Peacock esakal
सातारा

Karad : मोराच्या अंगावरची पिसं उपसून काढली अन् व्‍हिडिओ केला शेअर; मध्‍य प्रदेशातील आरोपींना कराडात अटक

अटकेतील त्‍या दोघांना मध्‍य प्रदेश वनविभागाच्‍या (Satara Forest Department) ताब्‍यात देण्‍यात आले आहे.

सकाळ डिजिटल टीम

ताब्‍यात घेतलेल्‍या संशयितांना पाटण न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार मध्‍य प्रदेश वनविभागाच्‍या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्‍या ताब्‍यात देण्‍यात आले.

सातारा : मोराच्‍या (Peacock) अंगावरची पिसे उपसून काढत त्‍याबाबतचा केलेला व्‍हिडिओ सोशल मीडियावर व्‍हायरल करत मध्‍य प्रदेश (Madhya Pradesh) येथून पसार झालेल्‍या दोघांना सातारा वनविभागाने पाटण तालुक्‍यातील बेलवडे खुर्द या गावाजवळ अटक केली.

अटकेतील त्‍या दोघांना मध्‍य प्रदेश वनविभागाच्‍या (Satara Forest Department) ताब्‍यात देण्‍यात आले आहे. मध्‍य प्रदेश येथील रिठी वनपरिक्षेत्रात राहणाऱ्या अतुल (पूर्ण नाव नाही) याने एका युवतीसोबत वनक्षेत्रात एक मोर पकडला होता. या मोराची नंतरच्‍या काळात त्‍याने पिसे उपसून काढत त्‍याचा व्‍हिडिओ तयार केला होता.

हा व्‍हिडिओ व्‍हायरल झाल्‍यानंतर त्‍याठिकाणच्‍या वनकर्मचाऱ्यांनी त्‍यांचा शोध सुरू केला. वनकर्मचारी शोध घेत असल्‍याचे समजल्‍यानंतर अतुल हा युवतीसोबत त्‍याठिकाणाहून पसार झाला होता. पसार असणारा अतुल सातारा जिल्ह्यात असल्‍याची माहिती रिठी वनविभागास मिळाली होती. यानुसार त्‍यांनी उपवनसंरक्षक महादेव मोहिते यांना याची माहिती दिली.

यानुसार त्‍यांनी, तसेच सहायक उपवनसंरक्षक महेश झांजुर्णे यांनी पाटणचे वनक्षेत्रपाल, कर्मचारी, फिरत्‍या पथकास माहिती देत संशयितांचा शोध घेण्‍याच्‍या सूचना केल्‍या. यानुसार बेलवडे खुर्द गावाजवळून या संशयितांना ताब्‍यात घेण्‍यात आले. यानंतर त्‍याची माहिती मध्‍य प्रदेश वनविभागास देण्‍यात आली. ताब्‍यात घेतलेल्‍या संशयितांना पाटण न्‍यायालयाच्‍या आदेशानुसार मध्‍य प्रदेश वनविभागाच्‍या अधिकारी, कर्मचाऱ्यांच्‍या ताब्‍यात देण्‍यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT