Government announces revised interest rates for PPF, KVP, and SSY savings schemes to benefit small investors.

 

esakal

Sakal Money

Government Decision on Savings Schemes : PPF, KVP, SSY सह अनेक बचत योजनांच्या व्याज दरांबाबत सरकारने घेतला निर्णय!

Government decision on PPF, KVP, SSY interest rates : जाणून घ्या, नव्या निर्णायानंतर आता या शासकीय बचत योजनांवर किती मिळणार परतावा?

Mayur Ratnaparkhe

Government savings Schemes update : केंद्र सरकारने आर्थिक वर्ष २०२५-२६च्या तिसऱ्या तिमाहीसाठी (ऑक्टोबर-डिसेंबर २०२५) अनेक सरकारी बचत योजनांच्या व्याज दरांना अपरिवर्तित ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. ही सलग सातवी तिमाही आहे, जेव्हा छोट्या बचत योजनांसाठी व्याज दरात कोणतेही बदल केले गेले नाहीत. 

सरकारने मागीलवेळी २०२३-२४ची चौथी तिमाही (जानेवारी-मार्च २०२४)साठी काही योजनांच्या व्याज दरांत बदल केले होते. या शासकीय योजनांमध्ये पब्लिक प्रॉव्हिडंट फंड(PPF), किसाना विकास पत्र (KVP), सुकन्या समृद्धी योजना (SSY) सीनियर सिटीजन सेव्हिंग्स स्कीम (SCSS), नॅशनल सेव्हिंग्स सर्टिफिकेट(NSC), पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम (POMIS) सारख्या अनेक योजनांचा समावेश आहे.

कोणत्या बचत योजनेवर किती मिळत आहे व्याज?-

सरकारच्या या निर्णयाचा थेट अर्थ असा झाला की, या योजनांवर तुम्हाला आधीप्रमाणेच व्याज मिळत राहील. सरकारने प्रदीर्घकाळापासून या बचत योजनांमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आता सध्या पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीमवर ७.४ टक्के, SCSSवर ८.२ टक्के, पीपीएफ वर ७.१ टक्के, सुकन्य समृद्धी योजनेवर ८.२ टक्के, किसान विकास पत्रवर ७.५ टक्के व्याज मिळत आहे. याशिवाय पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यावर चार टक्के, आरडी खात्यावर ६.७ टक्के आणि बचत खात्यांवर ६.९ टक्के ते ७.५ टक्क्यांपर्यंत व्याज मिळत आहे.

अर्थमंत्रालयाने जारी केली अधिसूचना –

अर्थमंत्रालयाने एका अधिसूचनेत म्हटले आहे की, आर्थिक वर्ष २०२५-२६ची तिसरी तिमाही (१ ऑक्टोबर २०२५ ते ३१ डिसेंबर २०२५) वेगवेगळ्या छोट्या बचत योजनांवर व्याज दर आर्थिक वर्ष २०२५—६च्या दुसऱ्या तिमाही (१ जुलै २०२५ ते ३० सप्टेंबर २०२५)साठी अधिसूचित केलेल्या दरांवर राहतील.

केंद्र सरकारचे अर्थमंत्रालय दर तीन महिन्यांनी आवश्यकतेनुसार सरकारी बचत योजनांवरील व्याज दरांत आवश्यकतेनुसार बदल करते. या बचत योजनांवरील व्याज दर अपरिवर्तित ठेवण्यासोबतच यामध्ये वाढ आणि कपात देखील केली जाऊ शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur building slab collapse : कोल्हापुरातील फुलेवाडीत इमारतीचा स्लॅब कोसळला ; अनेकजण अडकल्याची भीती

V. S. Gaitonde : मराठी माणसाने काढलेलं चित्र चक्क 67 कोटींना, कोण होते जगप्रसिद्ध चित्रकार व्ही. एस. गायतोंडे?

Pune University : विद्यापीठातील आर्थिक गैरव्यवहाराचे निघाले वाभाडे! विद्यापीठाच्या आर्थिक गैरव्यवहाराचे ‘फॉरेन्सिक ऑडिट’ होणार

Pune News : राष्ट्रीय कबड्डीपटू मुलीच्या खून प्रकरणात साक्ष नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण

Pune Crime : गुंड नीलेश घायवळसह कुटुंबीयांची बँकखाती गोठवली; १० बँक खात्यातील ३८ लाख २६ हजार रुपये केले फ्रिज

SCROLL FOR NEXT