Who Designed Rupee Symbol Sakal
Personal Finance

Rupee Symbol: रुपयाचं चिन्ह कोणी डिझाइन केलं? दोन आर्किटेक्टची कहाणी; एकाला प्रसिद्धी मिळाली, तर दुसरा...

Who Designed Rupee Symbol: आपण रोज भारतीय रुपयाचं चिन्ह (₹) पाहतो – दुकानदारांच्या बोर्डांवर, चलनाच्या नोटांवर, मोबाइल स्क्रीनवर... हे चिन्ह इतकं सवयीचं झालंय की आपण त्याच्या इतिहासाबाबत फारसा विचारही करत नाही.

राहुल शेळके

थोडक्यात:

  1. 2010 पूर्वी भारताकडे अधिकृत रुपया चिन्ह नव्हतं, फक्त 'Rs' हे संक्षिप्त रूप वापरलं जात होतं.

  2. उदयकुमार यांनी 'र' आणि 'R' यांचं मिश्रण करून अधिकृत रुपया चिन्ह डिझाइन केलं आणि स्पर्धा जिंकली.

  3. नोंदिता कोरेया-मेहरोत्रा यांनी 2005 मध्येच असंच डिझाईन सुचवलं होतं, पण त्याला अधिकृत प्रतिसाद मिळाला नाही.

Who Designed Rupee Symbol: आपण रोज भारतीय रुपयाचं चिन्ह (₹) पाहतो – दुकानदारांच्या बोर्डांवर, चलनाच्या नोटांवर, मोबाइल स्क्रीनवर... हे चिन्ह इतकं सवयीचं झालंय की आपण त्याच्या इतिहासाबाबत फारसा विचारही करत नाही. मात्र या चिन्हामागची कहाणी थक्क करणारी आहे.

नुकतीचं एक इन्स्टाग्राम व्हिडीओ क्लिप व्हायरल झाली आहे, ज्यात भारतीय रुपया चिन्हाच्या ‘बिहाइंड द सीन’ कहाणीचा आढावा घेण्यात आला आहे. ₹ या चिन्हामुळे भारताच्या चलनाला एक नवी ओळख मिळाली.

आधी फक्त ‘Rs’ होतं

2010 पूर्वी भारताकडे अधिकृत चलन चिन्हच नव्हतं. लोक फक्त ‘Rs’ वापरत असत – एक साधं संक्षिप्त रूप, ज्यामध्ये देशाची ओळख, अभिमान किंवा खास वैशिष्ट्य दिसत नव्हतं. हे बदलण्यासाठी भारत सरकारनं 2010 मध्ये एक राष्ट्रीय डिझाईन स्पर्धा आयोजित केली.

उदयकुमार यांचं डिझाईन

या स्पर्धेत विजेते ठरले आर्किटेक्ट उदय कुमार. त्यांनी डिझाइन केलेलं चिन्ह म्हणजे देवनागरी ‘र’ आणि इंग्रजी ‘R’ यांचं सुंदर मिश्रण होतं. त्यात दोन समांतर रेषा आडव्या होत्या – जणू भारतीय संस्कृती आणि आधुनिकतेचा संगम. हे चिन्ह आधुनिक असूनही सहज ओळखता येईल असं होतं. उदय कुमार यांना प्रसिद्धी मिळाली आणि रुपया चिन्हाचे ते अधिकृत डिझायनर ठरले.

पण कहाणी इथेच थांबत नाही

या व्हिडीओत एक महत्त्वाचा भाग समोर आला आहे. 2005 साली, आर्किटेक्ट नोंदिता कोरेया-मेहरोत्रा यांनी एक महत्त्वाचा प्रश्न विचारला होता – “भारताकडे स्वतःचं चलन चिन्ह का नाही?” त्या वेळी त्यांनी एक साधं पण प्रभावी डिझाईन काढलं – देवनागरी ‘र’ आणि वरच्या बाजूस दोन छोट्या आडव्या रेषा. त्यांनी हे डिझाईन थेट रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) आणि पंतप्रधान कार्यालयाकडे (PMO) पाठवलं होतं. मात्र त्यावर कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.

2010 मध्ये जेव्हा अधिकृत स्पर्धा जाहीर झाली, तेव्हा अनेक टॉप डिझाईन्स नोंदिता यांच्या मूळ रेखाटनासारखीच दिसत होती. तसं नोंदिता यांनी पुन्हा या स्पर्धेत भाग घेतला आणि त्या टॉप-5 मध्येही पोहोचल्या.

उदयकुमार यांचं डिझाईन नक्कीच आकर्षक, स्पष्ट आणि विजयी ठरावं असंच होतं. मात्र नोंदिता यांनी जी बीजं पेरली, त्याचंही श्रेयही त्यांना द्यायलाच हवं. त्यांनी तो विषय त्या काळी मांडला, जेव्हा त्याचा कोणी विचारही केला नव्हता.

FAQs

  1. भारतीय रुपया चिन्ह अधिकृत कधी स्वीकारलं गेलं?
    (When was the Indian Rupee symbol officially adopted?)
    - जुलै 2010 मध्ये भारत सरकारने भारतीय रुपया चिन्ह अधिकृतपणे स्वीकारलं.

  2. रुपया चिन्हाचं डिझाइन कोणी तयार केलं?
    (Who designed the Indian Rupee symbol?)
    - आर्किटेक्ट उदय कुमार यांनी हे चिन्ह डिझाइन केलं, ज्यात देवनागरी ‘र’ आणि इंग्रजी ‘R’ यांचं संयोजन आहे.

  3. नोंदिता कोरेया-मेहरोत्रा यांचा या प्रक्रियेत काय सहभाग होता?
    (What was Nondita Correa-Mehrotra's role in the story of the rupee symbol?)
    - नोंदिता यांनी 2005 मध्येच असं चिन्ह रेखाटून RBI आणि पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवलं होतं, मात्र त्यावर काहीच प्रतिसाद मिळाला नव्हता.

  4. रुपया चिन्ह निवडण्यासाठी सरकारने काय प्रक्रिया राबवली होती?
    (What process did the government follow to select the rupee symbol?)
    - सरकारने राष्ट्रीय स्तरावर डिझाईन स्पर्धा आयोजित केली होती, ज्यात हजारो डिझाईन सबमिट करण्यात आले आणि त्यातून विजेता निवडण्यात आला.

  5. रुपया चिन्हात कोणती लिपी आहे?
    (What scripts and elements are combined in the rupee symbol?)
    - या चिन्हात देवनागरी ‘र’ आणि इंग्रजी ‘R’ या दोन लिपींचं मिश्रण आहे, ज्यावर दोन समांतर रेषा आहेत

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Deshmukh: विधीमंडळात ज्या नितीन देशमुखांना मारहाण झाली ते नेमके कोण आहेत?

Kolhapur Killing Case : रेकॉर्डवरील गुन्हेगार लखन बेनाडेचा खून, संशयित आरोपी पोलिसांना शरण; संकेश्र्वरात मृतदेहाचा शोध सुरू

Morning Diet: सकाळी रिकाम्या पोटी कोणत्या गोष्टी खाऊ नयेत? डॉक्टरांनी सांगितले कारण

मे-जूनमध्ये शेतीत काम नसतं, शेतकरी रिकामेच असतात.. तेव्हा गुन्हेगारी वाढते; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याचं विधान

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची कर्जप्रकरणे थंडबस्त्यात; अण्णाभाऊ साठे महामंडळातील वास्तव,नागपुरात केवळ एकाच महिलेला कर्ज!

SCROLL FOR NEXT