Share Market Today Esakal
Share Market

Share Market Today: आज कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक कराल? काय सांगतात तज्ञ

Share Market Tips: काल सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद झाले.

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips: सेन्सेक्स-निफ्टी सोमवारी तेजीसह बंद झाले. 21 सर्वच सेक्टरमधील खरेदीमुळे बाजाराला चांगला सपोर्ट मिळाला. व्यवहाराच्या शेवटी, सेन्सेक्स 267.43 अंकांच्या अर्थात 0.41 टक्क्यांच्या वाढीसह 65216.09 वर बंद झाला आणि निफ्टी 83.40 अंकांच्या म्हणजेच 0.43 टक्क्यांच्या वाढीसह 19393.60 वर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

निफ्टीमध्ये रेंज बाउंड व्यवसाय दिसून आल्याचे शेअर खानचे जतीन गेडिया यांनी सांगितले. पण दोन दिवसांच्या घसरणीचा ट्रेंड सोमवारी मोडला. व्यवहाराच्या शेवटी तो 83 अंकांच्या वाढीसह बंद झाला.

डेली चार्ट निफ्टी गेल्या पाच ट्रेडिंग सत्रांपासून 40-दिवसांच्या मूव्हिंग एव्हरेज (19360) च्या आसपास फिरत आहे. गेल्या 4 आठवड्यांपासून निफ्टी घसरत आहे. आता त्यात पुल बॅक दिसण्याची शक्यता आहे.

आवर्ली चार्टवर एक पॉझिटीव्ह डायव्हर्जंस दिसत आहे, जो घसरणीचा वेग आता कमकुवत होत असल्याचे संकेत आहे. जोपर्यंत निफ्टी 19480 - 19500 च्या खाली टिकून राहील तोपर्यंत बाजारात कमजोरी कायम राहण्याची शक्यता आहे.

अशा स्थितीत निफ्टी 19100 पर्यंत जाताना दिसतो. निफ्टीसाठी 19280-19240 लर सपोर्ट दिसत आहे. वरच्या बाजूस असताना, 19480 - 19500 वर रझिस्टंस दिसत आहे. बँक निफ्टीमध्येही सोमवारी पुलबॅक दिसला, ज्याने सात दिवसांच्या तोटा मोडीत काढला.

बँक निफ्टी सोमवारी हिरव्या रंगात बंद झाला. महत्त्वाचे म्हणजे, त्याने 20-वीक मूव्हिंग एव्हरेजचा (44000) सपोर्ट कायम ठेवला, जे अल्पावधीत बँक निफ्टीमध्ये पुलबॅक रॅलीचे संकेत देते. या पुलबॅकमध्ये बँक निफ्टी 44400-44500 पर्यंत जाऊ शकतो.

आजचे टॉप 10 शेअर्स कोणते?

  • बजाज फायनान्स (BAJFINANCE)

  • पॉवरग्रीड (POWERGRID)

  • अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

  • अदानी एन्टरटेन्मेंट (ADANIENT)

  • हिन्दाल्को (HINDALCO)

  • पर्सिस्टंट (PERSISTENT)

  • ऍस्ट्रल (ASTRAL)

  • लॉरस लॅब (LAURUSLABS)

  • गोदरेज प्रॉपर्टीज (GODREJPROP)

  • श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT