Inspirational story of Mangal Maind
Inspirational story of Mangal Maind esakal
सप्तरंग

प्लॅस्टिक वस्तू विक्रीतून उभ्या राहिल्या अभोण्याच्या मंगलताई मैंद

विजयकुमार इंगळे

अभोणा (जि. नाशिक) : कष्ट पाचवीलाच पूजलेल... संकटे आपली परीक्षा घेण्यासाठीच आलेले आहेत, हे वाक्य अधोरेखित करत संकटांना नमविण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. मजुरीपासून झालेली सुरवात आज प्लॅस्टिक वस्तू विक्रीचा व्यवसाय उभा केला. कुटुंबावर आलेल्या संकटांना घाबरून न जाता, सकारात्मक विचारांची जोड देत कष्ट आणि मेहनतीच्या जोरावर संकटांनाच परतवून लावले ते अभोणा (ता.कळवण) येथील मंगलताई मैंद-इखणकर यांनी...

कष्टाची लढाई

वरखेडी (ता. भडगाव) येथून सुरू झालेली कष्टाची लढाई अखेर कळवण तालुक्यात थांबवली त्या मंगलाताई संजय मैंद यांचे शिक्षण अवघे सातवी पास... माहेरी वडील शंकर सखाराम इखणकर (सोनार) यांची परिस्थिती जेमतेम... शंकर इखणकर यांचे पत्नी रुक्मिणी आणि २ मुलं, २ मुली असे कुटुंब... मात्र कष्टाशिवाय कुटुंबाला पर्याय नसल्याने गावात शेतमजुरी करत कुटुंबाला दोन वेळचे अन्न मिळविण्यासाठी धडपड... मात्र यातून फारशी आर्थिक मदत होत नसल्याने शंकर इखणकर यांनी गावोगावी जाऊन बर्फी विक्रीचा व्यवसाय सुरू केला. याच व्यवसायानिमित्ताने त्यांनी थेट अभोणा गाठले.

आर्थिक परिस्थितीमुळे शिक्षण अर्ध्यावरच सुटले अन...

परिस्थितीमुळे कुटुंबातील सदस्यांना शिक्षण देणे अवघड बनल्याने मंगलताई यांचे शिक्षण अर्ध्यावरच सुटले. त्यांचा विवाह १९९७ मध्ये अभोणा येथील संजय मैंद यांच्याशी झाला. संजय यांचेही शिक्षण जेमतेम... सासरचीही परिस्थिती हलाखीची... सासरी लग्नानंतर काही महिन्यांतच विभक्त केल्यामुळे परिस्थिती अजूनच बिकट बनली. अभोण्याच्या कोल्हापूर फाटा परिसरात २० रुपये रोजंदारीवर त्या नर्सरीत कामासाठी जाऊ लागल्या. याच काळात पतीचे आजारपण उदभवले. कुटुंबावर कर्ज झाले. बचत गटांच्या मदतीने त्यांनी आर्थिक मदत घेत पतीला आजारपणातून बाहेर काढले.

परिस्थितीलाच दिले आव्हान...
मुलगा सुशांत आणि अश्विनी यांच्यानिमित्ताने वाढलेली जबाबदारी यामुळे त्यांची परिस्थिती अजूनच बिकटच बनली. मात्र आहे त्या परिस्थितीलाच त्यांनी आव्हान देत वडिलांकडून तसेच भाऊ विलास व सुनील यांच्याकडून भांडवलासाठी मदत घेत प्लॅस्टिक वस्तू विक्रीचा व्यवसाय थाटला. अभोणा गाव आणि परिसरातील आठवडे बाजारांतील गरज लक्षात घेता मंगलताई यांनी घेतलेला प्लॅस्टिक वस्तू विक्रीचा निर्णय त्यांच्यासाठी पथ्यावर पडला. येथूनच त्यांच्या यशाला मार्ग सापडत गेला. पहिल्याच दिवशी कनाशी येथील आठवडे बाजारातून मिळालेल्या विक्रीतून मंगलताईंना खर्च वजा जाता ११० रुपये नफा झाला. याच ११० रुपयांनी दिलेला आनंद मात्र त्यांना यशाकडे नेण्यासाठी भक्कम ठरला.

परिस्थितीवर केली मात
व्यवसायाला पुढे नेत असतानाच मुलांचीही मदत मंगलताईंना होत होती. मंगलताई बचत गटांना जोडल्या गेल्यामुळे त्यांना व्यवसायाला भक्कम जोड मिळत गेली. कुटुंबावर खचून जाण्याचा प्रसंग ओढवला असताना जावई प्रशांत दुसाने, भाऊ विलास, सुनील यांनी दिलेला आधार मोलाचा होता, हेही त्या सांगण्यास विसरल्या नाहीत. अभोणा येथील बचत गटाच्या संयोगिनी आणि तनिष्का गटप्रमुख विमल ठाकरे यांनी दिलेला आधार मी कधीही विसरू शकत नाही, हे सांगताना मात्र त्यांचे डोळे पाणावले.

मैंद कुटुंबाला उभे करत या व्यवसायातून उभारी घेत अभोणा येथे स्वमालकिचे घर, मुलाला चहाचा व्यवसाय उभा करून देत चारचाकीही घेऊन दिलीय. प्लॅस्टिक वस्तू विक्रीतून मुलगी अश्विनीताई यांचे लग्न करून दिले. मंगलताई यांना या व्यवसायात आता मुलगा सुशांतसोबतच सून वैष्णवी यांचीही मदत होत आहे. मंगलाताई यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत जिद्दीने परिसरातील आठवडे बाजारांमध्ये या व्यवसायातून उभी केलेली ओळख नक्कीच इतरांसाठी प्रेरणादायी ठरली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

Hadapsar : वैदुवाडी झोपडपट्टीत लागलेल्या आगीत चार झोपड्या जळून खाक

CSK vs SRH Live IPL 2024 : ऋतुराजचं शतक हुकलं; सीएसकेने ठेवलं 213 धावांच आव्हान

SCROLL FOR NEXT