिंडेनबर्गच्या अहवालात करण्यात आलेले आरोप हे अंतिम सत्य मानता येणार नाही. (Latest Marathi News)

सुप्रीम कोर्टानं फेटाळलं

सुप्रीम कोर्टाने नेमलेल्या तज्ज्ञ समितीच्या सदस्यांबाबत उपस्थित केलेल्या प्रश्नांना पूर्णविराम देत सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की, "कोणावरही दोषारोप करणं खूप सोपे आहे, हे टाळले पाहिजे. कोर्टानं मीडिया रिपोर्ट्सकडे दुर्लक्ष करून तथ्यांच्या आधारे युक्तीवाद करण्यात सांगितलं होतं. (Marathi Tajya Batmya)

'मीडिया ट्रायलच्या आधारे सेबी कारवाई करू शकत नाही'

प्रशांत भूषण यांनी सेबीच्या तपासाच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित केले होते. सुनावणीदरम्यान प्रशांत भूषण म्हणत होते की, जर मीडियाला कागदपत्रे मिळू शकतात तर सेबीला का मिळू शकत नाहीत. यावर खंडपीठ म्हणालं होतं की, 'सेबी ही एक वैधानिक संस्था आहे ज्याला शेअर बाजाराच्या नियमांच्या उल्लंघनाची चौकशी करण्याचा अधिकार आहे, हे आपण लक्षात ठेवले पाहिजे.

सुप्रीम कोर्टात अनेक याचिका दाखल करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये अदानी समूहाच्या कंपन्यांच्या बाबतीत हिंडेनबर्ग अहवालाच्या आधारे स्वतंत्र आणि निष्पक्ष एजन्सी किंवा एसआयटीकडून तपास करण्याची मागणी करण्यात आली आहे. सेबीने या प्रकरणी चौकशी सुरू केली होती, जी सुप्रीम कोर्टानं सुरू ठेवण्याची परवानगी दिली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : विजय मेळाव्यासाठी जोशात निघाले शिवसैनिक आणि मनसैनिक, कोळी बँडच्या तालावर मुंबई थरारली!

मुंबईत हिंदीत बोलणार, औकात असेल तर हात लावून दाखवा; स्वामी आनंद स्वरुप यांचं ठाकरे बंधूंना आव्हान

ENG vs IND: १ बॉल ६ धावा अन् भारताची कर्णधार आऊट; इंग्लंडचा भारतावर शेवटच्या चेंडूवर विजय

Kondhwa Case कुरिअर बॉय बनून नेहमी फ्लॅटवर यायचा, शरीरसंबंधावरून बिनसलं अन् तरुणीने पोलीस ठाणं गाठलं; तरुणाला माहितीच नाही आपण....

'या' चित्रपटाआधी भारतात नव्हतं संतोषी माताचं मंदिर, सिनेमा आला अन् सुरु झाले व्रत-उपास! चित्रपट पाहण्यासाठी चप्पल काढून जायचे प्रेक्षक

SCROLL FOR NEXT