Rajaram Pangavane esakal
सप्तरंग

दृष्टिकोन : कौशल्याधिष्ठित शिक्षणातून भविष्यात रोजगार

सकाळ डिजिटल टीम

लेखक : राजाराम पानगव्हाणे

सध्याच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक क्षेत्र झपाट्याने बदलत आहे. आज जे नवे आहे, ते उद्या जुने ठरत असल्याचा हा जमाना आहे. थोडक्यात लगेचच गोष्टी कालबाह्य ठरत आहेत. बदलत्या परिस्थितीनुसार आपणही बदलले पाहिजे.

करिअर सुरू केल्यानंतर शिक्षण घेऊन नोकरी मिळवणे, त्यातही सरकारी नोकरी मिळाली पाहिजे, असा अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि त्यांच्या पालकांचा दृष्टिकोन असतो. मात्र, आपल्या देशाचा तसेच राज्याचा विचार केला असता, सरकारी नोकऱ्यांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत आहे.

सरकारी नोकऱ्यांमध्ये देखील आऊटसोर्सिंग, कॉन्ट्रॅक्टींग, खाजगीकरण व तंत्रज्ञानाच्या वापरामुळे मनुष्यबळ कमी होत चालले आहे. त्यामुळे या बदलत्या परिस्थितीनुसार बाजारात काय मागणी आहे? याचा विचार करुन करिअर घडविले पाहिजे.  (Saptarang latest marathi article by rajaram pangavane on Future Employment through Skilled Education nashik news)

पारंपरिक शिक्षण आधीच्या गरजेनुसार योग्य होते, किंबहुना आजही ते कालबाह्य झालेले नाही. पण त्यात आता अद्ययावत शिक्षण पद्धतीचा पुरस्कार करण्याची, अंगीकारण्याची गरज निर्माण झालेली आहे. 

शासन देखील त्या दृष्टिकोनातून शैक्षणिक धोरणात बदल करत असल्याचे दिसून येते. पारंपरिक शिक्षणाला कौशल्याची जोड देण्याची आवश्यकता आहे. कौशल्य विकास केल्याशिवाय रोजगार मिळणे भविष्यात अशक्यप्राय होऊन बसेल, ही काळ्या दगडावरची रेघ मानायला हवी. 

शिक्षणाचा मुख्य हेतू आता बदलू पाहतोय. जी कौशल्ये विद्यार्थी शिकत आहे, त्याचा जीवन जगताना आणि रोजगार प्राप्तीसाठी कसा वापर करू शकतात, हे डोळ्यासमोर ठेवून क्षमता आधारित शिक्षणावर सध्या लक्ष केंद्रीत केलेले आहे.

त्याचप्रमाणे शिकण्याच्या एकूण प्रक्रियेत मुलं नेमकेपणाने कुठे आहे, त्यांना कशात रस किंवा गती आहे, याचे मूल्यमापन योग्यवेळी व्हायला हवे. 

ज्या देशाकडे कौशल्य आणि ज्ञान या दोन्ही मुलभूत गोष्टी आहेत, तेच देश भविष्यात जगावर राज्य करणार आहेत. त्यातूनच रोजगारातील आव्हाने पेलणे आणि संधींचा विकास करणे शक्य होणार आहे.

सर्व विद्यार्थ्यांना उच्चतम कौशल्य व ज्ञान आणि देश-विदेशात मान्य असलेले शिक्षण देणे हे प्रत्येक शिक्षण व्यवस्थेचे मुख्य उद्दिष्ट असायला हवे. भविष्यातील चांगला रोजगार व जागतिक बाजारपेठेतील भारताची स्पर्धा लक्षात घेऊन कौशल्याधिष्ठीत शिक्षण मिळविणे हे सर्वाधिक महत्त्वाचे होय.

कुठलीही उद्योग कंपनी अगर संस्था उमेदवारांची निवड करताना त्यांची उपयुक्तता तपासून नोकरी देत असते.

शिक्षणाच्या बहुसंख्य शाखांमध्ये नवनवीन संकल्पना आणि तंत्रज्ञानाचा सातत्याने समावेश होत आहे. या नवनवीन आणि अद्ययावत गोष्टींची पुरेपूर माहिती आणि त्यातील प्रशिक्षण आता काळाची अत्यावश्यक गरज बनलेली आहे. 

जगाची मागणी कौशल्य आणि ज्ञानावर आधारित आहे. ज्याच्याकडे कौशल्य आहे, त्याला नोकरीची हमी निश्चितपणाने आहे. हवा तेवढा पगार आणि हवे तेवढे उत्पन्न मिळवून देणाऱ्या अनेक कंपन्या उपलब्ध आहेत. 

कौशल्यावर आधारित शिक्षण हा पर्याय नसून गरज आहे. कुशल व्यक्तींच्या तुलनेत कुशल व्यावसायिकांची मागणी खूप जास्त आहे. शाळांनी देखील शिक्षणासोबत कौशल्य-आधारित शिक्षणावर अधिक भर दिला पाहिजे.

एकविसाव्या शतकात शिक्षण महत्त्वाचे असले तरी कौशल्य सर्वांत महत्त्वाचे आहे. लहानपणापासूनच मुलांना कौशल्यावर आधारित शिक्षण देणे महत्त्वाचे आहे. यातून त्यांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम होतो. 

कोरोना महामारीनंतर स्थानिक उत्पादनांचा वापर वाढला आहे. लोकांना देखील कौशल्य-चालित समाजाचे महत्त्व ओळखले आहे. कौशल्यधारित शिक्षण विद्यार्थ्यांना सुरक्षितता आणि लाभ दोन्ही मिळवून देऊ शकते. 

विद्यार्थी हे देशाचे मानवी भांडवल असून अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी त्यांना सक्षम करणे आवश्यक आहे. शिक्षणातून नोकरी व उद्योजकता वाढीस लागणे हे शिक्षणाचे खरे यश असते. बदलत्या काळात फक्त पारंपरिक शिक्षण हे विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास व त्यांचे भावी जीवन सुकर करण्यासाठी पुरेसे ठरणारे नाही.

त्यामुळेच कौशल्यावर आधारित शिक्षणाला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. नियमित अभ्यासक्रमाबरोबर विद्यार्थ्यांनी वेगवेगळी कौशल्ये आत्मसात केली तर त्याचा निश्चितच फायदा होतो. 

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

विद्यार्थ्यांना नोकरीसाठी, उद्योजक बनण्यासाठी कौशल्य विकास गरजेचा ठरतो. कौशल्य आणि ज्ञान हे देशाच्या आर्थिक वाढीची आणि सामाजिक विकासाची देखील प्रेरक शक्ती आहे. भारतासारख्या लोकसंख्येसह वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेत एकीकडे उच्च प्रशिक्षित गुणवत्ता कुशल संसाधनांची कमतरता भासते.

दुसरीकडे लोकसंख्येचा एक मोठा वर्ग असा आहे की, ज्याच्याकडे थोडी किंवा अजिबात नोकरीविषयक कौशल्ये नाहीत. शैक्षणिक पात्रतांसह बदलत्या काळाचा सामना करण्यासाठी आणि कठीण तंत्रज्ञानाच्या आव्हानांना तोंड देण्यास सक्षम असलेल्या गतिशील आणि उद्योजक तरुणांना तयार करणे आवश्यक आहे.

याशिवाय उद्योजकांना नवीन लोकांना आवश्यक कौशल्यांनी प्रशिक्षित करण्यासाठी वेळ नाही. अनेकांना त्यात रस नाही. या मंडळींना तयार मनुष्यबळ हवे आहे. स्पर्धात्मक युगाचा विचार करता इंडस्ट्रीज फक्त कुशल उमेदवारांना नियुक्तीसाठी विचार करतात. कंपनीच्या कल्याणासाठी कुशल व्यक्ती लगेचच योगदान देऊ शकतात. 

कोणत्याही विशिष्ट कार्यासाठी कौशल्य सर्वाधिक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. कौशल्य निर्माणाकडे उत्पादनाची परिणामकारकता आणि कामगारांचे योगदान सुधारण्याचे एक साधन म्हणून पाहिले जायला हवे.

कौशल्य निर्माण हे उत्पादन क्षमता व अर्थव्यवस्थेचा विकासदर वाढविण्यासाठीसाठी महत्त्वपूर्ण घटक आहे. कौशल्य विकासाकडे व्यक्तीला सक्षम बनविण्यासाठी आणि सामाजिक स्विकृती आणि मुल्यात सुधारणा करण्यासाठी एक साधन म्हणून पाहिले जाऊ शकते.

ज्या देशात उच्च आणि उच्चतम कौशल्य आहेत, ते जागतिकीकरणाची आव्हाने आणि संधीशी प्रभावीपणे जुळवून घेवू शकतात. भारत हा जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक असून आपल्याकडे जगभरातील विविध अर्थव्यवस्थांना कुशल मनुष्यबळ पुरविण्याची क्षमता आहे. तसेच स्वतःच्या वाढीच्या क्षमतेसोबतच स्वतःच्या गरजा पुरविण्याची देखील क्षमता भारतात आहे.

भारत जगातील सर्वांधिक तरुण लोकसंख्येचा देश आहे. तर एकूण लोकसंख्येच्या ६२ टक्के लोक कामकरी वयोगटातील आहेत. हे प्रमाण पुढील दशकात अजून वाढण्याची शक्यता आहे. 

आपला देश रोजगारविषयक कौशल्य आणि ज्ञानाचा वापर करुन सुसज्ज असणे गरजेचे आहे. त्याद्वारे देशाच्या आर्थिक विकासासाठी ठोस योगदान देता येवू शकते.

कौशल्य अथवा संशोधनावर आधारित शिक्षण हे एक अध्यापन शास्त्र आहे. ज्याचा उद्देश विद्यार्थ्याने वर्गातील लेक्चरद्वारे संपादन केलेल्या ज्ञानातून कौशल्य तयार करणे आणि त्यांना शिकवण्याच्या प्रक्रियेला बळकटी देणे हा आहे.

कौशल्य आधारित शिक्षणामध्ये शिक्षक नियोजन आणि सरावाद्वारे ज्ञान देण्यावर लक्ष केंद्रित केले जाते. ज्यामुळे विद्यार्थ्यांना संकल्पना टिकून ठेवण्यास मदत होते. 

(लेखक हे ब्रम्हा व्हॅली ग्रृप ऑफ एज्युकेशन इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष आहेत.)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT