Share Marke Nifty near 21,700, Sensex jumps over 1,050 pts amid broad-based buying  Sakal
Share Market

Share Market Closing: अर्थसंकल्पापूर्वी शेअर बाजार चमकला; सेन्सेक्स 1,242 अंकांनी वधारला, कोणते शेअर्स तेजीत?

Share Market Closing: सोमवारी शेअर बाजारात जोरदार खरेदी झाली. बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीसह बंद झाले. चांगले जागतिक संकेत आणि हेवीवेट शेअर्समधील खरेदीमुळे बाजारात तेजी होती. त्यामुळे सेन्सेक्स 1240 अंकांनी उसळी घेत 71,941 वर पोहोचला.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 29 January 2024: सोमवारी शेअर बाजारात जोरदार खरेदी झाली. बाजारातील प्रमुख निर्देशांक तेजीसह बंद झाले. चांगले जागतिक संकेत आणि हेवीवेट शेअर्समधील खरेदीमुळे बाजारात तेजी होती. त्यामुळे सेन्सेक्स 1240 अंकांनी उसळी घेत 71,941 वर पोहोचला. निफ्टीनेही 385 अंकांची वाढ झाली आणि निर्देशांक 21,737 वर बंद झाला.

शेअर बाजारात तेजी

क्षेत्रीय निर्देशांकांची स्थिती

सुरुवातीच्या व्यवहारात सर्व क्षेत्रीय निर्देशांक तेजीसह व्यवहार करताना दिसले. निफ्टी ऑइल अँड गॅसमध्ये सर्वाधिक 1.38 टक्क्यांची वाढ दिसून आली. याशिवाय निफ्टी प्रायव्हेट बँकमध्ये 1.21 टक्के, निफ्टी पीएसयू बँकेत 1.10 टक्के, निफ्टी मीडियामध्ये 1.24 टक्के, निफ्टी फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये 1.15 टक्के वाढ दिसून आली.

निफ्टी मेटलमध्ये 0.56 टक्के, निफ्टी फार्मामध्ये 0.62 टक्के, निफ्टी कन्झ्युमर ड्युरेबल्समध्ये 0.55 टक्के आणि निफ्टी हेल्थकेअरमध्ये 0.33 टक्के वाढ दिसून आली.

अदानी समूहाचे शेअर्स तेजीत

सोमवारी, शेअर बाजारात बीएसई सेन्सेक्स आणि एनएसई निफ्टी वाढीसह बंद झाले. शेअर बाजारात उर्जा ग्लोबलच्या शेअर्समध्ये 20 टक्क्यांची वाढ झाली. गौतम अदानी यांच्या 10 पैकी 9 कंपन्यांचे शेअर्स वाढीसह बंद झाले. एनडीटीव्ही शेअर्समध्ये किंचित घसरण झाली.

S&P BSE SENSEX

अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स 6 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले. अदानी पॉवर पाच टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले, तर अदानी पोर्ट्स आणि अदानी एनर्जी सोल्युशन्सचे शेअर्स सुमारे 4 टक्क्यांच्या वाढीसह बंद झाले.

मल्टीबॅगर शेअर्सची स्थिती

शेअर बाजारातील गुंतवणूकदारांना मल्टीबॅगर परतावा देणाऱ्या कंपन्यांमध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये 7.24 टक्क्यांनी वाढ झाली.

टाटा मोटर्स, फेडरल बँक, ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, बजाज फायनान्स, आयआरसीटीसी, मारुती सुझुकी, आयसीआयसीआय बँक आणि मुथूट फायनान्सच्या शेअर्समध्ये तेजी होती. तर पतंजली फूड्स, इन्फोसिस, देवयानी, अश्निषा आणि एसबीआय कार्डच्या शेअर्समध्ये घसरण झाली.

गुंतवणूकदारांनी 6 लाख कोटी रुपये कमावले

बाजारातील जोरदार वाढीमुळे आज गुंतवणूकदारांचे भांडवल वाढले आहे. 25 जानेवारी 2024 रोजी, BSE वर सर्व शेअर्सचे एकूण मार्केट कॅप 371.12 लाख कोटी रुपये होते.

आज म्हणजेच 29 जानेवारी 2024 रोजी ते 377.12 लाख कोटी रुपयांवर पोहोचले. याचा अर्थ आज गुंतवणूकदारांच्या भांडवलात सुमारे 6 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Siddhanath Temple : आटपाडीत सिद्धनाथ मंदिराच्या गाभाऱ्यातील २४ किलो चांदी गायब, दुरुस्तीच्या नावाखाली धक्कादायक प्रकार

Bribery Action: साेलापुरात महावितरणचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात; ऑनलाइन मंजुरीसाठी मागितले तीन हजार, जिल्ह्यात खळबळ!

कोर्टाच्या दणक्यानंतर धाबे दणाणले, शिंदेंसह अजितदादांचे पदाधिकारीही पोलिसांसमोर शरण; १३ जणांना अटक

Pune News: ४५ मिनिटांचा प्रवास आता ७ मिनिटांत! खंबाटकीच्या बोगद्याने प्रवासाला गती; जूनपासून वाहतूक सुरू होणार..

Nalasopara Crime : डोकं वरवंट्यानं ठेचलं, आईनेच १५ वर्षांच्या लेकीला संपवलं; काय घडलं?

SCROLL FOR NEXT