IPO News Sakal
Share Market

IPO News : क्रेयॉन्सची IPO एन्ट्री; किंमतीपासून गुंतवणुकीपर्यंत सर्व काही जाणून घ्या

आयपीओअंतर्गत कंपनी 64.30 लाख शेअर बाजारात आणणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Crayons Advertising IPO : ऍडव्हर्टायझिंग कंपनी क्रेयॉन्स (Crayons) लवकरच आपला आयपीओ आणणार आहे. कंपनीने एनएसईकडे काही दिवसांपुर्वी ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स दाखल केले आहे. या आयपीओअंतर्गत कंपनी 64.30 लाख शेअर बाजारात आणणार आहे.

त्यांची फेस व्हॅल्यू 10 रुपये प्रति शेअर आहे. या आयपीओचे बुक रनिंग मॅनेजर कॉर्पोरेट कॅपिटल व्हेंचर्स आहेत. याशिवाय स्कायलाइन या आयपीओची रजिस्ट्रार आहे.

कंपनीचे प्रमोटर कुणाल ललानी आहेत. ही कंपनी गेली 35 वर्षे जुनी आहे. क्रेयॉन्स कंपनी हाय अँड इकोसिस्टम आणि एंड टू एंड टेक कम्युनिकेशन्स सोल्युशन्स देते.

या आयपीओमधून उभारलेल्या रकमेपैकी 15.28 कोटी रुपये कंपनीच्या विस्तारासाठी आणि 14.50 कोटी रुपये वर्किंग कॅपिटलसाठी वापरले जातील अशी माहिती त्यांनी एक प्रेस रिलीज जारी करून दिली.

आर्थिक वर्ष 2020 मध्ये कंपनीचे व्हॅल्युएशन 67 हजार कोटी होते. 2022-27 च्या फॉरकास्ट पीरियडमध्ये बाजाराने कंपनीची वाढ 11 टक्के निश्चित केली आहे.

पुढील 2 वर्षात भारतीय जाहिरातींची बाजारपेठ जगात झपाट्याने वाढणार आहे. 2022 मध्ये कंपनीचा विकास दर 16 टक्के होता. याशिवाय 2023 मध्ये विकास दर 15.2 टक्के आणि 2024 मध्ये विकास दर 15.7 टक्के आहे.

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT