Top 10 Shares esakal
Share Market

Today's Top Shares : बाजार सुरु होण्याआधी जाणून घ्या आज कोणते 10 शेअर्स असतील अ‍ॅक्शनमध्ये ?

बँकिंग आणि फायनांशियल सर्व्हिसेस, एफएमसीजी आणि टेक्नॉलॉजी शेअर्समुळे बाजारावर दबाव आला.

सकाळ ऑनलाईन टीम

Today's Top Shares : गेल्या दोन आठवड्यांत पहिल्यांदाच शुक्रवारी निफ्टी घसरणीसह बंद झाला. तो विक्रीच्या दबावाखाली आला जवळपास एक टक्क्याने खाली बंद झाला. 26 जूनपासून 4.5 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त वाढल्यानंतर प्रॉफीट बुकींगमुळे ही घसरण झाली. बँकिंग आणि फायनांशियल सर्व्हिसेस, एफएमसीजी आणि टेक्नॉलॉजी शेअर्समुळे बाजारावर दबाव आला.

निर्देशांक शुक्रवारी सकाळी 19,523.60 च्या नवीन सार्वकालिक उच्चांकावर पोहोचला. पण सुरुवातीच्या एका तासाच्या अस्थिरतेनंतर इंडेक्स खाली आला. यानंतर दिवसाअखेरीस 165.5 अंकांनी घसरून 19,332 वर बंद झाला. निफ्टीने 19,300 वर सपोर्ट घेतला आहे. यामुळे डेली चार्टवर लाँग अप्पर शॅडोसह बियरीश कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झाला आहे. जे उच्च पातळीवर विक्रीचा दबाव दाखवत आहे.

आज कशी असेल बाजाराची स्थिती ?

सात दिवसांच्या सलग तेजीनंतर निफ्टीने प्रॉफीट बुकींग पाहिल्याचे बीएनपी परिबातर्फे शेअरखानचे जतीन गेडिया म्हणाले. डेली चार्टवर निफ्टी सकारात्मक गतीने पुढे जाऊ शकला नाही असे दिसते.

निफ्टी आता कंसोलिडेशनच्या टप्प्यातून जात आहे. परिणामी 18,646 वरून 19,524 पर्यंत वाढ झाल्यानंतर वाढ थांबलेली दिसून आली आहे. शिवाय महत्त्वपूर्ण फिबोनाची रिट्रेसमेंट (Fibonacci retracement) लेव्हल आणि गॅप एरिया 19,200 - 19,180 च्या आसपास दिसत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. हा शॉर्ट टर्ममध्ये सपोर्ट झोन म्हणून काम करू शकतो. वरच्या बाजूस, 19,520 - 19,550 झोन शॉर्ट टर्म रझिस्टंस झोन म्हणून काम करेल असे त्यांनी सांगितले. (stock)

आजचे टॉप 10 ऍक्शन शेअर्स कोणते ?

अदानी पोर्ट्स (ADANIPORTS)

पॉवरग्रीड (POWERGRID)

अपोलो हॉस्पिटल (APOLLOHOSP)

इंडसइंड बँक (INDUSINDBK)

एनटीपीसी (NTPC)

ए यू बँक (AUBANK)

ट्रेंट (TRENT)

ऍस्ट्रल (ASTRAL)

श्रीराम फायनान्स (SHRIRAMFIN)

भारतीय कंटेनर निगम (CONCOR) (Share Market)

नोंद - क्रिप्टो मार्केट, शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते. यामध्ये फायद्याप्रमाणे नुकसान होण्याचीही शक्यता असते. त्यामुळे क्रिप्टो, शेअर बाजार किंवा म्युच्युअल फंडातील कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT