Stock Market Today Sakal
Share Market

Stock Market Opening: शेअर बाजाराची किंचित वाढीसह सुरुवात; निफ्टी 25,000च्या खाली, कोणते शेअर्स तेजीत?

Stock Market Opening Today: आज (सोमवार, 21 जुलै) देशांतर्गत शेअर बाजाराने थोड्या तेजीसह ट्रेडिंगला सुरुवात केली. मात्र, सुरुवातीच्या वाढीनंतर बाजार स्थिर झाला आणि नंतर सपाट पातळीवरच व्यवहार करताना दिसला.

राहुल शेळके

थोडक्यात:

  1. सेन्सेक्स 30 अंकांनी वाढला, तर निफ्टी 25,000च्या खाली आहे

  2. रिलायन्सच्या नफ्यात वाढ असूनही शेअर 2% नी घसरला; बँकिंग आणि मेटल शेअर्समध्ये वाढ दिसली.

  3. ऑटो, ऑईल अँड गॅस, एफएमसीजी आणि फार्मा क्षेत्रात अर्धा टक्का घसरण झाली; रुपया डॉलरच्या तुलनेत 86.21 वर उघडला.

Stock Market Opening Today: आज (सोमवार, 21 जुलै) देशांतर्गत शेअर बाजाराने थोड्या तेजीसह ट्रेडिंगला सुरुवात केली. मात्र, सुरुवातीच्या वाढीनंतर बाजार स्थिर झाला आणि नंतर सपाट पातळीवरच व्यवहार करताना दिसला. सेन्सेक्स 30 अंकांच्या किरकोळ वाढीसह व्यवहार करत होता. निफ्टी 25,000 च्या खालीच राहिला, तर बँक निफ्टीमध्ये 235 अंकांची वाढ झाली.

शेअर बाजार उघडताना सेन्सेक्स 161 अंकांनी वर जाऊन 81,918 वर पोहोचला. निफ्टी 31 अंकांनी वाढून 24,999 वर उघडला. बँक निफ्टीने 275 अंकांची वाढ घेत 56,558 वर सुरुवात केली.

Stock Market Opening Today

दरम्यान, चलन बाजारात रुपया 7 पैशांनी घसरून डॉलरच्या तुलनेत 86.21 वर उघडला. तज्ज्ञांच्या मते, आजचा दिवस शेअर बाजारासाठी महत्वाचा ठरण्याची शक्यता आहे. जागतिक बाजारातील हालचाली, डॉलर इंडेक्समधील बदल आणि परदेशी गुंतवणूकदारांचा (FIIs) कल यावर बाजाराची दिशा अवलंबून राहतील.

Stock Market Opening Today

आज मेटल, बँक आणि मीडिया क्षेत्रांशिवाय बाकी सर्व सेक्टोरल निर्देशांक लाल रंगात होते. ऑटो, ऑईल अँड गॅस, एफएमसीजी आणि फार्मा क्षेत्रात सुमारे अर्धा टक्का घसरण झाली.

रिलायन्स इंडस्ट्रीजच्या जून तिमाहीतील एकत्रित निव्वळ नफ्यात तब्बल 76 टक्क्यांची वाढ झाली असतानाही, आज कंपनीच्या शेअरमध्ये 2 टक्क्यांहून अधिक घसरण झाली. मुकेश अंबानी यांच्या मालकीचा हा शेअर 1,448.80 रुपयांवर व्यवहार करत आहे.

BSE SENSEX

एनएसई निफ्टीवर आज एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, हिंडाल्को, टाटा स्टील आणि अल्ट्राटेक सिमेंट यांच्या शेअर्समध्ये वाढ दिसून आली. दुसरीकडे, रिलायन्स इंडस्ट्रीज, इंडसइंड बँक, अॅक्सिस बँक, टायटन कंपनी आणि अदानी पोर्ट्स यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकही किरकोळ घसरणीसह व्यवहार करत आहेत.

FAQs

1. आज शेअर बाजाराचा कल कसा होता? (How did the stock market perform today?)
- आज शेअर बाजाराने तेजीसह सुरुवात केली, पण नंतर स्थिर राहून निफ्टी 25,000च्या खाली आणि सेन्सेक्स 30 अंकांच्या वाढीसह स्थिर झाला.

2. कोणत्या शेअर्समध्ये वाढ आणि कोणत्या शेअर्समध्ये घसरण झाली? (Which stocks gained and which declined?)
- एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, हिंडाल्को, टाटा स्टील आणि अल्ट्राटेक सिमेंटमध्ये वाढ झाली, तर रिलायन्स इंडस्ट्रीज, अॅक्सिस बँक, इंडसइंड बँक, टायटन आणि अदानी पोर्ट्समध्ये घसरण झाली.

3. रिलायन्सचा नफा वाढला असताना शेअर का घसरला? (Why did Reliance shares fall despite profit growth?)
- जून तिमाहीत नफ्यात 76% वाढ झाली असली तरी गुंतवणूकदारांनी प्रॉफिट बुकिंग केल्यामुळे आणि बाजारातील दबावामुळे शेअर 2% नी खाली आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : चांदीचा भाव उसळला; नवीन दर १,१९,५०० रुपये!

SHREYASI JOSHI: पुण्याच्या श्रेयसी जोशीने इतिहास रचला, आशियाई रोलर स्केट स्पर्धेत सुवर्ण जिंकणारी पहिली भारतीय, Video

Dombivali MIDC Fire : डोंबिवलीत दोन कंपन्यांना भीषण आग, परिसरात धुराचे उंच लोट अन्...

Kolhapur Love : प्रेमाच्या त्रिकोणातून खून, अल्पवयीन संशयिताच्या दारात ४० -५० बायका गेल्या अन्, शेवटी प्रतिष्ठित व्यक्तीची मध्यस्थी

Gas production: ‘जकराया’ची दिवसात १७५०० किलो गॅसनिर्मिती; सीबीजी प्रकल्पात यशाचे शिखर सर

SCROLL FOR NEXT