Sai Baba -
Sai Baba -  esakal
सप्तरंग

शिर्डी संस्थानमुळे प्रतिमा उंचावली!

सकाळ वृत्तसेवा

लेखक - के. सी. पांडे
शिर्डी संस्थानच्या विश्‍वस्तपदी काम करताना भाविक, भक्तांसाठी अनेकविध योजना राबविल्या. सर्व विश्‍वस्तांबरोबर काम करताना एक नवा अनुभव जमेस पडला. भक्तांना जास्तीत जास्त सुविधा, सहज दर्शन कसे होईल यांसह तेथे येणाऱ्यांना इतर सुविधा त्याही माफक दरात मिळतील यासाठी संस्थानच्या माध्यमातून मोठी कामे उभी राहिली, याचा आनंद आहे. गारगोटी संग्रहालयामुळे असलेल्या माझ्या प्रतिमेला संस्थानमुळे आणखी व्यापक अवकाश मिळाले.


शिर्डी हे एक सर्वधर्मीयांसाठीचे तीर्थक्षेत्र आहे. जेथे सर्व धर्मांना एकसमान मानले जाते. येथे सर्व भक्‍त श्रीचरणी नतमस्‍तक होतात. श्रींच्या दर्शनाने साईभक्‍तांना असीम आनंद आणि चिरंतन समाधान मिळते. श्री साईबाबांच्‍या पदस्पर्शाने पावन झालेल्‍या या पवित्र भूमीत भक्‍तांना ‘सबका मालिक एक’ या अनमोल शब्‍दांची आठवण होते. संपूर्ण भारत आणि परदेशातून लाखो भाविक येथे सातत्याने दर्शनासाठी गर्दी करतात. देशभरातून साईभक्‍त शिर्डी येथे बस, रेल्‍वे, तसेच विमानाने येतात.

श्री साईबाबा शिर्डी येथे मानवी अवतारात प्रकट झाले. साईबाबांनी शिर्डी येथे ६० वर्षे राहून मानवजातीची सेवा केली आणि येथूनच जगाला मानवता व एकात्‍मकेची अमूल्य शिकवण दिली व शिर्डीमध्येच समाधिस्थ झाले. श्री साईबाबांच्या पावलांचा ठसा आणि त्यांच्या कृत्यामुळे सर्व जाती आणि धर्मातील भक्‍तांसाठी शिर्डी हे पवित्र स्थान बनले आहे. श्री साईबाबांनी येथूनच भक्‍तांना ‘श्रद्धा-सबुरी’चे आचरण करण्याबाबत उपदेश केला. श्री साईबाबांनी भक्तांना वचन दिले होते, ‘‘मी समाधी घेतल्यानंतर, माझी हाडे थडग्यातून बोलतील आणि लोक येथे गर्दी करतील.’’ त्यांचा संदेश आजतागायत अनुभवला जात आहे. शिर्डी हे असे एक क्षेत्र आहे, की जिथे आजही असंख्‍य साईभक्त रिकाम्या हाताने येतात; पण जाताने त्यांच्या चेहऱ्यावर निरंतर समाधानाचा भाव असतो.

२००४ ला राज्य शासनाने शिर्डी साई संस्थानच्या विश्वस्तांची यादी जाहीर केली. यामध्ये माझ्यासोबत माजी विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, शंकरराव कोल्हे, जयंतराव ससाने, पांडुरंग अभंग, डॉ. पी. एल. तिवारी, शैलेश कुटे, डॉ. एकनाथ गोंदकर अशी राजकीय व सामाजिक क्षेत्रांतील सर्वांना परिचित असणारी नावे होती. शिर्डी संस्थानच्या विश्वस्त मंडळांमध्ये विविध क्षेत्रांतील दिग्गज मंडळी विश्वस्त म्हणून कार्यरत होती. त्यांच्याबरोबर काम करताना मलाही निरनिराळ्या प्रकारचे अनुभव आले. तत्कालीन विश्वस्त मंडळासोबत व प्रशासनाला बरोबर घेऊन आम्ही अनेक लोककल्याणकारी योजना सुरू केल्या. गारगोटीमुळे मला तसेही सर्व क्षेत्रांतील लोक ओळखत होतेच, अनेक ठिकाणची देशातली व परदेशातली व्यक्ती मला ओळखत होती. त्यातील बरीचशी मंडळीही साईबाबांचीही भक्त होती. त्यामुळे तेथेही माझा जनसंपर्क प्रचंड प्रमाणात वाढला. देशात, परदेशात गारगोटीबरोबरच शिर्डी संस्थानातून मला मिळालेली ओळख ही सर्वदूर पसरली.

शिर्डीतील साई मंदिराबरोबरच भोवतालचा परिसर भक्तांसाठी कसा उपयोगात आणता येईल, यासाठी प्रयत्न केले व त्यात यशही मिळाले. यात प्रामुख्याने शिर्डी एअरपोर्टची मंजुरी व त्याच्या बांधकामास सुरवात झाली. शिर्डी येथील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये राज्यभरातून रुग्ण येत आहेत. संस्थानच्या सेवेसाठी असलेली एक हजार कर्मचाऱ्यांना कायम सेवेत सामावून घेतले गेले. पाणी प्रकल्प, एक हजार रूमचे साईआश्रम असे अनेक महत्त्वकांक्षी प्रकल्प आठ वर्षांच्या कालावधीत मंजूर झाली व पूर्णत्वास गेली. येणाऱ्या भक्ताला साईबाबांचे लवकरात लवकर आणि सहजपणे दर्शन कसे होईल, यासाठी निरनिराळे प्रयोगही केले. याच दरम्यान शिर्डी येथील काही जमीन विकत घेतली. तेथे महत्त्वकांक्षी असा साई अक्षरधाम प्रकल्प सुरू करण्याचा माझा प्रयत्न सुरू आहे. साईबाबांच्या आशीर्वादाने तोही लवकरच होईल, अशी आशा आहे.
(लेखर सिन्नर येथील प्रसिद्ध गारगोटी संग्रहालयाचे संस्थापक, अध्यक्ष आहेत.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT