Post Office Scheme sakal
Share Market

Post Office Scheme : पोस्ट ऑफीसच्या 'या' स्कीममध्ये कमी रकमेतून जमवा मोठा फंड

पोस्ट ऑफीसच्या रिकरिंग डेपॉझिटमध्ये दररोज, किंवा महिन्याला छोटी छोटी रक्कम गुंतवली तर 5 वर्षात मोठा फंड तयार होऊ शकतो, तो कसा जाणून घेऊयात...

सकाळ डिजिटल टीम

Post Office Scheme : बचत अर्थात सेव्हिंग्सची स्वतःला शिस्त लावणे खूप गरजेचे आहे. कारण या सेव्हिंग्समधूनच तुम्ही मोठा फंड तयार करु शकता. ते म्हणतात ना थेंबे थेंबे तळे साचे, ही म्हण पैशांच्या बाबतीत तंतोतंत खरी आहे.

बरं, आता तर पैसे नुसती बचत करणे यापेक्षा गुंतवणे जास्त चांगले आहे. कारण यात पैसे वाढत जातात. पण बऱ्याच जणांना शेअर मार्केटची भीती वाटते, मग अशांनी सोपा पर्याय आणि विश्वासार्ह पर्यायांचा विचार करणे गरजेचे आहे. मग यात सगळ्यात आधी नाव येतं ते म्हणजे पोस्ट ऑफीसचे. (Post Office Scheme )

पोस्ट ऑफीसच्या रिकरिंग डेपॉझिटमध्ये दररोज, किंवा महिन्याला छोटी छोटी रक्कम गुंतवली तर 5 वर्षात मोठा फंड तयार होऊ शकतो, तो कसा जाणून घेऊयात...

पोस्ट ऑफिसमध्ये 100 रुपयांपासून आरडी खाते उघडता येते. खाते उघडल्यानंतर, तुम्ही प्रत्येकी 10 रुपयांच्या पटीत आणखी पैसे जमा करता येऊ शकतात. यामध्ये गुंतवणुकीसाठी कमाल मर्यादा नाही. 1 जानेवारी 2023 पासून पोस्ट ऑफिसच्या आरडी स्कीमवर वार्षिक 5.8 टक्के व्याज मिळत आहे.

यामध्ये व्याजाची चक्रवाढ तिमाही आधारावर केली जाते. यामध्ये तुम्ही दरमहा 3000 रुपये जमा केल्यास, पाच वर्षांच्या (60 महिन्यांच्या) मुदतीनंतर तुम्हाला सुमारे 2.10 लाख रुपये मिळतील. यामध्ये व्याज 29 हजारांहून अधिक असेल.

कोणत्याही गरजेच्या वेळी तुम्ही पोस्ट ऑफिसमधील आरडी खात्यावर कर्ज घेऊ शकता. नियमानुसार, 12 हप्ते जमा केल्यानंतर, खात्यात जमा केलेल्या रकमेच्या 50% पर्यंत कर्ज घेता येते. कर्जाची परतफेड एकरकमी किंवा हप्त्यांमध्ये उपलब्ध आहे. कर्जाचा व्याजदर आरडीवरील व्याजापेक्षा 2 टक्के जास्त असेल. त्यात नॉमिनेशनचीही सोय आहे.

मॅच्युरिटीनंतरही आरडी खाते पुढील 5 वर्ष चालू ठेवता येते. यामध्ये एखादी व्यक्ती कितीही खाती उघडू शकते. यामध्ये सिंगल व्यतिरिक्त जास्तीत जास्त 3 व्यक्तींसाठी जॉइंट अकाउंट उघडता येते. अल्पवयीन मुलांसाठी त्यांचे पालक अकाऊंट उघडू शकतात. पोस्ट ऑफिस आरडीमध्ये 3 वर्षांनंतर प्री-मॅच्युअर क्लोजर करता येते.

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adinath Maharaj: आदिनाथ महाराज नेमके कसे जखमी झाले? प्रत्यक्षदर्शी काय सांगतात? ९ वर्षांपूर्वी महाराज झाले होते बेपत्ता

Phaltan Politics: फलटणमध्ये सेटलमेंटचं राजकारण? भाजपच्या पाठिंब्यावर राष्ट्रवादीचा सभापती; रामराजेंचा गटही धक्कादायकरित्या सत्तेत..

महागडे LPG विसरा! भारताने शोधला नवा स्वयंपाकाचा गॅस; ऊर्जा क्षेत्रात महत्त्वाचा प्रयोग, जाणून घ्या मोठी योजना...

अ‍ॅट्रॉसिटी कायद्यावर मंत्र्यांचा यु-टर्न! संघटनांच्या संतापानंतर सरकारची माघार; थेट अटकेच्या मुद्द्यावर भूमिका बदलली

IPL 2026 मध्ये २-३ हजार धावा करायच्या आहेत! वैभव सूर्यवंशीचा आत्मविश्वास पाहून सारेच चक्रावले; म्हणाला, वैयक्तिक विक्रम...

SCROLL FOR NEXT