Investment Tips in marathi Which 10 shares perform today BAJFINANCE MARUTI JSWSTEEL 22 April 2024  Sakal
Share Market

Share Market Today: शेअर बाजारात खरेदी होणार का? जागतिक बाजारातून काय आहेत संकेत?

Share Market Investment Tips: शुक्रवारी भारतीय शेअर बाजारातील चार दिवसांपासून सुरू असलेली घसरण थांबली. निफ्टी 22,150 च्या आसपास वाढीसह बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 599.34 अंकांनी अर्थात 0.83 टक्क्यांनी घसरून 73,088.33 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips (Marathi News): शुक्रवारी भारतीय शेअर बाजारातील चार दिवसांपासून सुरू असलेली घसरण थांबली. निफ्टी 22,150 च्या आसपास वाढीसह बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 599.34 अंकांनी अर्थात 0.83 टक्क्यांनी घसरून 73,088.33 वर बंद झाला. त्याच वेळी, निफ्टी 151.20 अंकांनी म्हणजेच 0.69 टक्क्यांनी वाढून 22,147 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टीला 22,000 वर सपोर्ट दिसत असल्याचे एलकेपी सिक्युरिटीजचे रूपक डे म्हणाले. डेली चार्टवर एक पियर्सिंग लाइन पॅटर्न तयार झाला आहे जो अनेकदा करेक्शननंतर तेजीचा कल बदलण्याचे संकेत देतो. याशिवाय, निर्देशांकाने 55इएमए ओलांडली आहे जी शॉर्ट टर्म मूव्हिंग एव्हरेज आहे. या मूव्हिंग एव्हरेजच्या वरील बंद हा पॉझिटव्ह शॉर्ट टर्म कल दर्शवतो.

सलग 4 दिवसांच्या घसरणीनंतर बाजारात शॉर्ट कव्हरिंग दिसल्याचे मेहता इक्विटीजचे प्रशांत तपासे म्हणाले. आघाडीच्या बँकिंग शेअर्समध्ये उशीरा खरेदी केल्याने बाजारात रिकव्हरी झाली ज्यामुळे सेन्सेक्स 73,000 च्या वर बंद झाला. भारतीय शेअर बाजाराने जागतिक बाजारापेक्षा वरचढ कामगिरी केली आहे. पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि प्रमुख चलनांच्या तुलनेत डॉलर वधारल्याने जागतिक बाजार आणखी घसरले आहेत.

आज बाजारातील रिकव्हरीला जागतिक संकेतांकडून पाठिंबा मिळू शकतो. कारण अमेरिकन बाजारांपाठोपाठ आशियाई बाजारांमध्येही तेजीची नोंद होत आहे. गिफ्ट निफ्टी 120 अंकांच्या वाढीसह 22200 च्या वर व्यवहार करत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • बजाज फायनान्स (BAJFINANCE)

  • महिन्द्रा अँड महिन्द्रा (M&M )

  • एचडीएफसी बँक (HDFCBANK)

  • मारुती (MARUTI)

  • जेएसडब्ल्यू स्टील (JSWSTEEL)

  • युनायटेड फॉस्फोरस लिमिटेड (UPL)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • व्होल्टास (VOLTAS)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: अजित पवारांनी विजय वडेट्टीवारांची घेतील सांत्वनपर भेट

तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT