a mathematician defining infinity srinivasa ramanujan 
सप्तरंग

'अनंता'ची व्याख्या करणारा गणिततज्ज्ञ; श्रीनिवास रामानुजन

सकाळ वृत्तसेवा

अगदी नव्याने शोधलेल्या कृष्णविवराचे वर्तनाचे कोडे सोडविण्यासाठी रामानुजन यांच्या गणिती सूत्रांचा वापर करण्यात आला आहे. आजही रामानूजनच्या त्या वहीतील अनेक सूत्रे नव्या संशोधनाची दिशा स्पष्ट करत आहे. अवघे बत्तीस वर्षे जीवन लाभलेले रामानुजन विज्ञान जगतासाठी लाभलेले अलौकिक वरदान आहे. आज रविवारी (ता. 22) त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरी करण्यात येतो. 

जीवनपट 
रामानुजन यांचा जन्म 22 डिसेंबर 1887 रोजी तमिळनाडूतील तंजावर जिल्ह्यातील तिरोड या गावी झाला. वयाच्या सातव्या वर्षापर्यंतच त्यांनी अभ्यासात एवढी प्रगती दाखवली की त्यांना कुंभकोणमच्या माध्यमिक शाळेत दाखल करण्यात आले. त्यांच्या असामान्य बुद्धिमत्तेमुळे माध्यमिक शाळेत असतानाच ते अनेक प्रमेये आणि गणिती सिद्धांत सांगत आणि ते ऐकून त्यांचे शिक्षकही चकित होत. 

आठवणी २०११ वर्ल्डकपच्या; सचिनसाठी संघाने गायलं होतं गाणं !

रामानुजन यांचा पहिला संशोधनपर लेख इंडियन मॅथेमॅटिकल सोसायटीच्या नियतकालिकात 1991 साली छापून आला. त्यावेळी त्यांचे वय फक्त तेवीस वर्षांचे होते. या लेखामुळे जगाला त्यांच्या संशोधनाविषयी माहिती झाली आणि संशोधकांच्या वर्तुळात त्यांच्या नावाचा बोलबाला होऊ लागला. 1993 साली रामानुजन यांनी केंब्रिज ट्रिनिटी कॉलेजच्या प्रा. जी. एच. हार्डी यांच्याशी पत्रव्यवहार सुरू केला. प्रो. हार्डी हे नामवंत गणितज्ञ असल्याने रामानुजनने त्यांच्याकडून मार्गदर्शनाची अपेक्षा व्यक्त केली होती. त्यांचे पत्र वाचताच रामानुजन हे गणिताचे गाढे अभ्यासक आणि पहिल्या दर्जाचे गणितज्ञ आहेत, असे मत प्रो. हार्डी यांनी व्यक्त केले होते.

केजीएफचा दुसरा भाग लवकरच पडद्यावर; संजय दत्त महत्वाच्या भूमिकेत

लवकरच रामानुजनना इंग्लंडला जाण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि ते 17 मार्च 1994 रोजी इंग्लंडला जाण्यासाठी निघाले. 1914 ते 1917 या अवघ्या तीन वर्षांच्या काळात रामानुजननी बत्तीस संशोधनपर लेख लिहिले. 1918 साली रॉयल सोसायटी ऑफ लंडनने त्यांना आपले सदस्यत्व बहाल केले. त्यावेळी ते फक्त तीस वर्षांचे होते. त्यानंतर त्यांना केंब्रिजच्या ट्रिनिटी कॉलेजची फेलोशिप मिळाली. ही फेलोशिप मिळवणारे ते पहिले भारतीय होत. 

माझ्या जिव्हेवर बसून सरस्वती गणित सांगते
असे म्हटलं जाते की, "गणित हे विज्ञानाचे साधन आहे'. गणिताशिवाय आपण कोणतेच वैज्ञानिक संशोधन पूर्ण करू शकत नाही. याचीच प्रचिती रामानुजन यांच्या न उलगडलेल्या गणिती सुत्रांतून येत आहे. ब्रह्मांडाच्या विस्ताराचे, कृष्णविवराचे वर्तनाचा अभ्यास करण्यासाठी आणि त्यांच्या वर्तनाचे तपशील मिळविण्यासाठी शंभर वर्षांपूर्वी रामानुजन यांनी लिहिलेल्या सूत्रांचा वापर होत आहे. आणि तेव्हाच्या वैज्ञानिकांना न उलगडलेली ही सूत्रे आजच्या आधुनिक विज्ञानासाठी महत्त्वपूर्ण ठरत आहे. गंमत म्हणजे रामानुजन यांनी लिहिलेल्या सूत्रांची सिद्धता त्यांना तत्कालीन गणिती प्रक्रियांनी देता येत नव्हती. त्यामुळे ट्रिनिटी कॉलेजच्या प्राध्यापक रामानुजन यांना काही काळ भंपक समजत होते. पण रामानुजन यांच्या प्रखर बुद्धिमत्तेची जान असलेले प्रा. हार्डी आणि प्रा. लिटलवूड यांनी या महान शास्त्रज्ञांची वैज्ञानिक जगतासमोर ओळख करुण द्यायचे पक्के ठरविले. त्यासाठी रामानुजन यांना पदवीच्या वर्गात बसविण्यात आले. जेणे करुण ते शास्त्रज्ञांना समजेल अशा भाषेत त्यांच्या सूत्रांचा सिद्धांत मांडू शकतील. पण बहुतेक वेळा ते समोरचा शिक्षक जे शिकवत असे त्यांच्या पुढच्या गणिताची उत्तरे देत. त्यामुळे शिक्षक त्यांच्यावर प्रचंड भडकत. कोणतीही गणिती प्रक्रिया न करता थेट उत्तर कसे काय सांगता असे रामानुजन यांना विचारले असता ते म्हणत, माझ्या जिभेवर सरस्वती येऊन गणित सांगते.

रामानुजन यांच्या वहीतील सूत्रांचा आजही अर्थ लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या त्या नोंदवहीत ब्रह्मांडाच्या विज्ञानाची अनेक रहस्ये आजही न उलगडलेल्या अवस्थेत आहेत. इंग्लंडमध्ये असतानाच त्यांना क्षयरोग जडला होता. पुढे 1919 साली रामानुजन इंग्लंडमधून मायदेशी परत आले. त्यांच्या आयुष्याचे शेवटचे वर्ष हे अंथरुणालाच खिळून गेले. क्षयाची असाध्य व्याधी त्यांना जडली होती. वयाच्या अवघ्या तेहेतिसाव्या वर्षी 27 एप्रिल 1920 रोजी हे महान गणितज्ञ हे जग सोडून गेले. त्यांच्या निधनाने केवळ भारतीयांचीच नव्हे तर संपूर्ण गणितविश्वाचे नुकसान झाले. त्यांच्या अलौकिक आणि प्रखर बुद्धीमतेतून निमार्ण झालेला गणिताचा अमूल्य ठेवा भविष्यातील विज्ञान जगतासाठी पथदर्शक ठरत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

"आमचं लग्न लोकांना मान्य नव्हतं" श्रुती मराठे- गौरव घाटणेकरचा धक्कादायक खुलासा; "तिची साथ नसती तर.."

Latest Maharashtra News Updates : मरकटवाडीच्या ग्रामस्थांचं विधानभवन बाहेर आंदोलन

Nargis Fakhri : 'तो मृतदेहावरचं मांस खायचा आणि मलाही..' अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक अनुभव, म्हणाली, 'खणलेले मृतदेह काढून तो...'

SCROLL FOR NEXT