हिंदूहृदयसम्राट आणि आक्रमक बाळासाहेब ठाकरे यांचे वासरदार उद्धव ठाकरे यांच्यावर मवाळ, संयमी, शांत स्वभावाचे, पक्ष वाढवतील का असे अनेक प्रश्न उपस्थित होत होते. पण, आज या सगळ्या प्रश्नांना उद्धव ठाकरे यांनी चोख प्रत्युत्तर देत शिवसेना काय करू शकते आणि पक्ष वाढविण्यासाठी ते कोणताही पर्याय निवडू शकतात हे दाखवून दिले आहे.
'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा
सध्या महाराष्ट्राचे महाचाणक्य असलेल्या आणि बाळासाहेबांचे मित्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी उद्धव ठाकरेंच्या नावावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे भाजपसोबत लढूनही आपला स्वाभिमान आणि लढाऊ बाणा दाखविणाऱ्या शिवसेनेला उद्धव ठाकरेंच्या रुपाने मिळालेले नेतृत्व शंभर टक्के कणखर असल्याचे सिद्ध झाले आहे.
उद्धव ठाकरे यांना बाळासाहेबांनी 2003 मध्ये महाबळेश्वर येथे झालेल्या अधिवेशनात आपला राजकीय वारसदार घोषित केले. यावेळी या स्पर्धेत असलेल्या नारायण राणे आणि राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. या दोघांनी आपापले समर्थक घेऊन शिवसेना फोडली. पण, या दोघांच्या बंडाला थंड करण्याचे आणि पक्ष एकसंध ठेवण्याचे आव्हान उद्धव ठाकरेंकडे होते. याचे आव्हान आता पाहिले तर उद्धव यांनी संयमीपणे पेलल्याचे स्पष्ट दिसत आहे. उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत लढून 45 जागा जिंकल्या. त्यानंतर 2014 च्या विधानसभेत भाजपसोबत फारकत घेऊन शिवसेना स्वतंत्र लढली आणि तब्बल 63 जागा जिंकून सत्तेत आम्ही मजबूत दावेदार असल्याचे सिद्ध केले. पण, शिवसेना भाजपसोबत सत्तेत सहभागी झाली.
शरद पवार म्हणाले मुख्यमंत्रीपदासाठी 'या' नाववर झाली सहमती
सत्तेत सहभागी होऊनही शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारला सतत विरोधी पक्षांपेक्षा अधिक प्रश्न विचारत राहिली. त्यांच्यावर अनेकवेळा हे सत्तेत आहेत की विरोधीपक्षात असे प्रश्न उपस्थित करण्यात आले. आमच्या खिशात राजीनामे आहेत, हे शिवसेना नेत्यांचे वक्तव्य युती सरकारच्या कार्यकाळात चांगलेच गाजले. पण, उद्धव यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना डगमगली नाही आणि भाजपला चुकीच्या मुद्द्यांवर घेरत राहिली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे मन वळविण्यासाठी भाजपच्या चाणक्याला अमित शहांना मातोश्रीवर यावे लागले. त्यामुळे शिवसेना पुन्हा भाजपसोबत लोकसभा निवडणूक लढून त्यांना तब्बल 18 जागा जिंकून आपली डरकाळी पुन्हा फोडली. या विधानसभेतही महायुती म्हणून लढलेल्या भाजप आणि शिवसेनेत खरे वाजले ते मुख्यमंत्रीपदावरून आणि भाजप नेतृत्वाने दिलेल्या शब्दावरून.
विधानसभा अध्यक्षपदासाठी काँग्रेस राष्ट्रवादीत रस्सीखेच; पेच कायम
सत्तेचे आणि पदांचे समसमान वाटप ठरलेले असताना भाजप शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार झाली नाही आणि येथेच शिवसेनेच्या वाघाने आपला पंजा पुन्हा उगारला. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने येथेच ओळखले की हीच ती वेळ. भाजपला सत्तेपासून रोखण्याची आणि बाळासाहेबांचे स्वप्न शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची. कडवे हिंदुत्त्व सोडून शिवसेनेने धर्मनिरपेक्ष पक्ष अशी ओळख असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला आपल्या जवळ केले. बाळासाहेबांचा कडवा शिवसैनिक असलेल्या संजय राऊत यांनी भाजपने आपल्या शब्दांपासून दूर गेल्याची सतत ओळख करून दिली. तर, उद्धव हे संयम राखून या दोन्ही पक्षांसोबत चर्चा करत राहिले. अखेर आज या तिन्ही पक्षांचे सरकार महाराष्ट्रात अस्तित्वात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या सरकारचे नेतृत्व शिवसेनेकडे असेल हे उद्धव यांच्या मेहनतीचे यश आले आहे.
उद्धव यांनी मुख्यमंत्रीपदासाठी सुचविलेल्या 'या' नावांना पवारांची नापसंती
शिवसेनेने भविष्यात आपल्यापुढे अनेक पर्याय उपलब्ध करून ठेवले आहे. प्रत्येक निवडणुकीत आमदारांच्या संख्येत वाढच होत गेलेली शिवसेना आता हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपसोबत कधीही जाऊ शकते. तर, त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सारखे नवे मित्रही जवळ केले आहेत. शिवसेनेचे नुकसान होईल, असे म्हणणाऱ्यांना उद्धव यांनी पूर्णपणे चुकीचे ठरवून शिवसेनेने ठरविले तर काहीही होऊ शकते हे दाखवून दिले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.