Share Market Today Sakal
Share Market

Share Market Today: जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत; आज कोणते 10 शेअर्स असतील ॲक्शनमध्ये?

Share Market Investment Tips: पाच दिवसांच्या तेजीला अखेर शुक्रवारी ब्रेक लागला आणि भारतीय इक्विटी इंडेक्स घसरणीसह बंद झाले. निफ्टी 22,400 च्या खाली घसरला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 609.28 अंकांनी अर्थात 0.82 टक्क्यांनी घसरून 73,730.16 वर बंद झाला.

राहुल शेळके

Share Market Investment Tips (Marathi News): पाच दिवसांच्या तेजीला अखेर शुक्रवारी ब्रेक लागला आणि भारतीय इक्विटी इंडेक्स घसरणीसह बंद झाले. निफ्टी 22,400 च्या खाली घसरला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 609.28 अंकांनी अर्थात 0.82 टक्क्यांनी घसरून 73,730.16 वर आणि निफ्टी 150.30 अंकांनी म्हणजेच 0.67 टक्क्यांनी घसरून 22,420 वर आला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

दिवसभर निफ्टीवर विक्रीचा दबाव दिसून आल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया यांनी सांगितले. डेली चार्टवर, निफ्टीला 22,560 - 22,625 च्या रेझिस्टन्स झोनमधून विक्रीच्या दबावाचा सामना करावा लागला आहे. जोपर्यंत निफ्टी या झोनमधून बाहेर पडत नाही तोपर्यंत कंसोलिडेशन सुरू राहील अशी आशा आहे. तर खाली निफ्टीला आता 22240 - 22200 वर सपोर्ट आहे जिथे 40-मूव्हिंग एव्हरेज आहे.

बँक निफ्टीमध्ये आदल्या दिवशीच्या निचांकावरून झालेली रिकव्हरी ही शॉर्ट टर्म रिकव्हरी होती. फॉलो-अप खरेदीचा अभाव होता. अशा स्थितीत बँक निफ्टीमध्येही शॉर्ट टर्म कंसोलिडेशन दिसू शकते. तर खाली 47,500 वर सपोर्ट दिसत आहे.

आज जागतिक बाजारातून तेजीचे संकेत आहेत. शुक्रवारी अमेरिकन बाजारात चांगली वाढ झाली. यानंतर आज आशियाई बाजारांमध्ये तेजी दिसून येत आहे. आज गिफ्ट निफ्टी आणि अमेरिकन फ्युचर्स मार्केटमधून सकारात्मक संकेत मिळत आहेत. गिफ्ट निफ्टी 0.43% च्या वाढीसह 22,650 च्या वर व्यवहार करत आहे.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • बजाज फायनान्स (BAJFINANCE)

  • बजाज फिनसर्व्ह (BAJAJFINSV)

  • इंडसइंड बँक (INDUSINDBK)

  • नेसले इंडिया (NESTLEIND)

  • एसबीआय लाईफ (SBILIFE)

  • ए यू बँक (AUBANK)

  • पॉलीकॅब (POLYCAB)

  • इंडियन हॉटेल (INDHOTEL)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • पेज इंडिया (PAGEIND)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा. किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rishabh Pant record: धडाकेबाज रिषभ पंतने लॉर्ड्सवर रचला इतिहास!, सर विव रिचर्ड्स यांचा 'हा' विक्रम मोडला

छत्रपती शिवरायांचा इतिहास जगभर पोहोचणार, UNESCO यादीत पन्हाळगडाचा समावेश; पालकमंत्र्यांनी 'या' घटनेची करुन दिली आठवण

Latest Marathi News Updates : पन्हाळगडाचा जागतिक वारसा यादीत समावेश, कोल्हापूरसाठी गौरवाचा क्षण - पालकमंत्री प्रकाश आबिटकर

Crime News : नाशिक रोडवरील चोरट्यांनी आर्मी नर्सिंग परीक्षेला आलेल्या उमेदवाराला लुटले; एक लाख पाच हजारांचा ऐवज जप्त

Radhika Yadav Murder Case: राधिका यादव हत्याकांडात नवी ट्विस्ट!, टेनिस अकादमीबद्दल पोलिसांनीच केला मोठा खुलासा

SCROLL FOR NEXT