Love Jihad Hindu Association Satara
Love Jihad Hindu Association Satara esakal
सातारा

Love Jihad : 'दिल्ली, झारखंडसह देशभरात हिंदू मुलींच्या हत्या, तत्काळ लव्ह जिहादविरोधी कायदा करा'

सकाळ डिजिटल टीम

या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना व हिंदू राष्ट्र जागृती यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

सातारा : दिल्ली, झारखंडसह देशभरात हिंदू मुलींच्या (Hindu Girl) हत्येच्या घटनांची मालिकाच सुरू आहे. या घटनेत सहभागी लव्ह जिहाद्यांना तत्काळ शिक्षा व्हावी, तसेच देशात तत्काळ ‘लव्ह जिहादविरोधी’ कायदा करा, या मागणीसाठी हिंदुत्ववादी संघटना व हिंदू राष्ट्र जागृती यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.

या वेळी (Love Jihad) अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले. हिंदुत्ववादी संघटनांनी (Hindu Association) अतिरिक्त जिल्हाधिकारी किशोर गलांडे यांना निवेदन दिले.

या वेळी हिंदू महासभेचे महाराष्ट्र राज्य प्रमुख कार्यवाह दत्तात्रय सणस, हिंदू महासभेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य उमेश गांधी, हिंदू महासभेचे जिल्हाध्यक्ष धनराज जगताप, कुंभार महाराज, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे कोरेगाव तालुका प्रमुख अजय बर्गे, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे योगेश कापले, वैभव पिसाळ, इस्कॉनचे लक्ष्मण रसाळ, विश्‍व हिंदू परिषदेचे जितेंद्र वाडकर, रणरागिणी शाखेच्या रूपा महाडिक, हिंदू जनजागृती समितीचे हेमंत सोनवणे उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pat Cummins SRH vs RR : डेथ ओव्हरमध्ये कमिन्सचा टेरर! रजवाड्यांची कडवी झुंज मोडून काढत हैदराबादचा नवाबी थाटात विजय

Sharad Pawar on Baramati: बारामती लोकसभेचा निकाल कसा दिसतो? शरद पवार म्हणतात, आजपर्यंत...

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

SRH vs RR IPL 2024 : शेवटच्या चेंडूवर भूवीने हैदराबादला मिळवून दिला विजय

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

SCROLL FOR NEXT