Swiggy Holi Billboard Sakal
Personal Finance

Swiggy Holi Billboard : स्विगीच्या होळीच्या बोर्डवरून सोशल मीडियावर राडा, कंपनीने काढली जाहिरात

सोशल मीडियावर काही लोकांनी आक्षेप घेतल्यानंतर स्विगीने होळीसाठी अंड्यांच्या जाहिरातींचे बोर्ड काढून टाकले आहेत.

सकाळ डिजिटल टीम

Swiggy Holi Billboard Row : सोशल मीडियावर काही लोकांनी आक्षेप घेतल्यानंतर स्विगीने होळीसाठी अंड्यांच्या जाहिरातींचे बोर्ड काढून टाकले आहेत. जाहिरात बोर्डवर काही रंगांसह अंड्यांचे चित्र आहे. यासोबत तीन गोष्टी लिहिल्या आहेत.

यामध्ये ऑम्लेट आणि सनी साइड अपच्या पुढे एक चेक मार्क आहे. तिथे 'कुणाच्या तरी डोक्यासमोर' चुकीची खूण आहे. खाली लिहिले आहे - #वाईट खेळू नका, Instamart वरून होळीच्या आवश्यक गोष्टी मिळवा. या प्रकरणी स्विगीकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य आलेले नाही.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार जाहिरात बॅनर फक्त दिल्ली-एनसीआरमध्ये लावले गेले होते आणि आता काढले गेले आहेत. जाहिरात पोस्ट झाल्यानंतर लगेचच अनेकांनी ‘हिंदुफोबिक स्विगी’ या हॅशटॅगसह ट्विट केले.

लोकांनी स्विगीवर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले :

ट्विटमध्ये लोकांनी फूड डिलिव्हरी कंपनी (Swiggy) वर बहिष्कार टाकण्याचे आवाहन केले आहे. इस्कॉनचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी कंपनीवर टीका केली आणि ट्विट केले की, "Swiggy ने हिंदूंना होळीबद्दल शिक्षित करण्यासाठी एक मोहीम सुरू केली.

याच कंपनीने काही ग्राहकांनी शाकाहारी पदार्थांची ऑर्डर दिली असताना त्यांनी शाकाहारी ग्राहकांना मांसाहारी पदार्थ पाठवले होते"

स्विगीने होळीचे होर्डिंग काढले :

एका नेटकाऱ्याने लिहिले की होळीला बदनाम करण्याचा स्विगीचा प्रयत्न अत्यंत अस्वीकार्य आहे. होळीचे बोर्ड तात्काळ हटविण्याची आमची मागणी आहे.

आपल्या असंवेदनशील वर्तनाबद्दल त्यांनी जाहीर माफी मागितली पाहिजे. वाद वाढत असताना आणि अनेक वापरकर्त्यांनी अॅप अन-इंस्टॉल केल्याने, स्विगीने होळीचे होर्डिंग काढण्याचा निर्णय घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: “आम्ही सहज जिंकू असं वाटलेलं, पण…”, भारताच्या २४४ धावांच्या लाजीरवाण्या पराभवानंतर कॅप्टन श्रेयस अय्यर काय म्हणाला?

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेला स्व. अजित पवार यांचं नाव मिळणार? आदिती तटकरेंनी स्पष्ट केली भूमिका

Neha Bora: नेहा बोरा म्हणतात 'मी स्त्री नाही अन् पुरुषही नाही'! नॉन-बायनरी म्हणजे नक्की काय?

Shashi Tharoor: भारत समिटमध्ये 115 परदेशी वक्त्यांना प्रवेश नाकारला; शशी थरूर यांचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप

Latest Marathi News Live Update : खारघरमध्ये लिफ्टच्या दरवाजात अडकून मांजरीचा दुर्दैवी मृत्यू; महिलेविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार

SCROLL FOR NEXT