Share Market
Share Market sakal
Share Market

Share Market : बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips : शुक्रवारी शेअर बाजार घसरणीसह बंद झाला. यूएस फेडच्या आक्रमक दरवाढीच्या चिंतेने बाजारावर विक्रीचे वर्चस्व दिसून आले. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 671.15 अंकांनी म्हणजेच 1.12 टक्क्यांनी घसरून 59135.13 वर बंद झाला.

त्याच वेळी, निफ्टी 176.70 अंकांच्या म्हणजेच 1 टक्क्यांच्या घसरणीसह 17412.90 च्या पातळीवर बंद झाला.

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

कमकुवत जागतिक संकेतांमुळे शुक्रवारी बाजारावर विक्रीचा दबाव दिसून आल्याचे कोटक सिक्युरिटीजचे अमोल आठवले म्हणाले. तांत्रिक दृष्टीकोनातून, निफ्टीने विकली चार्टवर बियरीश कँडल तयार केली आहे आणि त्याच्या 20 आणि 50-डे एसएमएच्या खाली व्यापार करत आहे.

पोझिशनल ट्रेडर्ससाठी, 17550 पातळी मिडियम टर्म रझिस्टंस म्हणून काम करेल. याच्या खाली राहिल्यास निफ्टी 17150 च्या पातळीपर्यंत घसरू शकतो. दुसरीकडे, जर इंडेक्स 17425 च्या वर टिकून राहिल्यास, त्यात पुलबॅक रॅली पाहू शकतो.

निफ्टी 17480-17500 च्या दिशेने जाताना आपण पाहू शकतो. दरम्यान, बँक निफ्टीने 41000 चा महत्त्वाचा सपोर्ट तोडला, जो नेगिटीव्ह संकेत आहे. यानंतर आता निफ्टी बँक 40000-39800 पर्यंत घसरताना दिसू शकते.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • अदानी एन्टरप्रायझेस (ADANIENT)

  • एचडीएफसी बँक (HDFCBANK)

  • अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

  • एचडीएफसी (HDFC)

  • इंडसइंड बँक (INDUSINDBK)

  • श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • लॉरस लॅब (LAURUSLABS)

  • भारतीय कंटेनर निगम (CONCOR)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT