Share Market Sakal
Share Market

Share Market Closing: शेअर बाजाराने पुन्हा केली निराशा; मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे नुकसान

Share Market Today: सोमवारी, देशांतर्गत शेअर बाजारात तीव्र चढउतार झाले आणि बाजार सपाट बंद झाला. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, वित्तीय सेवा, मेटल, ग्राहकोपयोगी वस्तू, तेल आणि वायू क्षेत्रांमध्ये मोठी घसरण झाली.

राहुल शेळके

Share Market Closing Latest Update 6 May 2024: सोमवारी, देशांतर्गत शेअर बाजारात तीव्र चढ-उतार झाले आणि बाजार सपाट बंद झाला. सार्वजनिक क्षेत्रातील बँका, वित्तीय सेवा, मेटल, कंझ्युमर ड्युरेबल्स, तेल आणि गॅस क्षेत्रांमध्ये मोठी घसरण झाली. निफ्टीवर एफएमसीजी, आयटी आणि फार्मा शेअर्स वधारले. बाजार बंद होताना निफ्टी 33 अंकांनी घसरून 22,442 वर, सेन्सेक्स 17 अंकांनी वाढून 73,895 वर आणि निफ्टी बँक 28 अंकांनी घसरून 48,895 वर बंद झाला.

Share Market Today

क्षेत्रीय निर्देशांकाची स्थिती

आजच्या व्यवहारात आयटी, फार्मा, एफएमसीजी, रिअल इस्टेट, हेल्थकेअर क्षेत्रातील शेअर्समध्ये वाढ झाली आहे. परंतु कंझ्युमर ड्युरेबल्स, ऊर्जा, बँकिंग, वाहन, तेल, गॅस, मीडिया आणि मेटल क्षेत्राचे शेअर्स घसरणीसह बंद झाले.

आजच्या सत्रात मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. सेन्सेक्समधील 30 शेअर्सपैकी 19 शेअर्स वाढीसह आणि 11 शेअर्स घसरणीसह बंद झाले. तर 50 निफ्टी शेअर्सपैकी 23 शेअर्स वाढीसह तर 27 शेअर्स घसरणीसह बंद झाले.

Share Market Today

कोणते शेअर्स तेजीत?

आज बाजारात ब्रिटानियाचे शेअर्स 6.60 टक्के, कोटक महिंद्रा बँक 5.02 टक्के, TCS 2.05 टक्के, हिंदुस्थान युनिलिव्हर 1.80 टक्के, सन फार्मा 1.24 टक्के, टेक महिंद्राचे शेअर्स 0.92 टक्के वाढीसह बंद झाले. तर टायटनचे शेअर्स 7.07 टक्के, अदानी एंटरप्रायझेस 4.05 टक्के, कोल इंडिया 3.07 टक्के, बीपीसीएल 2.89 टक्के, एसबीआय 2.64 टक्क्यांनी घसरले.

S&P BSE SENSEX

गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान

आजच्या व्यवहारात शेअर बाजारात मोठी घसरण झाल्याने गुंतवणूकदारांचे नुकसान झाले आहे. BSE वर कंपन्यांचे मार्केट कॅप 403.50 लाख कोटी रुपयांवर घसरले आहे, जे गेल्या ट्रेडिंग सत्रात 406.24 लाख कोटी रुपये होते. म्हणजेच आजच्या ट्रेडिंग सत्रात गुंतवणूकदारांचे 2.74 लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज (BSE) वर आज, शेअर्सची संख्या वाढीच्या तुलनेत घसरणीसह बंद झाली. एक्सचेंजमध्ये आज एकूण 4,093 शेअर्सचे व्यवहार झाले. यापैकी 1,292 शेअर्स वाढीसह बंद झाले तर 2,629 शेअर्समध्ये घसरण दिसून आली.

तर 172 शेअर्स कोणतीही हालचाल न करता फ्लॅट बंद झाले. याशिवाय आजच्या व्यवहारादरम्यान 242 शेअर्सनी त्यांच्या 52 आठवड्यांचा उच्चांक गाठला. तर 26 शेअर्सनी त्यांच्या नवीन 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीला स्पर्श केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis on cabinet subcommittee : मराठा आंदोलनावर यशस्वी तोडगा! मंत्रिमंडळ उपसमितीचं फडणवीसांकडून विशेष कौतुक, म्हणाले...

KCR News : केसीआर यांनी स्वत:च्या मुलीची पक्षातून केली हाकालपट्टी; BRS मधील अंतर्गत वादाला नवे वळण

Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या यशस्वी आंदोलनानंतर शिरूरमध्ये जल्लोष, गुलाल उधळून साजरा

Ajit Pawar : करमाळ्याच्या पोलिस उपअधिक्षक अंजली कृष्णांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ओळखलंच नाही; दादांचा संताप, VIDEO VIRAL

Pune News : पुण्यात पुराचा धोका वाढला; नदीची वहन क्षमता घटल्याने ४०% वाढ

SCROLL FOR NEXT