Share Market
Share Market  Sakal
Share Market

Share Market : बाजार सुरु होण्याआधी आज कोणते 10 शेअर्स करतील परफॉर्म? जाणून घ्या

शिल्पा गुजर

Share Market Investment Tips : मंगळवारी शेअर बाजार वाढीसह बंद झाला. निफ्टी 17100 च्या वर बंद झाला. व्यवहाराच्या शेवटी सेन्सेक्स 445.73 अंकांच्या म्हणजेच 0.77 टक्क्यांच्या वाढीसह 58074.68 वर बंद झाला.

त्याच वेळी, निफ्टी 119.10 अंकांच्या म्हणजेच 0.70 टक्क्यांच्या वाढीसह 17107.50 वर बंद झाला. (Share Market Investment Tips Which 10 shares will be perform today 22 March 2023 before the market opens know details)

आज कशी असेल बाजाराची स्थिती?

मंगळवारी जागतिक बाजारातील तेजीचा परिणाम देशांतर्गत बाजारांवरही दिसून आल्याचे कोटक सिक्युरिटीजचे श्रीकांत चौहान यांनी सांगितले. आर्थिक शेअर्समध्ये चांगली खरेदी झाल्यामुळे सेन्सेक्स-निफ्टी दोन्ही वाढीसह बंद झाले.

बुधवारी होणाऱ्या यूएस एफओएमसीच्या बैठकीत व्याजदरांबाबतच्या निर्णयावर बाजाराचे लक्ष असेल. व्याजदर अपेक्षेपेक्षा जास्त वाढले तर गुंतवणूकदारांना धक्का बसेल.

निफ्टी मंगळवारी वाढीसह उघडला आणि ट्रेडिंग सत्राच्या पहिल्या हाफमध्ये कंसोलिडेशन पाहायला मिळाल्याचे शेअरखानचे जतीन गेडिया म्हणाले. त्यानंतर खरेदी दिसून आली. त्यामुळे निफ्टी दिवसाच्या उच्चांकाच्या आसपास बंद झाला.

पुढील काही ट्रेडिंग सत्रांमध्ये अपट्रेंड सुरू राहण्याची अपेक्षा आहे. मोमेंटम इंडिकेटर आवर्ली चार्टवर पॉझिटीव्ह क्रॉसओव्हरसह पॉझिटीव्ह डायव्हर्जंस दिसत आहे.

बाजारातील घसरण थांबेल आणि हा पुलबॅक आणखी वाढेल असे हे संकेत आहेत. वरच्या बाजूने, पुढील टारगेट आता 17150-17200 वर दिसत आहे. तर, यासाठी 16800-16850 वर सपोर्ट आहे.

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते?

  • एचडीएफसी लाईफ (HDFCLIFE)

  • रिलायन्स (RELIANCE)

  • बजाज फायनान्स (BAJFINANCE)

  • बजाज ऑटो (BAJAJ-AUTO)

  • एसबीआय लाईफ (SBILIFE)

  • एबीबी इंडिया लिमिटेड (ABB)

  • श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)

  • झी एन्टरटेन्मेंट लिमिटेड (ZEEL)

  • आयडीएफसी फर्स्ट बँक (IDFCFIRSTB)

  • ज्युबिलंट फूड (JUBLFOOD)

नोंद : क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले..."

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

SCROLL FOR NEXT